मेनू बंद

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 8

मराठी व्याकरणा मध्ये ‘ मराठी म्हणी संग्रह व अर्थ ‘चे स्थान अतिशय महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेपासून तर अगदी नोकरीसाठी द्यायच्या परीक्षेपर्यंत ‘ मराठी म्हणी व वाक्प्रचार ‘ हे प्रकरण येतेच. सामान्य जीवनातही आपण अनेक तऱ्हेच्या ‘ मराठी म्हणी व त्याचे अर्थ ‘ यांचा वापर करतो. आम्ही येथे संपूर्ण Marathi Mhani List उपलब्ध केलेली आहे; ज्यामध्ये 8 भाग आहेत त्यापैकी हा भाग 8 आहे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार | मराठी म्हणी संग्रह व अर्थ - Marathi Mhani List भाग 8

मराठी म्हणी संग्रह व अर्थ – भाग 8

 • चोराच्या मनात चांदणे – वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय, अशी सतत भीती असते.
 • जशी देणावळ तशी धुणावळ – मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
 • जलात राहून माशांशी वैर करू नये – ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.
 • जळत घर भाड्याने कोण घेणार ? – नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ? बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार ?
 • जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही – बाह्य दिखाव्याने माणूस ज्ञानी होत नाही.
 • जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे – दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे , तेव्हा तिचे खरे ज्ञान होते.
 • गाव करी ते राव ना करी – श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात.
 • गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ – मुर्खाच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो .
 • बाजारात तुरी, भट भटणीला मारी – काल्पनिक गोष्टीवरून भांडण करणे.
 • बारक्या फणसाला म्हैस राखण – ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडेच रक्षणाची जबाबदारी सोपविणे.
 • बुडत्याला काडीचा आधार – घोर संकटाच्या काळी मिळालेली थोडीशी मदतदेखील महत्त्वाची वाटते.
 • बैल गेला अन् झोपा केला – एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.
 • बोलेल तो करेल काय – केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही.
 • बोडकी आली व केसकर झाली – विधवा आली अन् लग्न लावून गेली.
 • भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी – एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो.
 • भरवशाच्या म्हशीला टोणगा – ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे, नेमके अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे .
 • भित्यापाठी बह्मराक्षस – भित्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असणे.
 • भिंतीला कान असतात – गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय रहात नाही.
 • भीड भिकेची बहीण – उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे.
 • भीक नको; पण कुत्रं आवर – एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये ; परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती.

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 8

 • भागीचे घोडे किवणाने मेले – भागीदारीतल्या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात ; काळजी मात्र कोणीच घेत नाही
 • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
 • मनात मांडे पदरात धोंडे – केवळ मोठमोठी मनोराज्ये करायचे ; परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती.
 • मनी वसे ते स्वप्नी दिसे – ज्या गोष्टींचा आपणास सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे.
 • मनाची नाही, पण जनाची तरी असावी – एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जनाला काय वाटेल याचा विचार करावा .
 • मन जाणे पाप – आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच.
 • मन राजा मन प्रजा – हुकूम करणारे आपले मनच , ते पाळणारेही आपले मनच असते.
 • माणकीस बोललं, झुणकीस लागलं – एकाला बोलणे अन् दुसऱ्याला लागणे.
 • मामुजी मेला अन् गाव गोळा झाला – क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे.

पुढील यादी बघा:

Related Posts