मेनू बंद

साने गुरुजी – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक साने गुरुजी (१८९९ -१९५०) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Sane Guruji यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

साने गुरुजी (Sane Guruji) - संपूर्ण माहिती मराठी

साने गुरुजी त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि अनुयायांकडून, महाराष्ट्र, भारतातील मराठी लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून संबोधले जाते.

साने गुरुजी माहिती मराठी

साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव होते. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील पालगड गावात झाला. गुरुजींचे वडील सदाशिवराव हे पालगड गावात गावी खोताचे काम करायचे. त्यांचे कुटुंब मुळात संपन्न असले तरी सदाशिवरावांच्या काळात ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते.

गुरुजींच्या आईचे नाव यशोदा असे होते. लहानपणापासूनच गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते व त्यांच्यावर आईच्या शिकवणुकीचा मोठाच प्रभाव पडला होता. गुरुजींच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार घडविले त्यातूनच त्यांचा जीवनविकास झाला. सर्वांभूती प्रेम करण्याचा धडा त्यांना त्यांच्या आईनेच दिला. ‘ श्यामची आई ‘ या पुस्तकात गुरुजींनी आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत.

सानेच्या बालपणात हे कुटुंब तुलनेने चांगले होते, परंतु नंतर त्यांची आर्थिक स्थिती बिघडली, ज्यामुळे त्यांचे घर सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केले. साने यांच्या आई यशोदाबाईंचे 1917 मध्ये निधन झाले. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे तसेच मृत्यूशय्येवर त्यांना भेटू न शकल्याने साने गुरुजींना आयुष्यभर त्रास झाला.

गुरुजी प्राथमिक शिक्षणानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या मामाकडे राहण्यासाठी पुण्याला पाठवण्यात आले. मात्र, पुण्यातील मुक्काम त्यांना आवडला नाही आणि पालगडपासून सहा मैलांवर असलेल्या दापोली येथील मिशनरी शाळेत राहण्यासाठी ते पालगडला परतले. दापोलीत असताना मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्व असलेला हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख झाली. त्यांना काव्यातही रस होता.

साने यांचे वडील सदाशिवराव हे लोकमान्य टिळकांचे समर्थक होते. मात्र, काही दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांनी राजकीय गोष्टींपासून दूर राहणेच पसंत केले. मात्र, साने गुरुजींच्या आईचा त्यांच्या आयुष्यात मोठा प्रभाव ठरला. अध्यापनाचा व्यवसाय निवडण्यापूर्वी त्यांनी मराठी आणि संस्कृतमध्ये पदवी संपादन केली आणि तत्त्वज्ञानात पदव्युत्तर पदवी मिळवली.

साने हे अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. श्रीमंत विद्यार्थ्यांना शिकवून तो मिळवू शकणाऱ्या संभाव्य मोठ्या पगाराच्या आधी त्याने ग्रामीण शाळांमध्ये शिकवणे निवडले. त्यांनी वसतिगृह वॉर्डन म्हणूनही काम केले. साने हे एक हुशार वक्ते होते, त्यांनी नागरी हक्क आणि न्याय या विषयावर आपल्या उत्कट भाषणांनी श्रोत्यांना मोहित केले.

शाळेत असताना त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक काढले जे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. त्यांनी विद्यार्थी समाजात नैतिक मूल्ये रुजवली, ज्यांमध्ये ते खूप लोकप्रिय होते. त्यांचा शिक्षकी पेशा केवळ सहा वर्षे चालू राहिला आणि त्यानंतर त्यांनी आपले जीवन भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

आचार्य अत्रे यांनी ‘ मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र ‘ अशा शब्दांत या पुस्तकाचे वर्णन केले आहे. साने गुरुजींचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावीच म्हणजे पालगड येथे झाले. पुढील शिक्षणासाठी मात्र त्यांना दापोली, औंध, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागले. सन १९१८ मध्ये ते पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या न्यू पूना कॉलेजात आपले नाव दाखल केले. याच कॉलेजातून त्यांनी बी. ए. व एम. ए. च्या पदव्या संपादन केल्या.

शिक्षण पूर्ण झाल्यावर साने गुरुजींनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरली. ते वसतिगृहाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जीवनाशी गुरुजी अतिशय समरस झाले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून स्वावलंबन व सेवावृत्तीचे धडे दिले. इ. स. १९२८ मध्ये त्यांनी ‘ विद्यार्थी ‘ या नावाचे मासिक सुरू केले.

Sane Guruji Information in Marathi

विद्यार्थिदशेपासूनच Sane Guruji वर महात्मा गांधींच्या राजकीय विचारांचा प्रभाव होता. सन १९२१ पासून त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली होती. इ. स. १९३० मध्ये महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाच्या चळवळी सुरुवात केल्यावर गुरुजींनी आपला शिक्षकी पेशा सोडला आणि स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली.

त्याबद्दल त्यां अनेकदा कारावासाची शिक्षा झाली. तुरुंगातील वास्तव्यातच त्यांची विनोबा भावेशी भेट झाली . पुढे १९३६ मध् भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ग्रामीण भागात आपले अधिवेशन भरविण्याचे ठरविले. त्याचे ठिकाण म्हणून खानदेशातील फैजपूरची निवड करण्यात आली. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी गुरुजींनी जिवापाड मेहनत घेतली.

सन १९३८ च्या दुष्काळात खानदेशातील शेतकऱ्यांची पिके बुडाली. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांचा सारा माफ करावा, या मागणीसाठी साने गुरुजींनी जळगावला शेतकऱ्यांची एक परिषद आयोजित केली. सन १९३८ मध्ये त्यांनी ‘ काँग्रेस ‘ या नावाचे एक साप्ताहिकही सुरू केले.

सन १९४२ च्या ‘ चले जाव ‘ चळवळीच्या काळात साने गुरुजींनी भूमिगत राहून ही चळवळ नेटाने पुढे चालविण्याचा प्रयत्न केला; परंतु १९४३ मध्ये त्यांना अटक करण्यात आली. पुढे १९४५ मध्ये त्यांची तुरुंगातून मुक्तता झाली. ‘ पत्री ‘ हा साने गुरुजींचा पहिलाच काव्यसंग्रह. छापून होताच तो ब्रिटिश सरकारने जप्त केला. अशा परिस्थितीतही ‘ पत्री ‘ च्या प्रती महाराष्ट्रभर पसरल्या !

“असत्य अन्यायांना तुडवू।
दुष्ट रूढींना दूर उडवू।
घाण आता ठेवणार नाही।
सुखवू प्रियतम भारतमाई|| “

यांसारख्या ओळींनी त्या काळी स्वातंत्र्याचा आणि समतेचा संदेश घराघरांतून पसरवला.

“बलसागर भारत होवो।
विश्वात शोभुनी राहो॥
हे कंकण करी बांधियले।
जनसेवे जीवन दिधले।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले।
मी सिद्ध मराया हो।।”

ही कविता आजही आपण विसरू शकत नाही; अन् आजही आपणास राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रीय एकात्मतेची व राष्ट्रसेवेची प्रेरणा देण्यास ही कविता समर्थ आहे. साने गुरुजींना समाजवादी विचारसरणीविषयी आकर्षण वाटत होते. काँग्रेसमध्ये असतानाच ते समाजवादाच्या प्रभावाखाली आले होते. भारतीय समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांना त्यांचा विरोध होता. विशेषतः जातिभेद आणि सामाजिक विषमता यांविषयी त्यांना अत्यंत चीड होती.

अस्पृश्यतेच्या प्रथेविरुद्ध त्यांनी प्रचाराची जोरदार आघाडी उघडली होती. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे म्हणून गुरुजींनी १९४६ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सहा महिने प्रचाराचे रान उठविले; पण त्याचा काहीही फायदा होत नाही, असे पाहिल्यावर त्यांनी पंढरपूर येथे प्राणांतिक उपोषण आरंभिले; त्यामुळे पंढरपूरचे मंदिर हरिजनांना खुले झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर थोड्याच दिवसांत काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीचा गट काँग्रेसमधून बाहेर पडला आणि त्याने समाजवादी पक्षाची स्थापना केली. साने गुरुजीही या नव्या पक्षात सामील झाले. सन १९४८ मध्ये त्यांनी ‘ साधना ‘ हे साप्ताहिक सुरू केले. साने गुरुजींनी आंतरभारती चळवळ सुरू केली होती. त्यामागची त्यांची कल्पना अशी होती की, भारत हा विविध प्रांत, धर्म, भाषा, जाती असलेला देश आहे. तथापि, भारतीय जनतेत असलेल्या या विविधतेमुळे ऐक्याची भावना वाढीस लागण्यास काही वेळा अडसर निर्माण होतो.

आपल्या देशाचे ऐक्य अभंग राखण्यासाठी निरनिराळ्या प्रांतांतील लोकांनी एकत्र यावे, त्यांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात, एकमेकांच्या चालीरीती समजावून घ्याव्यात, एकमेकांवर प्रेम करावे. त्यायोगे त्यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ होऊन राष्ट्रीय ऐक्यालाही बळकटी येईल. गुरुजींची आंतरभारतीची कल्पना म्हणजे भारताच्या एकात्मतेविषयी त्यांना वाटत असलेल्या कळकळीचे द्योतकच होय.

साने गुरुजी हे एक उत्कृष्ट साहित्यिकही होते. त्यांनी विपुल साहित्य लिहिले आहे. त्यांच्या साहित्यात कादंबऱ्या, कथा, लेख, निबंध, चरित्रे, काव्य, नाट्यसंवाद इत्यादी विविध वाङ्मयप्रकारांचा अंतर्भाव होतो. त्यांच्या ठिकाणी असलेली समाजहिताची तळमळ, मानवतावादी दृष्टिकोन आणि उदात्त विचारसरणी यांचा प्रत्यय आपणांस त्यांच्या साहित्यातून येतो. त्यांची भाषा साधीच पण ओजस्वी होती. तिला एक प्रकारची गहिरी धार होती ; त्यामुळे ती वाचकांच्या मनाची पकड घेत असे.

साने गुरुजींचा मृत्यू कसा झाला

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी पाहिलेले स्वतंत्र भारताचे स्वप्न आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय वास्तव यामुळे साने गुस्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजातून विषमता दूर करण्याच्या शक्यतांबद्दल साने यांचा अधिकाधिक भ्रमनिरास झाला. महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. या शोकांतिकेवर त्याची प्रतिक्रिया 21 दिवस उपोषण करून उमटली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कारणांमुळे साने गुरुजी खूप अस्वस्थ होते. त्यांनी 11 जून 1950 रोजी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या केली; याप्रकारे दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला.

साने गुरुजी यांचे साहित्य व पुस्तक

श्याम, श्यामची आई, क्रांती, तीन मुले, समाजधर्म, स्त्री जीवन, इतिहासाचार्य राजवाडे, ईश्वरचंद्र विद्यासागर, पत्री (काव्यसंग्रह). बहुतेक ग्रंथलेखन गुरुजींनी तुरुंगात असतानाच केले. तुरुंगात असतानाच त्यांनी विनोबांनी सांगितलेली ‘ गीताई ‘ ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका लिहून घेतली. ‘ श्यामची आई ‘ ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिक येथे तुरुंगात असतानाच लिहिली.

हे सुद्धा वाचा –

Related Posts