मेनू बंद

ना. सी. फडके – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक ना. सी. फडके यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Na Si Phadke यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

ना. सी. फडके -  Na Si Phadke Information in Marathi

नारायण सीताराम फडके हे महाराष्ट्रातील लेखक होते. त्यांनी मूळ मराठी आणि इंग्रजीतही लिखाण केले आहे. 1919 ते 1920 या काळात त्यांनी मराठा वृत्तपत्राचे सहाय्यक संपादक म्हणून काम केले. 1926 ते 1951 या काळात ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. त्या काळात त्यांनी रत्नाकर, झंकार आणि अंजली या मासिकांचे संपादनही केले. निवृत्तीनंतर ते महाराष्ट्रातील पुणे शहरात स्थायिक झाले आणि लेखन सुरूच ठेवले.

ना. सी. फडके

‘ मराठीतील युगप्रवर्तक कादंबरीकार ‘ व ‘ लघुनिबंध ‘ या वाङ्मयप्रकारचे आद्य प्रवर्तक नारायण सीताराम फडके यांचा जन्म ४ ऑगस्ट, १८९४ रोजी झाला. नारायण सीताराम फडके यांचा जन्म ४ ऑगस्ट १८९४ रोजी झाला. फडके यांचे शिक्षण सातारा जिल्ह्यातील वडूज, बार्शी आणि पुणे येथे झाले. 1917 मध्ये त्यांनी M.A. पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर फडके प्राध्यापक म्हणून काम करू लागले.

1920 मध्ये काँग्रेसने असहकार आंदोलन सुरू केले तेव्हा फडके यांनीही राजीनामा दिला. काही काळ त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ वृत्तपत्रांमध्ये उपसंपादक म्हणून काम केले. तथापि, ते लवकरच शिक्षकी पेशात परतले. तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये काम केले.

ना सी फडके यांची पहिली कादंबरी कोणती

ना सी फडके यांची पहिली कादंबरी ‘ अल्ला हो अकबर ‘ (१९१७) ही आहे. ‘ अल्ला हो अकबर ‘ १९१७ या कादंबरीने फडक्यांनी आपल्या कादंबरीलेखनाला प्रारंभ केला. त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात एका नव्या युगाची सुरुवात झाली असे समजले जाते. चित्ताकर्षक व मोहक भाषाशैली प्रणयरम्यता ही फडक्यांच्या कादंबऱ्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होत; त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या वाचकांत, विशेषतः तरुणवर्गात खूपच लोकप्रिय झाल्या. मराठीतील आघाडीचे कादंबरीकार या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.

Na Si Phadke Information in Marathi

मराठीत लघुनिबंध – लेखनाची सुरुवातही खऱ्या अर्थाने Na Si Phadke यांच्या ‘ गुजगोष्टी ‘ पासून झाली. गुजगोष्टीच्या रूपाने त्यांनी आदर्श लघुनिबंधाचा वस्तुपाठच पुढे ठेवला असे म्हणता येईल. पुढील काळात लघुनिबंध – लेखनाच्या बाबतीत मराठीतील बऱ्याच लेखकांनी फडक्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाहावयास मिळते. कादंबरी आणि लघुनिबंध यांशिवाय लघुकथा, नाटक यांसारखे वाङ्मयप्रकार फडके यांनी हाताळले आहेत;. पण नाटकाच्या क्षेत्रात त्यांना फारसे यश मिळाले नाही. समीक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध होते.

साहित्याच्या प्रयोजनाच्या संदर्भात त्यांनी ‘ कलेसाठी कला ‘ हा पक्ष घेतला होता. त्यांच्या बहुतेक सर्व वाङ्मयाचा भरही प्रामुख्याने लोकरंजना होता. फडके यांची १९४० मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. भारत सरकारने १९६२ मध्ये ‘ पद्मभूषण ‘ हा किताब देऊन त्यांच्या साहित्याच्या क्षेत्रातील कामगिरीचा उचित गौरव केला होता. मृत्यू – २२ ऑक्टोबर, १९७८.

ना सी फडके कादंबरी नावे

  1. अल्ला हो अकबर
  2. कुलाब्याची दांडी
  3. दौलत
  4. प्रवासी
  5. मधुरेचे रहस्य
  6. झेलम
  7. जादूगार
  8. अटकेपार
  9. निरंजन
  10. उद्धार
  11. अखेरचं बंड
  12. एक होता युवराज
  13. गुजगोष्टी
  14. नव्या गुजगोष्टी
  15. धूम्रवलये
  16. माझे जीवन

ना सी फडके कथासंग्रह

  1. प्रतिभासाधन
  2. प्रतिभाविलास
  3. साहित्य आणि संसार
  4. तंत्र आणि मंत्र

हे सुद्धा वाचा –

Related Posts