मेनू बंद

विपणन जोखीम म्हणजे काय?

विपणन जोखीम किंवा Marketing Risk ची व्यापाऱ्याला पूर्वकल्पना नसते, ज्यामुळे विपणनातील विविध घटक आणि क्रियांवर महत्वपूर्ण परिणाम होतो, आणि यामुळेच व्यापाऱ्याला नुकसान अथवा हानी होण्याची शक्यता असते. व्यापाराच्या अन्य क्रियांमध्ये जशी जोखीम असते तशी काही प्रमाणात का होईना, विपणनातही जोखीम असतेच. या आर्टिकल मध्ये आपण, विपणन जोखीम म्हणजे काय, सविस्तर जाणून घेणार आहोत.

विपणन जोखीम म्हणजे काय?

विपणन जोखीम म्हणजे काय

अर्थतज्ञ क्लार्क आणि क्लार्क यांचे मते – “विपणन जोखीम म्हणजे अदृश्य अशा परिस्थितीमुळे नुकसान होण्याचा धोकाच होय” (“It is the danger of loss from unfunseen circumstunces that is called Market Risk) असे म्हटले आहे.

थोड्या फार फरकाची पण ह्याच आशयाची व्याख्या अर्थतज्ञ हार्डी यांनी केली आहे, “उत्पादन व्यय, तोटा किंवा हानी यासंबंधीच्या अनिश्चिततेलाच जोखीम म्हणून परिभाषित करता येईल” (“Risk may be defined as uncertainty in Regard to cost, loss or damage.”) असे ते म्हणतात.

अर्थतज्ञ पाईल यांनी विपणन जोखीमीची कल्पना ह्या दोन लेखकांपेक्षा विस्तृत आणि स्पष्ट शब्दात मांडली आहे. विपणनातील अनिश्चिततेचे स्वरूप त्यांनी आपल्या व्याख्येत विशद केले आहे.

पाईल यांच्या शब्दात – “विपणन प्रक्रियेतील अनेक घटकांवर परिणाम करणाऱ्या विविध प्रकारच्या अनिश्चिततेपासून उद्भवणाऱ्या व्यावसायिक हानीची शक्यता आणि संभाव्यता म्हणजे विपणन जोखीम होय.” (Marketing risk may be thought of the possibility and therefore the probability of business loss arising from the various forms of uncertainties that effect the factors involved in the marketing process.”)

विपणन जोखीम चे प्रकार (Types of Marketing Risk)

जोखीम ज्या विविध कारणांमुळे आणि पटकांमुळे निर्माण होते, त्यावरून विपणन जोखीमीचे पुढील पद्धतीने वर्गीकरण करता येते. अनिश्चितता हे जोखीमीच्या निर्मिती चे एकमेव कारण आहे. तिचे असलेले वेगवेगळे स्वरूप म्हणजेच जोखीमीचे प्रकार आहेत. विविध प्रकारच्या जोखीमीचे स्वरूप आणि त्यामागील कारणमीमांसा पुढे विस्तृत रितीने दिली आहे.

1. नैसर्गिक जोखीम (Natural Risk)

पूर, भूकंप, वादळ, पाऊस, ओला अथवा कोरडा दुष्काळ, रोगराई, कीड, टोळधाड वगैरे नैसर्गिक आपत्ती अथवा कारणे घडून व्यापाऱ्यांचे आणि उत्पादकांचे नुकसान होते.

व्यापार संचालन करणाऱ्या प्रमुख कर्त्या भागीदाराचा अथवा प्रत्यक्ष व्यापाऱ्याचा मृत्यु होतो, कारखान्याला किंवा गोदामाला आग लागून माल नष्ट होतो, ट्रक किंवा जहाजाद्वारे माल रवाना होत असतांना अपघात होऊन माल संपूर्णत: एकतर नाश पावतो किंवा उपयोगात येण्यालायक राहत नाही. त्यामुळे अनपेक्षितपणे जे नुकसान होते, त्यालाच नैसर्गिक अथवा प्राकृतिक जोखीम असे नाव आहे.

2. मानवी जोखीम (Human Risk)

नैसर्गिक जोखीम ही नैसर्गिक कारणांमुळे निर्माण होते तर मानवी जोखीम मानवी क्रिया अथवा कारणांमुळे निर्माण होत असते. मानवी कारणांमुळे निर्माण होणारी जोखीम पुढील तीन प्रकारची असते.

i. सरकारी जोखीम (Government Risk)

सरकार हे व्यक्तीचेच बनले असते. त्यामुळे सरकारी धोरणामुळे आणि घटकामुळे निर्माण होणारी जोखीम मानवी जोखीमीतच समाविष्ट होते. सरकार कधी अनपेक्षितपणे कर लावते किंवा जुन्या करात एकदम वाढ करते, काही वस्तूंच्या उपयोगावर किंवा उत्पादनावर निषेध घालते. उदा. सिगरेट, बीज, दारू.

व्यापारावर व्यापार संचालनासंबंधी कठोर कार्यवाहीचा अवलंब करते, विशिष्ट प्रकारे हिशेब व कागदपत्रे ठेवावयास लावते तसेच किंमतीवर आणि वितरणावर नियंत्रण घालते आणि आयात व निर्यातीचे वेगळे धोरण जाहीर करते. अशा सर्व कारणांमुळे विपणन कार्यात अनपेक्षितपणे नुकसान येण्याची शक्यता असते,

ii. कर्मचारी जोखीम (Employee Risk)

उत्पादन कार्यात आणि वेगवेगळ्या विपणन कार्यात जे कर्मचारी गुंतलेले असतात, त्यांच्या वेगळ्या वागणूकीनेही जोखीम निर्माण होते. कर्मचाऱ्यांचा संप, अधिक वेतनाची आणि सवलतीची मागणी, मोठ्या प्रमाणावर रजेवर जाणे, अनियमित काम करणे, काम करताना काही कर्मचाऱ्यांना दुखापत होणे अथवा मृत्यु होणे, कर्मचान्यांतर्फे न्यायालयात मालकाविरुद्ध दावा दाखल होणे व आकस्मिक आलेली रोगाची साथ यामुळे सेवायोजकावर नुकसान सहन करण्याची पाळी येते. या सर्वांना कर्मचाऱ्यांमुळे निर्माण होणारी जोखीम असे म्हणतात.

iii. ग्राहक जोखीम (Customer Risk)

ग्राहकांच्या अनपेक्षित प्रवृत्तीमुळे जी जोखीम आणि नुकसानकारक परिस्थिती निर्माण होते, त्याला ग्राहकामुळे निर्माण होणारी जोखीम असे म्हटले जाते. ग्राहकांच्या आवडीनिवडी अनपेक्षितपणे एकदम बदलत्या उधारीवर माल नेणाऱ्याने बरीच मोठी रक्कम थकित ठेवली, एखाद्या ग्राहकाचे दिवाळे निघाले तर व्यापाऱ्याला चांगला आर्थिक फटका बसतो आणि त्याला नुकसान सहन करावे लागते.

3. आर्थिक जोखीम (Financial Risk)

आर्थिक कारणांमुळे निर्माण होणारी जोखीम म्हणजे आर्थिक जोखीम होय. या प्रकारच्या जोखीमीचे प्रमुख कारण म्हणजे बाजारातील मागणी-पुरवठा यातील संतुलन बिघडण्याने किंमतीत होणारा उतार-चढाव होय. आर्थिक जोखीमीचे समय जोखीम, स्थळ जोखीम आणि स्पर्धा जोखीम असे उपप्रकार पाडता येतात.

i. समय जोखीम (Time Risk)

आर्थिक जोखीम जेव्हा वेळ बदलल्याने किंवा अवधी कमी-जास्त झाल्याने निर्माण होते तेव्हा अशा जोखीमीला समयामुळे निर्माण होणारी जोखीम असे म्हणतात. उत्पादक उत्पादन कार्य जेव्हा चालू करतो तेव्हाची परिस्थिती आणि प्रत्यक्ष बाजारात विकावयास जेव्हा ती वस्तू नेतो तेव्हाची परिस्थिती यात फरक पडल्याने ही जोखीम निर्माण होते.

मधल्या काळात तो आवडीनिवडी, वातावरण, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती, कच्च्या मालाच्या किंमती इत्यादीत बदल झाल्याने किंवा नवीन शोध वगैरे लागून अधिक चांगली व स्वस्त वस्तू मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने बाजारातील मागणी एकदम कमी होते, उत्पादन खर्च वाढतो आणि तोटा येतो.

उत्पादन आणि प्रत्यक्ष विक्री या दोन क्रियेत जेवढा अधिक काळ जात असेल तेवढी ही जोखीम जास्त असते. बऱ्याचशा किंमती वस्तू अशा आहे की, ज्या कारखान्यातून तयार होऊन बाहेर पडण्यास बराच अवधी लागतो. अशा वस्तूंच्या बाबतीत समय जोखीम अधिक असण्याची अधिक शक्यता असते.

ii. स्थळ जोखीम (Site/Location Risk)

समय जोखीम समयामुळे निर्माण होते तर स्थळ जोखीम स्थल भिन्नतेमुळे निर्माण होते. जशी दोन विभिन्न समयी समान परिस्थिती नसते, तशी विभिन्न ठिकाणीही समान परिस्थिती नसते. दोन वेगवेगळ्या ठिकाणी मागणी पुरवठ्याची वेगवेगळी स्थिती असते. एका ठिकाणी अपेक्षेपेक्षा किंमत कमी असते तर दुसऱ्या ठिकाणी जास्त असते.

जर दोन्हीतील फरक समान असला तर जोखीमीचे प्रमाण कमी असते, वास्तविक अशी स्थिती अभावानेच आढळते. त्यामुळे अशी जोखीम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विदेशात जेव्हा मालाची विक्री केली जाते तेव्हा तेथील परिस्थितीचे संपूर्ण ज्ञान असणे शक्य नसते. त्यामुळे अंदाजाचा वस्तुस्थितीशी फरक पडून व्यापाऱ्याला नुकसान सहन करावे लागते. उत्पादनाच्या आणि विक्रीच्या स्थलातील अंतर जेवढे जास्त तेवढी जोखीमही जास्त असते.

iii. स्पर्धा जोखीम (Competition Risk)

परिपूर्ण स्पर्धेचा काळ आता दृष्टिआड गेला असला तरी त्याचा अर्थ असा नव्हे की, बाजारात स्पर्धेचा अभाव आहे. तसे पाहिले तर अर्थव्यवस्थेच्या सुदृढ विकासासाठी आणि उत्पादक व उपभोक्ता या दोघांच्याही हितासाठी स्पर्धा ही आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा-

Related Posts