मेनू बंद

संत तुकाराम महाराज माहिती मराठी – जीवनचरित्र, अभंग व अर्थ

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील थोर संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Sant Tukaram Maharaj यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

संत तुकाराम महाराज माहिती मराठी - जीवनचरित्र, अभंग व अर्थ - Sant Tukaram Maharaj

संत तुकाराम महाराज कोण होते

संत तुकाराम महाराज हे १७व्या शतकातील मराठी कवी, हिंदू संत आणि भगवान श्री विठ्ठलाचे महान भक्त होते, जे महाराष्ट्रात तुका, तुकोबाराया, तुकोबा म्हणून प्रसिद्ध होते. ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे संत होते. ते समतावादी, वैयक्तिक वारकरी भक्तीपरंपरेचा भाग होते. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंग नावाच्या भक्ती काव्यासाठी आणि कीर्तन म्हणून ओळखल्या जाणार्‍या अध्यात्मिक गीतांसह समाजाभिमुख उपासनेसाठी प्रसिद्ध आहेत.

संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले होते. तुकारामांचा जन्म शके १५२० मध्ये (इ. स. १५९८) देहू या गावी झाला. (काही जणांच्या मते त्यांचा जन्म शके १५३० मध्ये झाला असे मानतात.) तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई असे होते. त्यांची कुळी मोऱ्यांची असून आडनाव अंबिले असे होते. तुकारामांचे घराणे हे मराठा जातीचे होते. म्हणजे एका अर्थाने ते क्षत्रियच होते. परंतु, स्वतः तुकारामांनी आपल्या जातीचा उल्लेख कुणबी असा केला आहे आणि आपण शूद्र वर्णाचे आहोत, असे म्हटले आहे.

संत तुकाराम महाराज माहिती मराठी

तुकारामांचे वाडवडील देहू गावचे महाजन होते. त्यांचा व्यवसाय वैश्याचा म्हणजे व्यापार – उदिमाचा होता. या घराण्यात विठ्ठलभक्ती पूर्वापार चालत आलेली होती. तुकारामांचे बालपण आई – वडिलांच्या प्रेमळ छत्राखाली मोठ्या सुखात व्यतीत झाले. बालवयातच त्यांच्या ठायी बहुश्रुतपणा आला असल्याचे पाहावयास मिळते. तथापि, पुढील काळात मात्र त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले.

भक्ती चळवळ चे बाबाजी बाबाजी चैतन्य हे त्यांचे गुरू होते. संत तुकारामांच्या पहिल्या पत्नीचे नाव रखमाबाई होते आणि त्यांना संतू नावाचा मुलगा होता. तथापि, 1630-1632 च्या दुष्काळात त्याचा मुलगा आणि पत्नी दोघेही भुकेने मरण पावले. मृत्यू आणि व्यापक दारिद्र्य यांचा तुकाराम यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे पुढे ते चिंतन-मनन आणि आध्यात्मकडे वळले. काही काळानंतर तुकारामांनी पुन्हा लग्न केले, आणि त्यांची दुसरी पत्नी चे नाव अवलाई जिजा बाई होते.

त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी त्यांच्यावरील माता पित्याचे छत्र हरपले. त्यापाठोपाठ मोठा भाऊ सावजी विरक्त होऊन तीर्थयात्रेस निघून गेला; त्यामुळे संसाराचा सर्व भार त्यांच्यावरच पडला. तशातच त्यांना व्यापारात तोटा होऊ लागला . दुकानाचे दिवाळे निघण्याची पाळी आली. पुढे दुष्काळात गुरेढोरे गेली, धनद्रव्यही गेले. अशा प्रकारे संसारी जीवनात त्यांना अनेकविध आपर्त्तीशी मुकाबला करावा लागला. परिणामी, तुकोबा विरक्तीकडे झुकले आणि संसारातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागले. त्यांना अध्यात्माची व एकान्तवासाची ओढ लागली. आता ईश्वरचिंतनातच ते रममाण झाले. शके १५७१ (इ. स. १६४९) मध्ये त्यांचे महानिर्वाण झाले.

संत तुकाराम महाराज अभंग व अर्थ

तुकारामांनी खूप मोठ्या संख्येने अभंगरचना केली असून हे अभंग त्यांच्या गाथेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांच्या अभंगांची संख्या सुमारे पाच हजार इतकी भरते. तुकोबांचे अभंग म्हणजे मराठी काव्याचे शाश्वत भूषणच होय . त्यांचे अनुभवविश्व अतिशय मोठे होते आणि त्यांना असामान्य प्रतिभेची देणगी लाभली होती. त्याचे प्रत्यंतर आपणास त्यांच्या अभंगांद्वारे येते.

त्यांची अभंगवाणी आजही प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत जाऊन भिडते; कारण ती त्यांच्या सर्वस्पर्शी अशा जीवनानुभवांतून जन्माला आली आहे. मोठमोठ्या विद्वानांपासून ते सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या मनास भुरळ पडावी अशा सुभाषितवजा पंक्ती त्यांच्या अभंगांत जागोजागी विखुरलेल्या आहेत. उदाहरणादाखल पुढील काही अभंगपंक्तींचा उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो.

” पराविया नारी ” ” माऊली समान। परधनी बाटो नेदी मन। “
” ” भिक्षापात्र अवलंबिणें। जळो जिणे लाजिरवाणें। “

” आलिया भोगासी असावे सादर। देवावरी भार घालोनियां। ”
” महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळें वाचती। “

” तुका म्हणें तोचि संत। सोशी जगाचे आघात। “
” सुख पाहतां जवापाडे। दुःख पर्वताएवढे। “

” निश्चयाचें बळ। तुका म्हणे तेंचि फळ। ”
” ऐसी कळवळ्याची जाति। करी लाभाविण प्रीति। “

“ साधुसंत येती घरां। तोचि दिवाळी दसरा। “
” दया क्षमा शांति। तेथें देवाची वसती। “
” शुद्ध बीजापोटीं। फळें रसाळ गोमटी। “

तुकारामांनी आपल्या अभंगांतून शुद्ध – परमार्थ धर्माची शिकवण दिली. त्यांनी स्वतः भक्तिमार्गाची कास धरली आणि नामस्मरण व सत्संग या दोन साधन भर दिला. सगुण – निर्गुण हे एकाच आध्यात्मिक साक्षात्काराचे पैलू आहेत; वासना संपूर्ण विलीन होऊन पूर्ण व अविचल स्थिती अनुभवणे हे त्या साक्षात्काराचे फलित होय, असे त्यांचे सांगणे होते.

Sant Tukaram Maharaj Information in Marathi

Sant Tukaram Maharaj यांचे गुरु बाबाजी चैतन्य होते. तुकारामांच्या विचारांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सामाजिक अधिष्ठान लाभले होते. धर्माचे पालन करून पाखंड – खंडन करणे, हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले. कोणाचीही भीडमुर्वत न ठेवता ते सामाजिक दांभिकतेवर त्वेषाने तुटून पडतात. अशा वेळी त्यांच्या वाणीला एक वेगळीच धार चढल्याचे आपणास पाहावयास मिळते. पढीक पंडित , ढोंगी साधू , लोभी भिक्षेकरी इत्यादी सर्वांचा त्यांनी आपल्या वाङ्मयातून कडक समाचार घेतला आहे. तथापि , त्यांच्या टीकेचा मुख्य रोख दंभ व भक्तिहीन पांडित्य यावर आहे.

Sant Tukaram यांनी सर्व प्रकारच्या सामाजिक भेदभावांना विरोध केला आहे. सामाजिक विषमतेचे शल्य या ना त्या रूपाने त्यांच्या वाङ्मयात प्रगट झाल्यावाचून राहत नाही. त्यांनी जातपात व उच्चनीच भेदभाव नाकारले आणि त्यांस पोटतिडिकेने विरोध केला. “दया करणें जे पुत्रासी। तेचि दासा आणि दासी।।” अशा व्यापक मानवतावादी भूमिकेचा पुरस्कार करणारे तुकाराम खऱ्या अर्थाने संतपदी पोहोचले होते, असे म्हणावे लागते.

बहुजन समाजातील सर्वसामान्य व्यक्तींचे रागद्वेष आणि आशा – आकांक्षा त्यांनी आत्मीयतेने बोलून दाखविल्या. रूढ संस्कार व स्वतंत्र प्रेरणा यांच्यामधील झगडा तुकारामांच्या मनात सतत चालू होता. त्यांनी दिलेला मानवतेचा संदेश हा या झगड्याचाच परिपाक होय.

” प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे ज्या भागवत धर्माचा ज्ञानेश्वरांनी पाया रचला त्याचा कळस होण्याचे भाग्य तुकारामांना लाभले; म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात –

“संतकृपा झाली। इमारत फळां आली।।
ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।
नामा तयाचा किंकर। तेणें केला हा विस्तार।।
जनार्दन एकनाथ। ध्वज उभारिला भागवत ।।
तुका झालासे कळस भजन करा सावकाश।।”

हे सुद्धा वाचा –

Related Posts