मेनू बंद

Satellite Phone म्हणजे काय | सॅटेलाइट फोन कसा काम करतो

आज जगभरात मोबाईल फोन वापरला जातो, त्यांच्यामुळे तुम्ही जगभरात कोणालाही कॉल करू शकता. तुम्हाला माहिती असेलचं की, फोन कॉलिंगसाठी मोठ्या आकाराचे मोबाइल टॉवर असतात, ज्याच्या मदतीने कॉल करणे शक्य होते. मात्र, ज्या दुर्गम भागात मोबाइल टॉवर बसवलेले नाहीत, तेथे मोबाइल सिग्नलची समस्या असल्याने कॉलिंग आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की बाजारात असा एक फोन आहे, ज्याचे सिग्नल कधीच जात नाही. आपण, सॅटेलाइट फोन बद्दल बोलत आहोत, ज्याबद्दल तुम्ही ऐकले असेल पण त्याचा वापर केला नसेल. या लेखात आपण Satellite Phone म्हणजे काय आणि सॅटेलाइट फोन कसा काम करतो हे जाणून घेणार आहोत.

Satellite Phone म्हणजे काय

Satellite Phone म्हणजे काय

Satellite Phone हा मोबाईल फोनचा एक प्रकार आहे जो सेल टॉवरच्या जागी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या सॅटेलाइटकडून सिग्नल प्राप्त करतो. भारतात सामान्य लोकांसाठी सॅटेलाइट फोन वापरण्यास बंदी आहे. तथापि, काही निवडक लोकांनाच भारतात सॅटेलाइट फोन वापरण्याची परवानगी आहे. त्याचा वापर फक्त संरक्षण, लष्कर, बीएसएफ, आपत्ती व्यवस्थापन आणि सरकारने परवानगी दिलेल्या निवडक व्यक्ती किंवा संस्थांना परवानगी आहे.

सॅटेलाइट फोन कसा काम करतो

भारतासह जगभरात अनेक वर्षापासून सॅटेलाइट फोनचा वापर केला जात आहे. ज्या ठिकाणी सिग्नलची स्ट्रेंथ कमी आहे किंवा सिग्नल नाही अशा ठिकाणीही ते काम करू शकतात. नावाप्रमाणेच हा फोन सॅटेलाइटच्या मदतीने काम करतो. त्याची ऑडिओ क्वालिटी देखील चांगली असते. तथापि, प्रत्येकाला ते वापरण्याची परवानगी नाही.

सॅटेलाइट फोन कसा काम करतो

साधारणपणे आपल्याकडे जो मोबाईल असतो, त्याच्या आजूबाजूला असलेल्या टॉवर्समुळे आपण कॉलिंग किंवा इंटरनेट चा वापर करू शकतो. जेव्हा आपण दुसऱ्या भागात जातो तेव्हा तो मोबाइल फोन तेथील टॉवरवरून सिग्नल घेतो. पर्वत किंवा अशा ठिकाणी जिथे मोबाईल टॉवर कमी आहे किंवा टॉवरच नाही, तिथे सिग्नलची समस्या असते आणि तुम्हाला मोबाईल फोनचा वापर करता येत नाही. Satellite Phone मध्ये ही समस्या येत नाही. कारण हे फोन जमिनीवर असलेल्या टॉवरवरून सिग्नल घेत नाहीत. अशा फोनला अवकाशात पाठवलेल्या सॅटेलाइट कडून सिग्नल मिळतो.

सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरत आहेत. ते ग्राउंड रिसीव्हर्सना रेडिओ सिग्नल पाठवतात. रिसीव्हर सेंटर सॅटेलाइट फोनवर सिग्नल पाठवते, त्यानंतर कॉलिंग शक्य आहे. याला सामान्य भाषेत ‘SAT phone’ असेही म्हणतात. पूर्वी सॅटेलाइट फोनमध्ये फक्त कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा होती. पण आता नवीन Satellite Phone ही इंटरनेट सुविधेसह येत आहेत.

हे सुद्धा वाचा-

Related Posts