मेनू बंद

माणिक रत्नाचे फायदे आणि तोटे

Ruby stone benefits and side effects in Marathi: माणिक रत्न (Manik Ratna) किंवा रुबी स्टोन हा गुलाबी ते लाल रंगाचा मौल्यवान रत्न आहे. हा एक विशेष प्रकारचा एल्युमिनियम ऑक्साईड आहे. त्याचा लाल रंग त्यात असलेल्या क्रोमियममुळे आहे. याचे नाव ‘Ruby’ लॅटिन शब्द ‘Ruber’ वरून आले आहे, ज्याचा अर्थ लाल आहे. खगोलशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्रात या रत्नाला विशेष महत्त्व आहे. या लेखात आपण माणिक रत्नाचे फायदे आणि तोटे काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

माणिक रत्नाचे फायदे आणि तोटे (Ruby stone benefits and side effects in Marathi)

रुबी हा सर्व रत्नांपैकी सर्वात सुंदर मानला जाता. ज्योतिषशास्त्रानुसार रुबी स्टोन सर्वोत्तम मानला जातो. हा लाल रंगाचा खूप महागडा रत्न असतो. बहुतेक माणिक रत्ने दागिन्यांच्या बांगड्या, नेकलेस, अंगठ्या यांसारखे दागिने बनवण्यासाठी वापरली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार माणिकरत्न सूर्याशी संबंधित मानला जातो. या रत्नात सकारात्मक उर्जा आढळते, ती धारण केल्यावर व्यक्तीला स्वतःमध्ये सकारात्मक उर्जेचा अनुभव येऊ लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार रुबी धारण करणाऱ्यांना चांगले नशीब प्राप्त होते.

माणिक रत्नाचे फायदे (Ruby Stone Benefits)

1. सुख-समृद्धी देतो माणिक रत्न (Ruby Gemstone Gives Happiness and Prosperity)

ज्या लोकांच्या आयुष्यात दु:खाचा आणि अडचणींचा डोंगर उभा असेल आणि सुखी संसाराची वाट ज्यांना दिसत नसेल, अश्यांसाठी हा Ruby Stone एक वाट दाखवणारा मार्गदर्शक ठरतो. माणिक रत्न तुम्हाला सुख-समृद्धीने भरभरून देतो आणि तुमच्या परिवारीतील चाललेल्या समस्येला दूर करण्यात हा रत्न फायदेशीर ठरतो.

2. आरोग्याच्या समस्या दूर करतो (Eliminates Health Problems)

ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमजोर आहे त्यांच्यासाठी रुबी स्टोन चांगला मानला जातो. पिलिया, डायरिया, हाई-लो ब्लड प्रेशर यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी हा रत्न खूप फायदेशीर आहे. माणिक रत्न धारण केल्याने तुम्हाला आरोग्याच्या समस्यांमध्ये फायदा होईल कारण सूर्य हा आरोग्याचा कारक आहे. हा तुमचा स्वाभिमान वाढवून तुम्हाला सदबुद्धी प्रदान करतो.

3. रचनात्मकता वाढवण्यासाठी उपयुक्त (Useful for Enhancing Creativity)

ज्योतिषांच्या मते, इंजीनियर, सोनार, कलाकार, सरकारी अधिकारी, स्टॉक ब्रोकर, कापड किंवा कापूस व्यापारी आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रातील लोकांसाठी माणिक रत्न अत्यंत फायदेशीर आणि प्रभावशाली मानला जातो. अश्या क्षेत्रामध्ये बुद्धीवर जोर द्यावा लागतो आणि हे रत्न तुम्हाला सदबुद्धी प्रदान करते तेव्हा रचनात्मकता क्षेत्रासाठी हे रत्न अत्यंत फायदेशीर ठरते.

4. नेतृत्व क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त (Useful for Enhancing Leadership Skills)

ज्योतिषशास्त्रानुसार, जो व्यक्ती माणिक रत्न धारण करतो त्याच्याकडे नेतृत्व क्षमता येते. ज्या लोकांचे क्षेत्र हे नेतृत्वाच्या समबंधीत आहे, अश्यासाठी हे रत्न वरदान मानले जाते. तसेच हे धारण केल्याने सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात पाठिंबा आणि कौतुक प्राप्त होते.

5. आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त (Useful For Boosting Confidence)

ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे त्यांनी ज्योतिषशास्त्रानुसार Ruby Stone धारण करावे. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. एवढेच नाही तर हे रत्न धारण केल्याने त्या व्यक्ति मधील गोंधळाची समस्या देखील दूर होते.

6. व्यक्तिमत्व विकासात मदत (Help in Personality Development)

ज्योतिषशास्त्रानुसार, रुबी स्टोनची उष्णता आणि तीव्रता व्यक्तीला सकारात्मक उर्जेने भरते. हे परिधान करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व बऱ्यापैकी सुधारते. हे धारण केल्याने दृष्टी आणि ब्लड प्रेशर ची समस्या सुधारते.

माणिक रत्नाचे नुकसान (Ruby Stone Side Effects)

1. Ruby Stone चा सूर्याशी संबंध असल्यामुळे आणि याच्या अयोग्य वापरामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हृदय आणि डोळ्यांच्या संबंधित आजार होऊ शकतात. या सर्वांसोबतच व्यक्तीमध्ये अहंकाराची भावना देखील जागृत होऊ शकते.

2. माणिक रत्न धारण व्यक्ति, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालू शकतो. जर मूळ व्यक्तीने हा रत्न नीट परिधान केला नाही तर तो आपल्या जीवनसाथीसोबतचे नाते बिघडू शकतो. जर तुम्ही माणिक्य रत्न नीट परिधान केले नाही तर तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

3. माणिक रत्न व्यक्तीच्या सेंसेटीव भावना, वागणूक आणि स्वभावात बदल घडवून आणू शकतो. रुबी स्टोनच्या दुष्परिणामांमुळे व्यक्ती योग्य-अयोग्य निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसते. त्यामुळे व्यक्ती विलासी जीवन जगू लागते. तो अधिकाधिक पैसा खर्च करू लागतो.

हे सुद्धा वाचा-

Related Posts