मेनू बंद

संत गोरा कुंभार – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Sant Gora Kumbhar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

संत गोरा कुंभार

संत गोरा कुंभार कोण होते

संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शके इ.स. १२६७ साली त्यांचा जन्म झाला असावा. संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. संत गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते.

त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२०एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. “तेर’ नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. “तेर’ येथील “काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे “तेर’ गावात माधव बुवांना “संत‘ म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ८ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. ती आठही मुले जिवंत कशी झाली. यासंबंधी एक आख्यायिका संत गोरोबा काका चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितली आहे.

ते आपल्या चरित्रामध्ये म्हणतात, ”श्री माधवबुवा ‘तेर’ येथील काळेश्वराची उपासना करीत होते. त्यांना आठ पुत्र झाले. परंतु ते सर्व एकामागून एक मरण पावले. पुढे कालांतराने भगवान पांडुरंग ब्राह्मणाचा वेष घेऊन त्यांचे घरी आले. तेव्हा त्यांनी खिन्न मुद्रा पाहून देवांनी त्यांना विचारले की, तुम्ही दुःखी का?’ माधबुवांनी सांगितले की,”आमची आठही मुले देवाने नेली, म्हणून दुःखी आहोत’ नंतर देवाने आठ मुलांना जेथे मूठमाती दिली, ती जागा दाखविण्यास सागितले.

माधवबुवांनी त्यांना काळेश्वर जवळील स्मशानात नेले, व देवास आठही मुले कोठे पुरली ती जागा दाखविली. देवांनी सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितली. बुवांनी त्याप्रमाणे आठही मुलांची प्रेते बाहेर काढली. देवाने पाहिले व सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले व त्यांना स्वर्गात पाठविले आणि नंतर आठवा मुलगा जिवंत केला. तोही स्वर्गाच्या मार्गाने निघाला. परंतु देवाने त्यास जाऊ दिले नाही.

भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुवा रखुमाईच्या स्वाधीन केले. देव म्हणाले, ‘तुला गोरीतून काढले म्हणून तुझे नाव गोरोबा ठेवले.’ या आख्यायिकेच्या मागे चमत्काराचा भाग असलेला दिसून येतो. संतांच्या चरित्रात असे अनेक चमत्कार वर्णिलेले आहेत. खरं तर चमत्कारात चैतन्य असते. पण बऱ्याचदा समृद्ध समाजाला अशा चमत्कारातून चेतना मिळण्याऐवजी त्यांच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्माण होताना दिसते.

संतांचे जीवन दर्शन घडवितानासुद्धा केवळ चमत्कार हे त्यांचे साध्य नव्हते तर साधन होते, याचे भान राखावे. म्हणून फक्त तो त्यांच्या जीवनातील एक चमत्काराचा भाग समजावा. फार तर त्याचा सरळ सरळ अर्थ घेणे योग्य नाही. याबाबत असे म्हणता येईल की, माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती.

सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिला. म्हणून माधवबुवांना तो आपल्या श्रद्धेचा, भक्तीचा, महिमा वाटला. यावरून एवढाच तर्क किंवा अंदाज बांधता येतो की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गाोरोबांचा जन्म झाला होता.

हे सुद्धा वाचा –

Related Posts