मेनू बंद

समास म्हणजे काय | समासाचे प्रकार | Samas in Marathi Grammar

Samas in Marathi Grammar: मराठी व्याकरणामध्ये ‘समास’ हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात समास म्हणजे काय आणि समासाचे प्रकार किती आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया.

समास म्हणजे काय | समासाचे प्रकार | Samas in Marathi Grammar

समास म्हणजे काय

भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. दोन किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, ‘चंद्राचा उदय’ असे न म्हणता आपण ‘चंद्रोदय’ असे म्हणतो. ‘पोळीसाठी पाट’ असे न म्हणता आपण ‘पोळपाट’ असे म्हणतो. ‘बटाटे घालून तयार केलेला वडा‘ असे न म्हणता आपण ‘बटाटेवडा‘ असे म्हणतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणास ‘समास’ असे म्हणतात. ‘ सम् + अस् ‘ या संस्कृत धातूपासून ‘समास‘ हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ ‘एकत्र करणे‘ असा आहे.

समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्परसंबंध दाखविताना त्यातील विभक्तिप्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. समास ही देखील भाषेतील काटकसर आहे. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला ‘सामासिक शब्द‘ असे म्हणतात. हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करुन सांगतो. फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला ‘ विग्रह ‘ असे म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दांत सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय.

समासाचे प्रकार

समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात महत्त्व अधिक, म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपल्याला अधिक बोलावयाचे असते, यावरून समासाचे प्रकार ठरविण्यात आलेले आहेत; ते असे-

  1. पहिले पद प्रमुख असेल तर अव्ययीभाव समास.
  2. दुसरे पद प्रमुख असेल तर तत्पुरुष समास.
  3. दोन्ही पदे महत्त्वाची असतील तर ‘ द्वंद्व समास ‘
  4. दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध असेल तर बहुव्रीही समास.

1. अव्ययीभाव समास

जेव्हा समासातील पहिले पद बहुधा असून ते महत्त्वाचे असते व या सामाि शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा अव्ययीभाव समास होतो. यथाशक्ती – शक्तीप्रमाणे उदा. आजन्म जन्मापासून प्रतिदिन – प्रत्येक दिवशी प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला वरील उदाहरणांत ‘ आ, यथा, प्रति ‘ हे संस्कृतमधील उपसर्ग आहेत.

संस्कृतमध्ये उपसर्गांना अव्ययेच मानतात. हे उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले वरील शब्द हे सामासिक शब्द आहेत. त्यांचा वर दिल्याप्रमाणे विग्रह करताना या उपसर्गांच्या अर्थांना या सामासिक शब्दांत अधिक महत्त्व आहे. म्हणून या समासाला प्रथमपदप्रधान समास असे म्हणतात. शिवाय एकूण सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय आहे; म्हणून त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. संस्कृतप्रमाणे फारसी भाषेतील उपसर्ग प्रारंभी येऊन अव्ययीभाव समासाची उदाहरणे मराठीत पुष्कळ आहे.

उदा. दररोज, हरहमेश, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त, बरहुकूम, दरमजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर मराठीत शब्दांची द्विरुक्ती होऊन बनलेले जोडशब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापर जातात.

उदा . गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, रात्रंदिवस, पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली.

या शब्दांत संस्कृत किंवा फारसी अव्ययीभाव समासाप्रमाणे प्रारंभीचा शब्द अव्यय नाही. काही शब्दांतील प्रथमपदाच्या अंती ‘ओ’कार आलेला आहे . तरी एकंदरीत त्याचे स्वरूप क्रियाविशेषण अव्ययाचे असल्यामुळे ही मराठीतील अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत.

2. तत्पुरुष समास

ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास ‘तत्पुरुष समास’ म्हणतात.

उदा. तोंडपाठ (तोंडाने पाठ) , महादेव (महान असा देव), कंबरपट्टा (कंबरेसाठी पट्टा), अनिष्ट (नाही इष्ट ते)

तत्पुरुष समासातील दोन्ही पदे केव्हा केव्हा विग्रहाच्या वेळी एकाच विभक् असतात.

उदा. काळमांजर (काळे असे मांजर) यास ‘समानाधिकरण तत्पुरुष समास‘ असे म्हणतात.

केव्हा केव्हा दोन्ही पदे भिन्न अशा विभक्तीत असतात. जसे – देवपूजा (देवाची पूजा) या प्रकारास व्याधिकरण तत्पुरुष असे म्हणतात. आता आपण तत्पुरुष समासाच प्रकार पाहूया.

(अ) विभक्ति तत्पुरुष

समास ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात. त्यास ‘विभक्ति तत्पुरुष समास‘ असे म्हणतात. या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्तिप्रत्ययाने दाखविला जातो, त्याच विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते. या समासाचे पोटप्रकार पुढीलप्रमाणे:

सामासिक शब्दविग्रहसमासउदाहरण
दुःखप्राप्त
भक्तिवश

क्रीडांगण
ऋणमुक्त
राजमुक्त
घरजवाई
दुःखाला प्राप्त
भक्तीने वश

क्रीडेसाथी अंगण
ऋणातून मुक्त
राजाचा पुत्र
घरातील जावई
द्वितीया तत्पुरुष
तृतीया तत्पुरुष

चतुर्थ तत्पुरुष
पंचमी तत्पुरुष
षष्टि तत्पुरुष
सप्तमी तत्पुरुष
कृष्णाश्रित, देशगत
तोंडपाठ, दयार्द्र, गुणहीन, चौपट
मंत्र ईश्वरनिर्मित, एकोन, बुद्धिजड
गायरण, पोळपाट, वाटखर्च
सेनानिवृत्त, गर्भश्रीमंत, जातीभ्रष्ट
देवपूजा, राजवाडा, घोडदौड
स्वर्गवास, पोटशूळ, वनभोजन

विग्रहाला अनुसरून समासाची नावे बदलणे शक्य आहे. उदा. गावदेवी (गावची देवी – षष्ठी तत्पु , समास)
(गावातील देवी सप्तमी तत्पु.)

चारभय (चोरापासून भय – पंचमी तत्पु.) (चोराचे भय षष्ठी तत्पु.)

(आ) अलुक् तत्पुरुष समास

पुढील सामासिक शब्द पाहा –

अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरूह, कर्तरिप्रयोग, कर्मणिप्रयोग, सरसिज या शब्दांच्या पहिल्या पदातील ‘ अग्रे, युधि, पंके, कर्तरि, कर्मणि, सरसि ‘ ही त्या त्या शब्दांची संस्कृतमधील सप्तमीची रूपे न गाळता तशीच राहिली आहेत. (लुक् = लोप होणे. अलुक् = लोप न होणारे) म्हणून,

ज्या विभक्तितत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्तिप्रत्ययाचा लोप होत नाही. त्यास ‘अलुक् तत्पुरुष समास‘ असे म्हणतात. ही सर्व उदाहरणे संस्कृत शब्दांची आहेत. ‘तोंडीलावणे’ हे या समासाचे मराठी उदाहरण होय.

(इ) उपपद तत्पुरुष समास

पुढील काव्यपंक्ती पाहा

  1. शैवाले गुंतले तरि पंकज हे शोभते।
  2. गडद निळे, गडद निळे, जलद भरुनि आले।

वरील कवितेच्या ओळीतील पुढील शब्दांची फोड आपण कशी करतो ते पाहा.

  1. पंकज = पंकात ( = चिखलात ) जन्मणारे ते.
  2. जलद = जल देणारे.

या समासातील दुसरे पद प्रधान आहे , म्हणून हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे .. शिवाय यांतील दुसरी पदे धातुसाधिते किंवा कृदन्ते आहेत; व ही कृदन्ते अशी आहेत की , त्यांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही . अशा समासास ‘ उपपद ‘ किंवा ‘ कृदन्त तत्पुरुष समास ‘ असे म्हणतात. जसे –

ग्रंथकार, कुंभकार, पांथस्थ, मार्गस्थ, द्विज, विहग, शेषशायी.

यांतील कार (करणारा) , स्थ (राहणारा) , ज (जन्मणारा), ज (जाणारा) , शायी (निजणारा) ही त्या त्या संस्कृत धातूपासून झालेली रूपे असून सामासिक शब्दांशिवाय त्यांचा अन्यत्र स्वतंत्रपणे उपयोग होत नाही . या समासाची आणखी काही उदाहरणे –

देशस्थ, मनुज, नृप, सुखद, पयोद, खग, नग, सुज्ञ, कृतघ्न .

मराठी शब्दांची उदाहरणे

शेतकरी, कामकरी, आगलाव्या, भाजीविक्या, वाटसरू.

पंकेरू, सरसिज, यांसारखे संस्कृत सामासिक शब्द व मळेकरी, पहारेकरी, पाखरेविक्या, गळेकापू यांसारखे मराठी सामासिक शब्द हे अलुक् व उपपद तत्पुरुष अशा दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत. यांतील पहिल्या पदातील विभक्तीचा लौप झाला नाही, म्हणून ते अलुक् व त्यांतील दुसरी पदे धातुसाधिते आहेत म्हणून तत्पुरुष. अशा समासांना उभय – तत्पुरुष असेही म्हणतात.

(ई) नञ् तत्पुरुष समास

पुढील वाक्ये पाहा :

  1. माझा निबंध अपुरा राहिला.
  2. अजामिळ हा नास्तिक होता.

या वाक्यातील ठळक टाइपातील शब्दांतील दुसरी पदे महत्त्वाची आहेत. म्हणू ती तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. मात्र अशा पदातील पहिली पदे ‘ अ, अनू, न, ना, बे, नि, गैर ‘ यांसारखी अभाव किंवा निषेध दर्शविणारी आहेत. अशा रीतीने ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते त्यास ‘ नञ् तत्पुरुष समास ‘ असे म्हणतात. आणखी उदाहरणे अयोग्य (योग्य नव्हे ते), अनादर (आदर नसलेला), नापसंत (पसंत नसलेला). आणखी काही उदाहरणे – अनाचार, अन्याय, अहिंसा, निरोगी, नाइलाज, नाउमेद, बेडर, गैरहजर.

(उ) कर्मधारय समास

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास ‘कर्मधारय समास‘ असे म्हणतात.

उदा. महादेव (महान असा देव), घनश्याम (घनासारखा श्याम)

यातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते. यांतील दोन्ही पदांतील संबंध विशेषण – विशेष्य किंवा उपमान – उपमेय अशा स्वरूपाचा असतो. उदा. रक्तचंदन (रक्तासारखे चंदन), मुखकमल (मुख हेच कमल

यातील पोट प्रकार पुढीलप्रमाणे

1. विशेषण – पूर्वपद : सामासिक शब्दातील पहिले पद (पूर्व) विशेषण असते . जसे रक्तचंदन, नीलकमल, पीतांबर (पिवळे असे वस्त्र)

2. विशेषण – उत्तरपद : सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण असते. उदा. घननील (निळा असा घन), पुरुषोत्तम (उत्तम असा पुरुष), भाषान्तर (अन्य भाषा), वेशान्तर (अन्य वेश)

3. विशेषण – उभयपद : सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषणे असतात. जसे पाढराशुभ्र, श्यामसुंदर, लालभडक, हिरवागार, काळाभोर

4. उपमान पूर्वपद : सामासिक शब्दातील पहिले पद (= पूर्व ) उपमान असते. उदा. कमलनयन (कमळासारखे डोळे), मेघश्याम (मेघासारखा काळा), चंद्रमुख (चंद्रासारखे मुख)

5. उपमान – उत्तरपद : सामासिक शब्दातील दुसरे पद ( = उत्तर) उपमान असते. जसे मुखचंद्र, चरणकमल, नरसिंह, (सिंहासारखा नर)

6. रूपक उभयपद : सामासिक शब्दातील दोन्ही (उभय) पदे एकरूप असतात. जसे विद्याधन (विद्या हेच धन) काव्यामृत (काव्यरूपी अमृत) , भवसागर, विद्युल्लता, चरणकमल

(ऊ) द्विगु समास

पुढील वाक्ये वाचा.

  1. रामचंद्र पंचवटीत राहात होते.
  2. नवरात्रात देवीचा उत्सव असतो.
  3. चातुर्मासात स्त्रिया व्रते घेतात.
  4. अशी माणसे त्रिभुवनात नसणार.

वरील वाक्यांतील ठळक अक्षरात छापलेले सामासिक शब्द पाहा. त्यांचा विग्रह पुढीलप्रमाणे.

  1. पंचवटी (पाच वडांचा समूह)
  2. नवरात्र (नऊ रात्रींचा समूह)
  3. चातुर्मास (चार मासांचा समूह)
  4. त्रिभुवन (तीन भुवनांचा समूह)

या विग्रहावरून तुमच्या लक्षात आले असेल, की या प्रत्येक सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे. या पदांचा परस्परसंबंध विशेषण, विशेष्य असाच आहे. म्हणजे हा कर्मधारय समासाचाच प्रकार आहे . या सामासिक शब्दांतील पहिली पदे संख्याविशेषण आहेत व सामासिक शब्दांवरून एक समूह सुचविला जातो. अशा प्रकारे ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एक समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो तेव्हा त्यास ‘द्विगू समास‘ असे म्हणतात. हा समास नेहमी एकवचनात असतो.

या समासाची आणखी काही उदाहरणे सप्ताह, त्रिदल, पंचपाळे, चौघडी, त्रैलोक्य, बारभाई, पंचारती. द्विगू समासाला ‘ संख्यापूर्वपद कर्मधारय समास ‘ असेही म्हणतात.

(ए) मध्यमपदलोपी समास

पुढील सामासिक शब्द पाहा.

कादेपोहे, साखरभात, चुलतसासरा. या सामासिक शब्दांचा विग्रह अनुक्रमे –

  1. कांदे घालून केलेले पोहे – कांदेपोहे
  2. साखर घालून केलेला भात – साखरभात
  3. नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा – चुलत सासरा

अशा सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविण मधली काही पदे लोप करावी लागतात म्हणून या समासाला ‘मध्यमपदलोपी समास’ असे म्हणतात . या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ‘ युक्त, द्वारा, पुरता, असलेला अशांसारख गाळली गेलेली पदे घालावी लागतात; म्हणून या समासाला “लुप्तपद कर्मधारय समास” असेही म्हणतात.

3. द्वंद्व समास

ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात, त्यास ‘द्वंद्व समास‘ असे म्हणतात. आणि, व, अथवा, किंवा ‘ या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात.

उदा . रामलक्ष्मण (राम आणि लक्ष्मण), पापपुण्य (पाप किंवा पुण्य), विटीदांडू (विटी आणि दांडू).

द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत : (१) इतरेतर द्वंद्व समास, (२) वैकल्पिक द्वंद्व समास, (३) समाहार द्वंद्व समास.

(अ) इतरेतर द्वंद्व समास

ज्या समासाचा विग्रह करतांना ‘ आणि ‘ ‘ व ‘ या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो, त्यास ‘ इतरेतर द्वंद्व समास ‘ असे म्हणतात. जसे – आईबाप (आई आणि बाप), हरिहर (हरी आणि हर), तसेच स्त्रीपुरुष, अहिनकुल, नेआण, एकवीस, कृष्णार्जुन, बहीणभाऊ

(आ) वैकल्पिक द्वंद्व समास

ज्या समासाचा विग्रह करताना ‘किंवा‘ ‘अथवा‘, ‘वा‘ या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास ‘वैकल्पिक द्वंद्व समास‘ असे म्हणतात. जसे– खरेखोटे (खरे किंवा खोटे), तीनचार (तीन किंवा चार), बरेवाईट (बरे किंवा वाईट), पासनापास (पास किंवा नापास) तसेच पापपुण्य, धर्माधर्म, न्यायान्याय, सत्यासत्य इ.

(इ) समाहार द्वंद्व समास

ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो. त्यास ‘समाहार द्वंद्व समास‘ असे म्हणतात.

  • उदा. मीठभाकर (मीठ, भाकरी व साधे खाद्यपदार्थ)
  • चहापाणी (चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ)
  • भाजीपाला (भाजी, पाला, व मिरची, कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू )
  • अंथरूणपांघरूण (अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे)
  • बाजारहाट, पालापाचोळा, केरकचरा, कपडालत्ता, पानपत्रावळ, घरदार इ.

समासाच्या या प्रकारात समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायास महत्त्व असते, म्हणून हा समास एकवचनी असतो.

4. बहुव्रीही समास

‘बहुव्रीही‘ या शब्दाचा अर्थ ‘शेतकरी‘ किंवा ‘धान्यसंपन्न गृहस्थ‘ असा आहे. (बहु = पुष्कळ, व्रीही तांदूळ, धान्य) ‘माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत.‘ असा जेव्हा मी शब्दप्रयोग करतो तेव्हा बहुव्रीही या जोडशब्दातील ‘बहु’बद्दल मी बोलत नाही किंवा ‘व्रीही‘ म्हणजे धान्याबद्दल मी बोलत नाही. पुष्कळ धान्य ज्यांच्याजवळ आहे अशा मामांच्याबद्दल मी बोलतो. म्हणजे, ‘बहुव्रीही‘ या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.

हे सुद्धा वाचा –

Related Posts