मेनू बंद

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 7

मराठी व्याकरणा मध्ये ‘ मराठी म्हणी संग्रह व अर्थ ‘चे स्थान अतिशय महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेपासून तर अगदी नोकरीसाठी द्यायच्या परीक्षेपर्यंत ‘ मराठी म्हणी व वाक्प्रचार ‘ हे प्रकरण येतेच. सामान्य जीवनातही आपण अनेक तऱ्हेच्या ‘ मराठी म्हणी व त्याचे अर्थ ‘ यांचा वापर करतो. आम्ही येथे संपूर्ण Marathi Mhani List उपलब्ध केलेली आहे; ज्यामध्ये एकूण 8 भाग आहेत त्यापैकी हा भाग 7 आहे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार | मराठी म्हणी संग्रह व अर्थ - Marathi Mhani List भाग 7

मराठी म्हणी संग्रह व अर्थ – भाग 7

 • नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाहीतर नागवी बसेन – अतिशय हटवादीपणाचे वर्तन करणे.
 • दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी – दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही.
 • दृष्टीआड सृष्टी – आपल्यामागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे.
 • धर्म करता कर्म उभे राहते – एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.
 • धनगराचे कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी – कोणत्याच कामाचे नसणे.
 • धाऱ्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा – छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठीकडे दुर्लक्ष करणे.
 • धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या – गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरीबांना यातायात करावी लागते.
 • नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने – दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात.
 • नदीचे आणि ऋषीचे कूळ पाहू नये – नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये , कारण त्यात काहीतरी दोष असतोच.
 • न कर्त्याचा वार शनिवार – ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो.
 • नव्याचे नऊ दिवस – कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.
 • नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे – केलेला उपदेश निष्फळ ठरणे.
 • पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार – उपदेशाचा शून्य परिणाम होणे.
 • नागेश्वरला नागवून सोमेश्वरला वात लावणे – एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे.
 • नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे.
 • पळसाला पाने तीनच – सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
 • पडलेले शेण माती घेऊन उठते – एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने कितीही जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच.
 • पदरी पडले पवित्र झाले – कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली, की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते.
 • पायाची वहाण पायीच बरी – मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो.
 • पाचामुखी परमेश्वर – बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे.
 • पाप आढ्यावर बोंबलते – पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही.
 • पाची बोटे सारखी नसतात – सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात.
 • पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम – जेथे मोठे शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो.
 • पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा । जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे – अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही.
 • पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली – पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 7

 • थेंबे थेंबे तळे साचे – दिसण्यात क्षुल्लक वाटणारा वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.
 • थोरा घरचे श्वान सर्वही देती मान – मोठ्या माणसाचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो .
 • दगडापेक्षा वीट मऊ – मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते.
 • दस की लकडी एक का बोजा – प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण हाते.
 • नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा – नाव मोठे लक्षण खोटे.
 • नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे – देवाच्या नावाने स्वार्थ जपणे.
 • नाक दाबले, की तोंड उघडते – एखाद्या माणसाचे कमजोरी जाणून त्यावर दबाव आणला की काम लवकर होते.
 • नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला – आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे.
 • नागीण पोसली आणि पोसणाराला डसली – वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच.
 • नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकंराची प्रतिष्ठा वाढणे.
 • नाचता येईना अंगण वाकडे – आपल्याला एखादे काम करता येत नसेल, तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत – दोष दाखवणे.
 • नावडतीचे मीठ आळणी – आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते.
 • दहा गेले, पाच उरले – आयुष्य कमी उरणे.
 • दात कोरून पोट भरत नाही – मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही.
 • दाम करी काम, बिवी करी सलाम – पैसे खर्च केले , की कोणतेही काम होते.
 • दाखविलं सोनं हसे मूल तान्हं – पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो . पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात.
 • दात आहेत तर चने नाहीत, चने आहेत तर दात नाहीत – एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूल नसणे.
 • दिल चंगा तो कथौटी मे गंगा – आपले अंत : करण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याच जवळ असते.
 • ज्या गावाच्या बोरी, त्या गावाच्या बाभळी – एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.
 • गाढवाच्या पाठीवर गोणी – एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही ; तर तिचा फायदा घेता यायला हवा.
 • गाढवाने शेत खाल्ले, ना पाप, ना पुण्य – अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वाया जाते.
 • रात्र थोडी सोंगे फार – कामे भरपूर ; पण वेळ थोडा असणे.
 • रडत राऊत (रडतराव) घोड्यावर स्वार – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे.
 • रामाशिवाय रामायण, कृष्णाशिवाय महाभारत – मुख्य गोष्टीचा अभाव.
 • राईचा पर्वत करणे – मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे.
 • राजाचे घोडे आणि खासदार उडे – वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची.

पुढील यादी बघा:

Related Posts