मेनू बंद

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 4

मराठी व्याकरणा मध्ये ‘ मराठी म्हणी संग्रह व अर्थ ‘चे स्थान अतिशय महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेपासून तर अगदी नोकरीसाठी द्यायच्या परीक्षेपर्यंत ‘ मराठी म्हणी व वाक्प्रचार ‘ हे प्रकरण येतेच. सामान्य जीवनातही आपण अनेक तऱ्हेच्या ‘ मराठी म्हणी व त्याचे अर्थ ‘ यांचा वापर करतो. आम्ही येथे संपूर्ण Marathi Mhani List उपलब्ध केलेली आहे; ज्यामध्ये 8 भाग आहेत त्यापैकी हा भाग 4 आहे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार | मराठी म्हणी संग्रह व अर्थ - Marathi Mhani List भाग 4

मराठी म्हणी संग्रह व अर्थ – भाग 4

 • उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी – प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.
 • पोर होईना व सवत साहीना – आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही.
 • फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय – राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावाच लागतो.
 • फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचणे – जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे.
 • फुल ना फुलाची पाकळी – वास्तविक जितके द्यायला पाहिजे, तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे.
 • फुटका डोळा काजळाने साजरा करावा – आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो, तो झाकता येईल तितकाच झाकावा.
 • बडा घर पोकळ वासा – दिसण्यास श्रीमंती ; पण प्रत्यक्षात तिचा अभाव.
 • असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा – अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे .
 • अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? – कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.
 • उकराल माती तर पिकतील मोती – मशागत केल्यास चांगले पीक येते.
 • उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला ? – एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.
 • उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती ? – जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.
 • उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते.
 • उधारीची पोते, सव्वा हात रिते – उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.
 • उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे – श्रीमंती आली की , तिच्या मागोमाग हाजी – हाजी करणारेही येतातच.
 • अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप – अतिशय उतावळेपणाची कृती.
 • सारा गाव मामाचा एक नाही कामाचा – जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे; पण त्यांपैकी कोणाचाच उपयोग न होणे.
 • साप साप म्हणून भुई धोपटणे – संकट नसतांना त्याचा आभास निर्माण करणे.
 • यथा राजा तथा प्रजा – सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात.
 • या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे – बनवाबनवी करणे.
 • ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या – एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे.
 • चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ – मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे.
 • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.
 • चारजणांची आई बाजेवर जीव जाई – जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही.
 • चिंती परा येई घरा – दुसऱ्याचे वाईट चिंतीत राहिले, की ते आपल्यावरच उलटते.

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 4

 • रे ये रे कुत्र्या, खा माझा पाय – आपणहून संकट ओढवून घेणे.
 • रंग जाणे रंगारी – ज्याची विद्या त्यालाच माहीत.
 • सात हात लाकूड, नऊ हात ढलपी – एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे.
 • सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी – एकदम अश्यक कोटीतील गोष्टी करणे .
 • करावे तसे भरावे – जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे.
 • कर नाही त्याला डर कशाला ? – ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे.
 • करीन ते पूर्व – मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.
 • करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते – काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते.
 • करून करून भागला, देवध्यानी लागला – भरपूर वाईट कामे करून शेवटी देव पुजेला लागणे.
 • अंथरूण पाहून पाय पसरावे – आपली ऐपत, वकूब पाहून वागावे.
 • अंगापेक्षा बोंगा मोठा – मूळ गोष्टींपेक्षा तिच्या आनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.
 • आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे – स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे.
 • कणगीत दाणा तर भील उताणा – गरजेपुरते जवळ असले, की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत.
 • कधी तुपाशी तर कधी उपाशी – सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही.
 • घरोघरी मातीच्याच चुली – एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
 • घर ना दार देवळी बिऱ्हाड – शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती.
 • काडीचोर तो माडीचोर – एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.
 • काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती – क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्यापुरताच असतो.
 • का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ – निरर्थक गोष्टींची काळजी करणे.
 • कानात बुगडी, गावात फुगडी – आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
 • काल मेला आणि आज पितर झाला – अतिशय उतावळेपणाची वृत्ती.
 • घडाई परीस मढाई – जास्त मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे.
 • घेता दिवाळी, देता शिमगा – घ्यायला आनंद वाटतो द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब.
 • घोडे कमावते आणि गाढव खाते – एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैरफायदा घ्यावा.

पुढील यादी बघा:

Related Posts