आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Ramkrishna Gopal Bhandarkar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे भारतीय विद्वान, प्राच्यविद्यावादी आणि समाजसुधारक होते. रामकृष्ण भांडारकर यांनी त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन कारकिर्दीत एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई आणि डेक्कन कॉलेज पुणे येथे अध्यापन केले. ते आयुष्यभर संशोधन आणि लेखनात गुंतले होते. ते 1894 मध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवृत्त झाले.
रामकृष्ण गोपाळ भांडारकर माहिती
प्रार्थना समाजाचे प्रमुख कार्यकर्ते व आधारस्तंभ म्हणून रा. सरकार भांडारकर महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण गोपाळ भांडारकर होते. भांडारकर यांचा जन्म 6 जुलै 1837 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला.
त्यांचे मूळ आडनाव पत्की; पण त्यांच्या पूर्वजांनी कोषागार अधिकारी म्हणून काम केले होते; त्यावरून त्यांना भांडारकर हे नाव पडले. सुधारणावादी विचारसरणीचे धडे त्यांना घरातूनच शिकवले गेले. त्यांचे चुलत बंधू विनायक भांडारकर हे सुधारक आणि वैधव्याचे पुरस्कर्ते होते.
भांडारकर यांनी आपल्या घराण्याची ही समाजसुधारणेची परंपरा पुढे नेली. भांडारकर हे समाजसुधारक म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्या कार्याचा आवाका फारच व्यापक होता, असे डॉ. थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत अभ्यासक, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक, धर्म सुधारक आणि समाज सुधारक म्हणून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. भांडारकर हे उच्चशिक्षित होते. मुंबई विद्यापीठातून एम.ए. ची पदवी मिळवली होती.
पुढील काही वर्षे त्यांनी सिंध प्रांतातील हैदराबाद आणि रत्नागिरी येथील हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केले. नंतर त्यांची एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई आणि डेक्कन कॉलेज, पुणे येथे संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
Ramkrishna Gopal Bhandarkar Information in Marathi
Ramkrishna Bhandarkar यांनी इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती या विषयांत महत्त्वपूर्ण संशोधन करून त्यासंबंधी विपुल लेखन केले आहे. ‘ धर्म ‘ हादेखील त्यांच्या आस्थेचा व चिंतनाचा एक महत्त्वाचा विषय होता. इतिहासाचे संशोधक म्हणून त्यांना व्यापक मान्यता लाभली होती. जर्मनीमधील ‘ गटिंग्टन ‘ विद्यापीठाने त्यांच्या संशोधनकार्याबद्दल त्यांना पीएच. डी. ही मानाची पदवी बहाल केली होती. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा मृत्यू २४ ऑगस्ट, १९२५ रोजी पुणे येथे झाला.
सन १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजा’ची स्थापना झाली. त्याच्या संस्थापकांत दादोबा पांडुरंग, डॉ. आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती चंदावरकर, वामन आबाजी मोडक यांसारख्या सुधारकांच्या बरोबरीनेच डॉ. रा. गो. भांडारकर यांचा अंतर्भाव केला जातो. प्रार्थना समाजाच्या संस्थापकांवर ब्राह्मो समाजाचा प्रभाव होता. त्यामुळे त्याची तत्त्वे ब्राह्मो समाजाच्या तत्त्वांशी बरीचशी मिळतीजुळती होती.
दादोबा पांडुरंग यांनी त्याअगोदर स्थापन केलेल्या परमहंस सभेच्या तत्त्वांचाही प्रार्थना समाजावर प्रभाव होता. प्रार्थना समाजाची तत्त्वे व उद्दिष्टे निश्चित करण्यात दादोबा पांडुरंग यांच्याप्रमाणेच डॉ. भांडारकरांचाही सहभाग होता. प्रार्थना समाजाची प्रतिज्ञा तयार करण्याच्या कार्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. म्हणूनच डॉ. भांडारकर यांना ‘ प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक ‘ असे म्हटले जाते.
प्रार्थना समाजाला मूर्तिपूजा मान्य नव्हती. ईश्वर हा एकच आहे व तो निराकार आहे, तेव्हा शुद्ध अंतःकरणाने ईश्वराची प्रार्थना करणे हाच त्याच्या उपासनेचा सर्वोत्तम मार्ग होय. तसेच परमेश्वराची प्रार्थना ही कोणत्याही भौतिक फलप्राप्तीसाठी करावयाची नसून ती केवळ आत्मिक उन्नतीसाठीच करावयाची आहे, असे प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान सांगते. त्या आधारेच या समाजाच्या संस्थापकांनी समाजसुधारणेचा पुरस्कार केला होता.
त्यांनी हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, अवतारकल्पना, बहुदेवतावाद इत्यादी गोष्टींना विरोध केला होता आणि या धर्मातील खुळचट कल्पना व अनिष्ट रूढी दू करण्याविषयी आग्रह धरला होता; पण हिंदू धर्मातून फुटून निघण्याचे धोरण मात्र त्यांना मान्य नव्हते. हिंदू धर्मात राहूनच त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा विचार त्यांनी केला होता. डॉ. भांडारकरांनी प्राचीन धर्मग्रंथ व संस्कृत भाषा यांच्या अध्ययनाचा उपयोग या कामी करून घेतला होता. प्राचीन वेद, उपनिषदे, भगवद्गीता यांसारख्या ग्रंथांतील तसेच संतवाङ्मयातील वचनांचा आधार घेऊन त्यांनी समाजसुधारणेच्या प्रयत्नांचे समर्थन केले आणि त्यासंबंधी अनेक लेख प्रसिद्ध केले.
रामकृष्ण गोपाळ भांडारकर सामाजिक कार्य
डॉ.भांडारकर यांनी विविध सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला होता. बालविवाह आणि विधवा पुनर्विवाह रोखण्याचे त्यांनी जोरदार समर्थन केले. हिंदू धर्मातील बालविवाहाच्या प्रथेला आळा घालण्यासाठी सरकारने लग्नाच्या वेळी मुलगा आणि मुलगी यांचे किमान वय असावे, असा कायदा करावा, अशी मागणी समाजसुधारकांनी केली होती. या मागणीला भांडारकर यांनी पाठिंबा दिला. याशिवाय त्यांनी स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निवारण, दारूबंदी, देवदासी बंदी इत्यादी सामाजिक सुधारणांचाही पुरस्कार केला होता.
त्या वेळच्या अनेक समाजसुधारकांप्रमाणे डॉ. भांडारकर यांनाही काही प्रसंगी समाजाच्या रोषास बळी पडावे लागले होते; परंतु त्याची जराही पर्वा न करता डॉ. भांडारकरांनी समाजसुधारणेसंबंधीचे आपले विचार निर्भीडपणे लोकांपुढे मांडण्याचे कार्य चालूच ठेवले. सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे डॉ. भांडारकर हे कर्ते समाजसुधारक होते. सामाजिक सुधारणेसंबंधी त्यांनी जे विचार लोकांपुढे मांडले ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. विधवाविवाहाचा त्यांनी पुरस्कार तर केलाच; पण स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला.
अशा प्रकारे उक्ती व कृती यांमधील एकवाक्यता त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणाने सिद्ध करून दाखविली. डॉ. भांडारकरांनी समाजसुधारणेच्या व संशोधनाच्या क्षेत्रात केलेल्या मौलिक कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले होते. ते मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सभासद होते. केंद्रीय लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सभासद म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती.
सन १९११ मध्ये त्यांना ‘ सर ‘ हा किताब देऊन ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला होता. भांडारकरांविषयीचा आपला आदरभाव प्रकट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या काही मित्रांनी व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ६ जुलै, १९१७ रोजी ‘ भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ‘ या संस्थेची स्थापना केली.
भांडारकर यांच्या प्रशंसक आणि बौद्धिक अनुयायांनी, सर रतन टाटा आणि सर दोराबजी टाटा यांच्या सहकार्याने, तसेच मुंबई प्रशासनाच्या मदतीने, पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र (Bhandarkar Oriental Research Institute) ची स्थापना केली, ज्याचे उद्घाटन जुलै 1917 मध्ये मुंबईचे राज्यपाल लॉर्ड विलिंग्डन यांच्या हस्ते झाले. ज्याचे भांडारकर यांचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली. जी संस्था आजही अस्तित्वात आहे.
रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची ग्रंथसंपदा
- ए पीप इन टू द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया
- कलेक्टेड वर्क्स ऑफ़ आर. जी. भांडारकर
- अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन
- वैष्णविझम
- शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स
हे सुद्धा वाचा –