मेनू बंद

संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Sant Gyaneshwar (Dnyaneshwar) Maharaj यांच्या बद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती मराठी  - Sant Dnyaneshwar (Gyaneshwar) Information in Marathi

संत ज्ञानेश्वर हे १३व्या शतकातील भारतीय मराठी संत, कवी, तत्त्वज्ञ आणि नाथ वैष्णव परंपरेतील योगी होते. 21 वर्षांच्या छोट्या आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानल्या जातात.

संत ज्ञानेश्वरांच्या कल्पना द्वैतवादी अद्वैत वेदांत तत्त्वज्ञान आणि योग आणि विष्णू आणि शिव यांच्या एकतेवर भर देतात. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या वारकरी भक्ती चळवळीच्या संस्थापकांपैकी एक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती मराठी

संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म शके ११९७ (इ.स. १२७५) आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. विठ्ठलपंतांचे मूळ घराणे पैठणजवळील आपेगावचे; पण नंतर ते आळंदीत स्थायिक झाले. त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी आणखी तीन मुले होती.

विठ्ठलपंतांनी ऐन तारुण्यातच संन्यास घेतला होता. मात्र, गुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची चार मुले झाली; त्यामुळे तत्कालीन धर्ममार्तंडांनी या कुटुंबाला वाळूत टाकले. परिणामी, Sant Dnyaneshwar आणि त्यांच्या भावंडांना अत्यंत खडतर आणि उपेक्षित जीवन जगावे लागले. त्याला खूप अपमान सहन करावा लागला. ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी शके १२१८ (इ.स. १२९६) आळंदी येथे समाधी घेतली.

संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला

ज्ञानेश्वरांनी शके १२१२ (इ. स. १२९०) मध्ये ‘ ज्ञानेश्वरी ‘ ही भगवद्गीतेवरील टीका ग्रंथ लिहिला. याखेरीज अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, अभंगांची गाथा अशी ग्रंथरचनाही केली आहे. ‘ज्ञानेश्वरी ‘ किंवा ‘ भावार्थदीपिका ‘ हा मराठी साहित्यातील अजोड ग्रंथ होय . मराठी साहित्याचे ते अजरामर लेणे ठरले आहे. ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील टीकाग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील अठरा अध्याय व त्यांतील सातशे श्लोक यांवर त्यांचा क्रम कायम ठेवून नऊ हजार ओव्यांची टीका लिहिली. रा. द. रानडे यांनी या ग्रंथाविषयी असे म्हटले आहे की, ‘ भगवद्गीतेवर आजपर्यंत झालेल्या सर्व टीकांमध्ये ज्ञानेश्वरी ही सर्वश्रेष्ठ टीका होय.

Sant Dnyaneshwar Information in Marathi

Sant Dnyaneshwar हे गीतेवरील श्रेष्ठ भाष्यकार होते . त्यांच्या ठिकाणी तत्त्वज्ञान, काव्य व आत्मानुभूती यांचा एक अद्भुत त्रिवेणी संगम झाला होता . त्यांनी गीतेला मराठी भाषेचे सुंदर लेणे चढवून मराठी भाषिकांना तत्त्वज्ञानाचा एक महान ग्रंथ उपलब्ध करून दिला. आतापर्यंत संस्कृत अवगुंठित असलेले अध्यात्मज्ञान मराठीत आणून ज्ञानेश्वरांनी मोक्षाची द्वारे सर्वसामान्य जनतेलाही खुली केली. हे त्यांचे महान कार्य होय.

ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीबद्ध टीकेत गीतेतील कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग यांचे विस्तृत विवेचन केले आहे. गीतेत या सर्वांचा सुरेख मेळ घातला गेला आहे . ज्ञानेश्वरांनी समन्वयाची भूमिका स्वीकारून ज्ञानेश्वरीत या सर्वांचे गुणग्राही विवेचन केले आहे . त्यांनी ‘ सर्वांभूती समानता ‘ व ‘ ज्ञानयुक्त भक्ती ‘ यांची शिकवण दिली. सगुण भक्तीला ‘ अद्वैत ‘ तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान मिळवून देताना आणि ‘ अहम् ब्रह्मास्मि ‘ किंवा ‘ तत् त्वम् असि ‘ या वेदवाक्यांचा भावार्थ सांगताना Sant Dnyaneshwar म्हणतात,

“हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर। आपण जाला।।”

त्यांची अंतिम निष्ठा ज्ञानरूप भक्ती ही आहे. अद्वैतानुभूतीतही भक्ती व कर्म यांना स्थान आहे, असे त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर यांचे गुरु कोण होते

संत ज्ञानेश्वर यांचे गुरु निवृत्तिनाथ होते. ग . श्री . हुपरीकर यांनी ज्ञानेश्वरीविषयी असे म्हटले आहे की, “ ज्ञानेश्वरी हे तत्त्वज्ञान व काव्य या दोन भिन्न रंगांच्या आडव्या – उभ्या धाग्यांनी विणलेले व दोन भिन्न रंगांची मधूनमधून झाक दाखविणारे भरजरी वस्त्र आहे.

” ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयसंपदेचे महत्त्व स्पष्ट करताना शं. दा. पेंडसे म्हणतात, ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयसंपदेचे महत्त्व नैमित्तिक नाही. ते राजकारणनिरपेक्ष असे स्वतंत्र व सनातन महत्त्व आहे. भक्तीच्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रांतील धार्मिक व सामाजिक विषमता नष्ट व्हावी, ‘ याचि देहीं याचि डोळां ‘ नराचा नारायण होण्याचा आपण अधिकार आहे हे सर्वांना कळावे, त्याकरिता अध्यात्माचे आणि मोक्षाचे ज्ञान सर्व मुमुक्षूंना त्यांच्या मराठी भाषेत घेता यावे, त्यांच्या चित्ताला शांती, आनंद प्राप्त व्हावा आणि आपली सर्व कर्तव्यकर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे हीच खरी भक्ती व खरा यज्ञ आहे हे त्यांस सांगावे, हेच ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयसंपदेचे प्रधान प्रयोजन आहे.

संत ज्ञानेश्वर यांचे कार्य

भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना ही सर्वात मोठे संत ज्ञानेश्वर यांचे कार्य म्हणता येईल. 22 ज्ञानेश्वरांनी सांप्रदायिकतेचा स्वीकार न करता अद्वैत आणि भक्ती, वैराग्य आणि प्रापंचिकता, ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचा संगम घडवून आणला. त्यायोगे त्यांनी महाराष्ट्राच्या समाजजीवनात एक अपूर्व क्रांतीच घडवून आणली. द्वैतमूलक भक्तीला त्यांनी अद्वैताची बैठक दिली; वैदिक कर्मकांडातील विषमता आणि संन्यासवादातील समता यांचा सुवर्णमध्य साधला.

भागवत धर्माच्या झेंड्याखाली सर्वांना एकत्र आणले. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना ज्ञानेश्वरांनी केली आणि त्या संप्रदायाला तत्त्वज्ञानाची एक भरभक्कम बैठक मिळवून दिली. ज्ञानयुक्त भक्तीचा महिमा वर्णन करताना भक्तिप्रेमामुळे आपली परमेश्वरविषयक आपुलकी तर वाढतेच; शिवाय मनुष्यमात्रात परस्परप्रेमाची बांधिलकीही निर्माण होते, असे सांगून ज्ञानेश्वरांनी मानवतावादाचा महान संदेश सामान्य जनांकरिता दिला आहे.

आपल्या तत्त्वज्ञानपर ग्रंथांनी त्यांनी आध्यात्मिक समतेचा पुरस्कार करून मराठी संस्कृती व सामान्य जन यांना उच्च आध्यात्मिक पातळीवर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले; म्हणून प्रा. गं. बा. सरदार यांनी असे म्हटले आहे की, “ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संतचळवळीचे, धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होत. ” ज्ञानेश्वरांनी सामान्य जनांच्या मनात भागवत धर्माविषयी आस्था व आपुलकी निर्माण केली. समाजातील दुःखी व उपेक्षित लोकांविषयी कळवळा त्यांच्या लिखाणात ठिकठिकाणी पाहावयास मिळतो. ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी मागितलेल्या-

“हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर। आपण जाला।।”

या पसायदानात अवघ्या मानवजातीच्या कल्याणाविषयीच्या त्यांच्या विशाल दृष्टीचे प्रत्यंतर आपणास येते.

हे पण वाचा –

Related Posts