मेनू बंद

नारायण सुर्वे – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक नारायण सुर्वे यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Narayan Surve यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

नारायण सुर्वे

नारायण सुर्वे कोण होते

नारायण गंगाराम सुर्वे हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८ चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. सुर्वे हे मराठीताल एक लोकप्रिय कवी म्हणून ओळखले जातात. बा. सी. मर्ढेकर यांच्यानंतरच्या पिढीतील एक जीवनवादी कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. नारायण सुर्वे यांचे संपूर्ण नाव नारायण गंगाराम सुर्वे असे आहे. त्यांचा जन्म १९२६ मध्ये झाला. जन्म होताच अनाथ झालेल्या या मुलास गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने वाढविले. जातिपातीपलीकडील अलौकिक प्रेमाची ओळख सुर्वेना या घरातच झाली.

त्यांचे बालपण अतिशय खडतर व प्रतिकूल परिस्थितीत व्यतीत झाले . पुढील काळातही त्यांना सतत परिस्थितीशी संघर्ष करीतच जीवन जगावे लागले. त्यांचे संपूर्ण आयुष्य मुंबईच्या कामगार वस्तीत गेले. मुंबईच्या एका कापड गिरणीत साधा कामगार म्हणून त्यांनी नोकरी केली होती. पुढे शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले.

Narayan Surve Information in Marathi

Narayan Surve यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव आहे. कॉ. डांगे, कॉ. मिरजकर हे त्यांचे आदर्श होत; त्यामुळे त्यांनी आपल्या कवितांमधून सामाजिक क्रांतीचा उद्घोष केला आहे. अशा प्रकारच्या क्रांतीतूनच समाजातील दलित व श्रमजीवी वर्गाला न्याय देणारी नवी व्यवस्था निर्माण होऊ शकेल, असा आशावाद तथापि, सुर्वे यांचा मार्क्सवाद येथील मातीशी जुळणारा मार्क्सवाद आहे.

कामगार जीवनातील सुखदुःखांचा Narayan Surve यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला असून हा अनुभवच त्यांच्या काव्यलेखनामागील खरी प्रेरणा आहे. कामगार जीवनाची बोलीभाषा हीच त्यांच्या काव्याची भाषा आहे आणि म्हणूनच त्यांच्या कवितेला एक आगळे तेज व जोश प्राप्त झाला आहे. त्यांची कविता जीवनातील वास्तवतेचे भान ठेवणारी परंतु तरीही आशावादी आहे.

माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. कष्टकरी वर्गाच्या काळजाची तार नेमकी कशामुळे छेडली जाते , हे त्यांना अनुभवाने माहीत आहे. या वर्गाचे भाकरीचे प्रश्न त्यांनी अनुभवले आहेत- भोगले आहेत. भाकरीच्या प्रश्नावरून सर्वसामान्य जनांचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून जाति – धर्माचे प्रश्न उभे करून समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना सुर्वेंनी कायम विरोधच केला आहे.

पुरस्कार व सन्मान

नारायण सुर्वे यांच्या ‘ माझे विद्यापीठ ‘ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिकही प्राप्त झाले आहे. त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी, गुजराती, इंग्रजी, रशियन इत्यादी भाषांत अनुवाद झाले आहेत . सन १९९ ५ मध्ये परभणी येथे भरलेल्या अडसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा सन्मानही त्यांना लाभला.

मध्य प्रदेश शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कबीर सन्मानाचेही ते १९९९ चे मानकरी होत. भारताच्या इतिहासातील पहिल्या धर्मनिरपेक्षतावादी कवीच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान सुर्वे यांच्यासारख्या आयुष्यभर धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वास वाहून घेणाऱ्या कवीस लाभावा हा एक अलौकिक योगायोगच होय.

कबीरापासून कुसुमाग्रजांपर्यंत खळाळत वाहणाऱ्या या काव्यगोदेच्या काठी वसलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठाननेही सन २००४ चा ‘ जनस्थान पुरस्कार ‘ प्रदान करून सगळीकडेच साकळलेल्या झाकोळातून डोकावणाऱ्या या काव्यसूर्याला एक प्रकारे अर्ध्यच अर्पण केले आहे. नारायण सुर्वे यांचा मृत्यू १६ ऑगस्ट, २०१० ला झाला.

नारायण सुर्वे यांचे पुस्तक, ग्रंथ व साहित्य

कवितासंग्रह

  • ऐसा गा मी ब्रह्म
  • जाहीरनामा
  • माझे विद्यापीठ
  • सनद

हे सुद्धा वाचा –

Related Posts