राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ म्हणजेच National Small Industries Corporation (NSIC) ची स्थापना सन 1955 मध्ये करण्यात आली. या महामंडळाची संपूर्ण मालकी मध्यवर्ती सरकारची आहे व या महामंडळाचा उद्देश लघुउद्योगांचा विकास घडवून आणणे हा आहे. या महामंडळाची मुख्य कचेरी दिल्ली येथे असून त्याच्या शाखा मुंबई, चेन्नई व कोलकता येथे असून इतरही काही शहरांमध्ये या महामंडळाची उप- कार्यालये आहेत. हे महामंडळ ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया’च्या अंतर्गत येते.

राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे भांडवल (Capital of National Small Industries Corporation)
या महामंडळाचे वसूल भांडवल ₹ 7.5 कोटी आहे. हे महामंडळ आपली वित्तीय साधनसामग्री मध्यवर्ती सरकारकडून कर्जे व देणग्या, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जे व परकीय कर्जे यामार्फत वाढवू शकते. अमेरिका, इंग्लंड, पश्चिम जर्मनी, जपान व डेन्मार्क या देशांकडून या महामंडळाला वित्तीय मदत मिळाली आहे.
NSIC च्या मदतीचे स्वरूप
National Small Industries Corporation लघुउद्योगांना प्रत्यक्ष वित्तीय मदत देत नाही; त्यांच्या विकासाला अप्रत्यक्षपणे विविध प्रकारे मदत करते. हे महामंडळ लघुउद्योगांना पुढीलप्रमाणे अप्रत्यक्षपणे मदत देते –
- हप्त्याने यंत्रसामग्री विकत घेण्यास मदत
- सरकारकडून लघुउद्योगांच्या मालासाठी खरेदीच्या ऑर्डर्स मिळविणे.
- ओखा, राजकोट, मद्रास व हावरा येथे ज्या प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत तेथे लघुउद्योजकांच्या शिक्षणाची सोय करणे.
- औद्योगिक वसाहतीची व्यवस्था पाहणे.
- लघुउद्योगांना आवश्यक असणाऱ्या पण सापेक्षतेने दुर्मीळ कच्च्या मालाचा पुरवठा करणे.
- लघुउद्योगांमध्ये तयार झालेल्या वस्तूंच्या निर्यातीस मदत करणे.
हे सुद्धा पहा-