मेनू बंद

खाजगीकरण म्हणजे काय?

खाजगीकरण म्हणजे काय, या आर्टिकल मध्ये आपण विस्ताराने जाणून घेणार आहोत.भारतातील Privatization म्हणजे खाजगीकरणाची सुरुवात 1980 च्या दशकात जेव्हा राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून 1985 मध्ये सरकार स्थापन केले तेव्हा झाली. परंतु खाजगीकरणाला गती देण्याचे कार्य पी. व्ही. नरसिंह राव सरकारने 1991 पासून केले. त्याकरिता त्यांनी नवीन ‘औद्योगिक धोरण 1991’ जाहीर केले.

खाजगीकरण म्हणजे काय?

खाजगीकरण म्हणजे काय

खाजगीकरण (Privatization) म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचे खाजगी क्षेत्रात पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तन करणे होय. खाजगीकरणाअंतर्गत सरकार उत्पादन प्रक्रियांचे सार्वजनिक क्षेत्राकडून खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरण करते. संकुचित अर्थाने खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक मालकीऐवजी खाजगी मालकी प्रस्थापित करणे, तर विस्तृत अर्थाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे व्यवस्थापन व नियंत्रण खाजगी क्षेत्राकडे घेणे होय.

खाजगीकरण व्याख्या (Privatization Definition)

Barbara Lee आणि John Nellis यांच्या मते ‘खाजगीकरण ही एक सर्वसाधारण प्रक्रिया आहे. याद्वारे सार्वजनिक मालकीच्या उद्योगात खाजगी मालकी किंवा कार्यपद्धती समाविष्ट होते.’ यावरून खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक मालकीच्या उद्योग संस्थांची अंशतः किंवा पूर्णतः विक्री खाजगी समावेश होतो, जे व्यवस्थापनाचे करार, भाडेपट्ट्यांचे करार किया विशेष हक्क्यांच्या व्यवस्थेद्वारे केले जाते.

खाजगीकरणाचे टप्पे (Stages of Privatization)

 1. 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रासाठी 17 उद्योग राखीव ठेवण्यात आले होते. यावेळी उद्योगांची विभागणी 3 अनुसूचीमध्ये केली-
  • सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग (Public Sector Undertakings -PSUs)
  • खाजगी क्षेत्रातील उद्योग
  • संयुक्त क्षेत्रातील उद्योग
 2. 1980 नंतर राजीव गांधींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खाजगीकरणाची लाट आली.
 3. 1991 च्या औद्योगिक धोरण अंमलबजावणीत सरकारकडून पहिल्या वर्षी 25000 को. रु. चे सार्वजनिक उद्योगांचे समभाव वित्तीय संस्थांना विकण्यात आले.
 4. 1991 च्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या 8 इतकी केली, तर सध्या 3 उद्योग राखीव आहेत.
 5. 1997-98 च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील 9 उत्कृष्ट कार्यक्षमता असणाऱ्या उद्योगांना नवरत्नांचा दर्जा दिला गेला. या उद्योगांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापकीय स्वायत्तता देण्यात आली. सध्या या उद्योगांची संख्या 16 वर पोहोचली आहे.

भारतातील खाजगीकरणाचे परिणाम (Implications of Privatization in India)

खाजगीकरणाचे फायदे (Benefits of Privatization)

ग्राहकांना चांगल्या सोयी व सुविधा, वाया जाणाऱ्या घटकांवर नियंत्रण उत्कृष्ट कार्यक्षमता आणि कामगिरी, ग्राहकांच्या सेवांमध्ये मानवतेचा स्पर्श आणि हानीवर नियंत्रण इत्यादी खाजगीकरणाचे अनुकूल परिणाम झालेले दिसून येतात.

खाजगीकरणाचे तोटे (Side Effects of of Privatization)

नफा मिळविण्याच्या उद्देशाने समाजहितावर प्रतिकूल परिणाम, बेरोजगारीची समस्या, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आणि मक्तेदारीची भीती, आवश्यक वस्तूंऐवजी सुखसोई आणि चैनीच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक आणि उत्पादक कार्यक्षमतेच्या अपूर्ण वापराची समस्या इत्यादी खाजगीकरणाचे तोटे आहेत.

हे सुद्धा वाचा-

Related Posts