मेनू बंद

रणजित देसाई – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक रणजित देसाई यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Ranjit Desai यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

रणजित देसाई

रणजित देसाई कोण होते

रणजीत देसाई हे महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी लेखक होते. ते त्यांच्या स्वामी आणि श्रीमान योगी या ऐतिहासिक कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना 1964 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि 1973 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे संपूर्ण नाव रणजित रामचंद्र देसाई असे होते. त्यांचा जन्म ८ एप्रिल, १९२८ रोजी झाला.

रणजित देसाई यांनी कथा, कादंबरी, नाटक इत्यादी वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. मराठीतील अलीकडील काळातील लोकप्रिय कादंबरीकारांमध्ये त्यांची गणना होते, ऐतिहासिक विषयांवरील त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या आहेत.

Ranjit Desai Information in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर Ranjit Desai यांनी लिहिलेली ‘श्रीमान योगी’ आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर लिहिलेली ‘ स्वामी ‘ या दोन कादंबऱ्या अतिशय लोकप्रिय ठरल्या. ‘ स्वामी ‘ या त्यांच्या कादंबरीमुळे तर ते ‘ स्वामी ‘ कार म्हणूनच प्रसिद्ध पावले. आकर्षक भाषाशैली , घटना – प्रसंगांची नाट्यपूर्ण व प्रभावी मांडणी आणि भावनोत्कटता ही रणजित देसाईच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.

Ranjit Desai यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाने काही काळ त्यांनी मराठी वाचकांच्या मनावर मोठीच मोहिनी घातली होती. एक कथालेखक व नाटककार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांच्या ‘ स्वामी ‘ या कादंबरीला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते. भारत सरकारने १९७३ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा उचित गौरव केला होता. रणजित देसाई यांचा मृत्यू ६ मार्च, १९९२ ला झाला.

रणजित देसाई यांचे पुस्तक, ग्रंथ व साहित्य

कादंबरी

  • स्वामी
  • श्रीमान योगी
  • माझा गाव

कथासंग्रह

  • रूपमहाल
  • कणव
  • मोरपंखी सावल्या

नाटक

  • गरुडझेप
  • हे बंध रेशमाचे
  • रामशास्त्री

हे सुद्धा वाचा –

Related Posts