मेनू बंद

सागरी प्रवाह म्हणजे काय

सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत. त्यांचा विस्तार सामान्यपणे सागरमग्न खंडभूमीच्या सीमेपर्यंत आढळतो. उत्तर गोलार्धातील उत्तर पॅसिफिक व उत्तर अटलांटिकमध्ये मुख्य प्रवाह घड्याळकाट्याच्या दिशेला अनुसरून गोलाकार वाहतात. महासागरांच्या पश्चिम भागात ते उत्तरेकडे, तर पूर्व भागात ते दक्षिणेकडे वाहतात. दक्षिण गोलार्धात याच्या उलट परिस्थिती असते. सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला, तरी त्यांबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंड प्रमाणात असते. आपण या लेखात, सागरी प्रवाह म्हणजे काय पाहणार आहोत.

सागरी प्रवाह म्हणजे काय

सागरी प्रवाह म्हणजे काय

सागरी प्रवाह म्हणजे महासागरातील पाण्याची एका विशिष्ट दिशेने हालचाल होय. समुद्र आणि महासागराचे पाणी स्थिर नसून तीन प्रकारच्या हालचाली आहेत: भरती, समुद्राच्या लाटा आणि महासागर प्रवाह. त्यापैकी, सागरी प्रवाह ही प्रमुख हालचाल होय. समुद्राच्या एका भागातून दुसऱ्या भागात पाणी वाहत असते. तसेच सागरी प्रवाह सागरपृष्ठापासून सागरतळापर्यंत अभिसरण चालू राहते

सागरजलाचे तापमान, लवणता व घनतेतील तफावत इ. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रेरणांवर सागरी प्रवाहांची निर्मिती, त्यांची दिशा व आकार अवलंबून असतो. खंडांचे आकार व त्यांची सापेक्ष स्थाने, प्रवाळशैलभित्ती व प्रवाळबेटे, स्थानिक वारे या घटकांचाही सागरी प्रवाहांवर प्रभाव पडत असतो. या वेगवेगळ्या घटकांमधील भिन्नतेमुळे काही प्रवाह मोठे, काही लहान, काही कायमस्वरूपी, काही हंगामी, काही अधिक गती असणारे तर काही मंद गतीने वाहणारे आढळतात.

वाऱ्याचे घर्षणकार्य व दाबातील फरकाद्वारे कार्य करणारी गुरुत्वीय प्रेरणा ही सागरी प्रवाह निर्मितीची मूळ कारणे आहेत. त्याचप्रमाणे सागरपृष्ठाशी वाऱ्याकडून होणारे घर्षण आणि उभ्या व आडव्या दिशांत असणारा पाण्याच्या घनतेतील किंवा गुरुत्वातील फरक यांमुळे पाणी वाहण्यास सुरुवात होते.

सागरी प्रवाहाचे पृष्ठीय प्रवाह, घनतेतील फरकाने निर्माण झालेले प्रवाह, खोल सागरातील प्रवाह असे प्रकार पाडता येतात. समुद्राच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ व एकसारखा वारा वाहत असल्यास त्याच्या घर्षण कार्यामुळे काही ऊर्जा पाण्यात संक्रमित झाल्यामुळे सागरपृष्ठावरील पाणी प्रवाहित होते. यालाच ‘पृष्ठीय प्रवाह’ असे म्हणतात.

वाऱ्याचा प्रभाव सामान्यपणे सागरातील 100-200 मी. खोलीपर्यंतच्या पाण्यावर होतो. तसे असले तरी वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रवाहांचा विस्तार 1,000 मी. किंवा त्यापेक्षाही अधिक खोलीपर्यंत आढळतो. स्थूलमानाने असे प्रवाह प्रचलित वाऱ्याच्या दिशेला अनुसरून वाहत असले, तरी ते अगदी बरोबर वाऱ्याच्या दिशेने वाहत नाहीत.

हे सुद्धा वाचा –

Related Posts