आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक नरसिंह चिंतामण केळकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Narasimha Chintaman Kelkar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

नरसिंह चिंतामण केळकर माहिती मराठी
‘साहित्यसम्राट’ नरसिंह चिंतामण केळकर यांनी महाराष्ट्राच्या साहित्य, राजकारण आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1872 रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोडेनिंब गावात झाला. केळकरांचे शिक्षण मिरज, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा विविध गावांमध्ये झाले. B. A., L.L. B. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली.
१८९५ मध्ये त्यांनी सातार्यात कायद्याचा सराव सुरू केला. तथापि, १८९६ मध्ये ते लोकमान्य टिळकांचे सहकारी, त्यांच्या वकिली वर्गाचे शिक्षक आणि मराठा वृत्तपत्राचे संपादक म्हणून पुण्यात आले. अल्प कालावधीचा अपवाद वगळता १९१८ पर्यंत मराठाचे संपादकत्व केळकरांकडे होते. टिळक तुरुंगात असल्याने त्यांनी १८९७ पासून मराठ्यांसह केशराचे संपादन सुरू केले. टिळकांच्या सुटकेनंतर केशरचे संपादन टिळकांकडे गेले (१८९९).
केळकरांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या हाताखाली व मार्गदर्शनाखाली झाली. लोकमान्य टिळकांनी चालविलेल्या ‘ केसरी ‘ व ‘ मराठा ‘ या वृत्तपत्रांच्या संपादनकार्यात टिळकांना मदत करण्याची जबाबदारी केळकरांनी उचलली. पुढे ‘ मराठा ‘ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम ते करू लागले. सन १८९७ मध्ये टिळक तुरुंगात गेल्यावर ‘ केसरी ‘ च्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी काही काळ सांभाळली.
जानेवारी 1929 मध्ये त्यांनी ते पुन्हा ताब्यात घेतले. टिळकांना 1908 मध्ये शिक्षा झाली आणि ‘द टिळक केस’ या लेखासाठी त्यांना 14 दिवस तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला. 1912 आणि 1918 मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अनुक्रमे उपाध्यक्ष व अध्यक्ष होते.
पुढील काळात टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात केसरी चे संपादक म्हणून नरसिंह चिंतामण केळकर आणि खाडिलकर यांनीच काम केले. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर ‘ केसरी ‘ ची सर्व सूत्रे केळकरांच्या हाती आली. लोकमान्य टिळक यांच्या हयातीत टिळकांच्या राजकीय विचारांचा व त्यांच्या राजकारणाचा केळकरांवर मोठाच प्रभाव होता. टिळकांच्या राजकीय कार्यात केळकरांचा सक्रिय सहभाग होता. लोकमान्यांचे राजकीय मदतनी म्हणून त्यांनी कार्य केले होते. टिळकांच्या प्रमुख सहकाऱ्यांत त्यांची गणना केली जात होती. लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर देशाच्या राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींच्या नेतृत्वाचा उदय झाला.
Narasimha Chintaman Kelkar Information in Marathi
१९२० मध्ये त्यांन असहकाराची चळवळ सुरू केली. Narasimha Chintaman Kelkar या चळवळीत सहभागी झाले. महात्मा गांधींना त्यांनी सर्वतोपरी साथ दिली; त्यामुळे काँग्रेसचे ‘ महाराष्ट्रातील एक आघाडीचे नेते ‘ म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ मागे घेतल्यावर चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, नरसिंह चिंतामण केळकर इत्यादी नेत्यांनी ‘ स्वराज्य पक्षाची स्थापना केली आणि ‘ प्रतियोगी सहकारिते ‘ च्या राजकारणाचा पाठपुरावा केला. कायदेमंडळात प्रवेश करून तेथे सरकारची अडवणूक करण्याचा प्रयत्न करणे, हे स्वराज्य पक्षाच्या नेत्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. पुढे केळकर काँग्रेसमधून बाहेर पडले आणि हिंदू महासभेत सहभागी झाले. सन १९३२ नंतर ते प्रत्यक्ष राजकारणातून निवृत्त झाले.
चरित्रलेखन न. चिं. केळकरांनी साहित्याच्या क्षेत्रातही मोठीच कामगिरी बजावली. नाटक, निबंध, टीका, इत्यादी वाङ्मयप्रकारांत त्यांनी मोठेच यश मिळविले होते. त्यांचे ‘ तोतयाचे बंड ‘ हे नाटक मराठी रंगभूमीवर खूपच यशस्वी झाले होते. राजकारण, तत्त्वज्ञान, इतिहास इत्यादी अनेक विषयांत त्यांना गती होती आणि त्या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण असे अनेक ग्रंथही लिहिले होते. विनोदी लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध होते.
केळकरांचा विनोद स्वतंत्र बुद्धीचा, मनमोकळा व प्रासादिक असा होता. केळकरांनी कादंबरी व काव्य हे वाङ्मयप्रकार हाताळण्याचाही प्रयत्न केला होता; परंतु त्यामध्ये त्यांना फारसे यश लाभले नाही. ‘ साहित्यसम्राट ’ न. चिं. केळकर यांनी काही काळ ‘ सह्याद्री ‘ हे मासिकही चालविले होते. सन १९२१ मध्ये बडोदे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. नरसिंह चिंतामण केळकर यांचा मृत्यू १४ ऑक्टोबर, १९४७ रोजी झाला.
पुस्तक आणि लेखन
- तोतयाचे बंड
- इंग्रज व मराठे
- सुभाषित आणि विनोद
- हास्यविनोद मीमांसा
- गतगोष्टी – आत्मवृत्त
- लोकमान्य टिळक यांचे चरित्र
- अमात्य – माधव
- कृष्णार्जुन
- युद्ध ही नाटके
हे सुद्धा वाचा –