मेनू बंद

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 5

मराठी व्याकरणा मध्ये ‘ मराठी म्हणी संग्रह व अर्थ ‘चे स्थान अतिशय महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेपासून तर अगदी नोकरीसाठी द्यायच्या परीक्षेपर्यंत ‘ मराठी म्हणी व वाक्प्रचार ‘ हे प्रकरण येतेच. सामान्य जीवनातही आपण अनेक तऱ्हेच्या ‘ मराठी म्हणी व त्याचे अर्थ ‘ यांचा वापर करतो. आम्ही येथे संपूर्ण Marathi Mhani List उपलब्ध केलेली आहे; ज्यामध्ये 8 भाग आहेत त्यापैकी हा भाग 5 आहे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार | मराठी म्हणी संग्रह व अर्थ - Marathi Mhani List भाग 5

मराठी म्हणी संग्रह व अर्थ – भाग 5

 • कशात काय नि फाटक्यात पाय – वाईटात आणखी वाईट घडणे.
 • काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही – रक्ताचे नाते तोंडू म्हणता तुटत नाही.
 • आपली पाठ आपणास दिसत नाही – स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत.
 • आजा मेला नातू झाला – एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे.
 • सुरुवातीलाच माशी शिंकली – आरंभालाच अपशकुन.
 • अति खाणे मसणात जाणे – अति खाणे नुकसान कारक असते.
 • अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी – मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते.
 • अवचित पडे, नि दंडवत घडे – स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे.
 • अवसबई इकडे पूनवबाई तिकडे – एकमेकींच्या विरुद्ध बाजू असणे.
 • कावळा बसला अन् फांदी तुटली – परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे.
 • काखेत कळसा गावाला वळसा – जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे.
 • काप गेले नि भोके राहिली – वैभव गेले अन् फक्त त्याच्या खुणा राहिल्या.
 • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
 • काळ आला ; पण वेळ आली नव्हती – नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
 • कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात – चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
 • कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा – दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.
 • कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे – मूळचा स्वभाव बदलत नाही.
 • कुडी तशी फोडी – देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.
 • कुऱ्हऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – स्वार्थासाठी केवळ दुष्टबुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
 • केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी – अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.
 • केस उपटल्याने का मढे हलके होते ? – जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपयांनी काही होत नाही.
 • केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले – एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते, मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.
 • कोळसा उगाळावा तितका काळाच – वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.
 • कोल्हा काकडीला राजी – लहान लोक लहान गोष्टींनी खुश होतात.
 • ज्याच्या हाती ससा, तो पारधी – ज्याच्या हाती वस्तू असते, त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 5

 • ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे – एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो.
 • ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी – जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे.
 • झाकली मूठ सव्वा लाखाची – व्यंग नेहमी झाकून ठेवावे.
 • टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही – कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा येत नाही.
 • कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी – चूक एकाची शिक्षा दुसऱ्यालाच.
 • कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभट्टाची तट्टाणी – महान गोष्टींबरोबर क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे.
 • खऱ्याला मरण नाही – खरे कधीच लपत नाही.
 • खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते – खर्च करणाऱ्याचा खर्च होतो ; तो त्याला मान्यही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो.
 • खाऊ जाणे तो पचवू जाणे – एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
 • खाण तशी माती – आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.
 • गाय व्याली, शिंगी झाली – अघटित घटना घडणे.
 • गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे – दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे.
 • गोगलगाय न पोटात पाय – बाहेरून गरीब दिसणारी ; पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती.
 • घरचे झाले थोडे व्यायाने धाडले घोडे – अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे.
 • घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात – एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात.
 • खायला काळ भुईला भार – निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.
 • खाई त्याला खवखवे – जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
 • डोळ्यात केर आणि कानात फुंकर – रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी.
 • ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही, पण गुण लागला – वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीनं चांगला माणूसही बिघडतो.
 • ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधु तैसा – वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात.
 • तळे राखील तो पाणी चाखील – ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यातून काहीतरी फायदा करून घेणारच.
 • तरण्याचे कोळसे, म्हाताऱ्याला बाळसे – अगदी उलट गुणधर्म दिसणे.
 • खाऊन माजावे टाकून माजू नये – पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये.
 • खोट्याच्या कपाळी गोटा – खोटेपणा, वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते.
 • गरज सरो, वैद्य मरो – एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे.

पुढील यादी बघा:

Related Posts