मेनू बंद

सेनापती बापट – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक सेनापती बापट (१८८०-१९६७) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Senapati Bapat यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

सेनापती बापट -  Senapati Bapat

सेनापती बापट माहिती मराठी

सेनापती बापट यांचे संपूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट असे होते. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या गावी १२ नोव्हेंबर, १८८० रोजी झाला. आपल्या शालेय जीवनात ते एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते . मॅट्रिकच्या परीक्षेत ते संस्कृतच्या ‘ जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती’चे मानकरी ठरले होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. तथापि, कॉलेज जीवनातच त्यांच्या मनात आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासंबंधीचे विचार घोळू लागले.

आपली मातृभूमी परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपण प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. या विचाराने ते इतके झपाटून गेले की , कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच १९०२ मध्ये त्यांनी माझ्या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी मी आजपासून यावज्जीव कायावाचामनाने झटेन आणि तिची हाक येताच तिच्या सेवेसाठी धावत येईन. या कामी मला देहाचा होम करावा लागला तरी मी फिरून याच भरतखंडात जन्म घेईन व अपुरे राहिलेले काम करून दाखवीन, ” अशी शपथ घेतली.

Senapati Bapat Information in Marathi

बी. ए. ची पदवी संपादन केल्यावर Senapati Bapat उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले; परंतु इंग्लंडमधील वास्तव्यातही त्यांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचाच ध्यास लागून राहिला होता . त्या ठिकाणी ते काही हिंदी क्रांतिकारकांच्या सहवासात आले आणि लवकरच क्रांतिकार्याकडे ओढले गेले. त्या सुमारास बंगालच्या फाळणीमुळे भारतातील राजकीय वातावरण तापले होते.

स्वाभाविकच त्याचे पडसाद इंग्लंडमध्ये वास्तव्य करीत असलेल्या हिंदी क्रांतिकारकांच्या गोटातही उमटत होते. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारतातील इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्याचे ‘ इंडिया असोसिएशन’चे ते सदस्य बनले. मनसुबे ते रचू लागले होते. सेनापती बापटही त्यात सहभागी झाले. सुप्रसिद्ध क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने सेनापती बापट बॉम्ब बनविण्याची विद्या हस्तगत करण्यासाठी इंग्लंडहू फ्रान्सला रवाना झाले.

पॅरिसमध्ये काही दिवस राहून त्यांनी एका रशियन युवतीकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले. त्यासंबंधीची पुस्तिकाही त्यांनी भारतात पाठविली. पुढे १९०८ मध्ये ते भारतात परतले. पण ‘ माणिकतोळा ‘ बॉम्ब कटात त्यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे ते बरीच वर्षे भूमिगत राहिले. काही काळ त्यांनी शिक्षकाचा पेशाही पत्करला. पुढे सरकारने त्यांना पकडले; पण थोड्याच दिवसांत त्यांची मुक्तता झाली.

सन १९१४ नंतर Senapati Bapat सशस्त्र क्रांतीच्या मार्गापासून दूर झाले आणि समाजसेवेकडे वळले. या काळात त्यांनी झाडू हाती घेऊन सार्वजनिक स्वच्छता, रस्तेसफाई यांसारखी कामे केली. विविध सामाजिक प्रश्नांकडे जनतेचे लक्ष आकृष्ट करून त्यासंबंधी जनजागृती घडवून आणण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पुढे सशस्त्र क्रांतीच्या मार्गाचा त्याग करून त्यांनी महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्ग अनुसरला. सत्याग्रहीसदेखील क्रांतिकारकाइतके मनोधैर्य असावे लागते, असे ते म्हणत.

राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्याबद्दल त्यांनी अनेक वेळा कारावासाची शिक्षा भोगली होती. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापटांनी १९२१ मध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी पेट्यातील धरणग्रस्त गावांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा लढा उभारला. मुळशी पेट्यात धरण बांधून मुंबईला वीज पुरविण्याची एक योजना टाटा कंपनीने आखली होती. या धरणाच्या पाण्याखाली मुळशी पेट्यातील चोपन्न गावे बुडणार होती व सुमारे दहा हजार शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार होते.

” आईवरी विपत्ती, आम्ही मुले कशाला?
बंदीत मायभू ही, आम्ही खुले कशाला?
जखडून बांधियेली, बघवे तिच्या न हाला
तिज फास, नित्य फटके, हृदयात होय काला
रक्ताळले शरीर, भडका जिवात झाला
आईस सोडवाया येणार कोण बोला “

या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी मोठा लढा उभारला. या लढ्याचे नेतृत्व सेनापती बापट यांच्याकडे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सत्याग्रह करून आपणास अटक करवून घेतली. शेतकऱ्यांचा हा लढा तीन वर्षे चालू होता. या लढ्यात बापटांना चार वेळा शिक्षा झाली. यांपैकी शेवटची शिक्षा सात वर्षांच्या सक्तमजुरीची होती. या लढ्याच्या नेतृत्वामुळे त्यांना ‘ सेनापती ‘ ही पदवी मिळाली.

सेनापती बापटांनी अन्याय व जुलूम याविरुद्धच्या अनेक लढ्यांत अग्रभागी राहून आपली ‘ सेनापती ‘ ही प सार्थ ठरविली होती. सन १९४२ च्या ‘ चले जाव ‘ आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती . महाराष्ट्रातील संस्थानी प्रजेने आपल्या हक्कांसाठी चालविलेल्या संघर्षातही त्यांनी भाग घेतला होता. १९५५ मध्ये भारतीय जनतेने गोव्यातील पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात सत्याग्रहाची मोहीम उघडली. या गोवा मुक्तीच्या लढ्यातही सेनापती बापटांचा सहभाग होता.

त्यांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचा लढा म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा उल्लेख करता येईल. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी मराठी जनतेने १९५५ पासून जे अभूतपूर्व आंदोलन उभारले त्यामध्ये सेनापती बापट अग्रभागी होते. संयुक्त महाराष्ट्रसमितीच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक होते . बेळगावच्या सीमाप्रश्नासंबंधी झालेल्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते.

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ।
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले ।
खरा वीर वैरी पराधीनतेचा ।
महाराष्ट्र आधार या भारताचा ।

सेनापतींनी लिहिलेल्या या काव्यपंक्तींवरून त्यांचा जाज्वल्य महाराष्ट्राभिमान दिसून येतो. महर्षी अरविंद घोष यांच्या क्रांतिकारी व आध्यात्मिक अशा दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा सेनापती बापटांवर प्रभाव होता. महर्षी अरविंदांच्या ‘ दी लाईफ डिव्हाइन ‘ या ग्रंथाचा त्यांनी ‘ दिव्य जीवन ‘ या नावाने मराठीत अनुवाद केला आहे. याखेरीज ‘ चैतन्यगाथा ’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. संस्कृत, इंग्रजी व मराठी या भाषांतून त्यांनी काव्यरचना केली आहे.

हैदराबादच्या तुरुंगात सेनापती बापट यांनी Holy Sung (होली संग) या नावाचा इंग्रजी काव्यसंग्रह लिहिला. अशा प्रकारे सशस्त्र क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, तत्त्वचिंतक अशा विविध नात्यांनी भारतमातेची व भारतीय जनतेची सेवा करणारा हा सेनापती बापट यांचा २८ नोव्हेंबर, १९६७ रोजी मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा –

Related Posts