मेनू बंद

शब्दयोगी अव्यय म्हणजे काय | प्रकार | Shabdayogi Avyay in Marathi

Shabdayogi Avyay in Marathi: मराठी व्याकरणामध्ये ‘ शब्दयोगी अव्यय ‘ हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आणि शब्दयोगी अव्यायाचे किती प्रकार आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया.

शब्दयोगी अव्यय म्हणजे काय | प्रकार | Shabdayogi Avyay in Marathi

शब्दयोगी अव्यये पुढील उतारा वाचा .

“ गुलाबांच्या रोपट्यावर सूर्याची सोनेरी किरणे पडली. चिमणीने घरट्याबाहेर झेप घेतली. तिच्या मागोमाग चिमणाही बाहेर पडला. याच संधीची चित्रकार केव्हापासून वाट पाहात होता. त्याची त्याची लहान बहीण गुलाबांच्या रोपट्याखाली पाकळ्या वेचीत होती. चिमणी दूर हिरवळीवर पिलांसाठी चारा टिपत होती. “

‘ वरील उताऱ्यातील ‘ वर, बाहेर, ही, पासून, खाली, साठी ‘ हे जाड टाइप छापलेले शब्द त्यांच्यामागे असलेल्या शब्दांना जोडून आलेले दिसतील. ते ज्या शब्दांना जोडून आलेले आहेत त्यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखादया शब्द संबंध जोडण्याचे काम करतात. उदाहरणार्थ, पहिल्या वाक्यातील ‘ वर ‘ हा शब्द ‘ रोपटे ‘ या शब्दाला जोडून आला आहे आणि तो ‘ रोपटे व पडली ‘ या शब्दांचा संबंध जोडण्याचे काम करतो. हे शब्दयोगी अव्यये आहेत.

शब्दयोगी अव्यय म्हणजे काय

शब्दाला जोडून जे अव्यय येतात त्यांना ‘ शब्दयोगी अव्यय ‘ असे म्हणतात. लिहिताना देखील हे शब्द मागील शब्दांना जोडूनच लिहावयास हवेत. शब्दयोगी अव्ययांच्या रूपांमध्ये लिंग, वचन विभक्ती, पुरुष विभक्ती यांमुळे बदल किंवा विकार होत नाही म्हणून त्यांना अविकारी किंवा अव्यये असे म्हणतात. ‘ वर, खाली, मागे, पुढे, बाहेर, पूर्वी, समोर ‘ यांसारखे शब्द मूळची क्रियाविशेषण अव्यये आहेत. पण वर उताऱ्यातील ‘ वर, खाली, बाहेर ‘ हे शब्द स्वतंत्रपणे येऊन क्रियापदाबद्दल विशेष अशी माहिती सांगत नाहीत. म्हणून ती क्रियाविशेषणे नाहीत.

शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यये यांतील फरक

पुढील दोन गटांतील वाक्ये पाहा.

गट १गट २
(१) वानर झाडावर चढला.
(२) टेबलाखाली फोन पडला.
(३) बाळ आईमागे लपले.
(१) वानर वर जात होता.
(२) तीला खाली बसणे आवडते.
(३) मागे या ठिकाणी मंदिर होते.

वरील दोन्ही गटांत ‘ वर, खाली, मागे ‘ हे शब्द दिसतात. पहिल्या गटातील शब्द शब्दयोगी अव्ययांचे काम करतात. कारण ते शब्द अगोदरच्या शब्दाला जोडून आले आहेत. दुसऱ्या गटातील तेच शब्द क्रियाविशेषण अव्यये आहेत कारण ते क्रियापदाबद्दल अधिक माहिती देऊन ‘ अव्यये ‘ राहतात. शब्दयोगी अव्यये सामान्यतः नामांना जोडून येतात. तसे असले तरी शब्दयोगी अव्यये क्रियापदे आणि क्रियाविशेषणे यांनाही केव्हा केव्हा जोडून येतात.

शब्दयोगी अव्ययांचे प्रकार

शब्दयोगी अव्ययांचे (Shabdyogi Avyay) त्यांच्या अर्थावरून पुढील प्रकार पडतात. ते याप्रमाणे आहेत –

 1. कालवाचक – आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो.
 2. गतिवाचक – आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून.
 3. स्थलवाचक – आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक, समीप, समक्ष.
 4. करणवाचक – मुळे, योगे, करून, कडून, द्वारा, करवी, हाती.
 5. हेतुवाचक – साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव.
 6. व्यतिरेकवाचक – शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, परता.
 7. तुलनावाचक – पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस.
 8. योग्यतावाचक – योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकूम.
 9. कैवल्यवाचक – च, मात्र, ना, पण, फक्त, केवळ.
 10. संग्रहवाचक – सुद्धा, देखील, ही, पण, बरीक, केवळ, फक्त.
 11. संबंधवाचक – विशी, विषयी, संबंधी.
 12. साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, निशी, समवेत.
 13. भागवाचक – पैकी, पोटी, आतून.
 14. विनिमयवाचक – बद्दल, ऐवजी, जागी, बदली.
 15. दिक्वाचक – प्रत, प्रति, कडे, लागी.
 16. विरोधवाचक – विरुद्ध, वीण, उलटे, उलट.
 17. परिमाणवाचक – भर.

हे सुद्धा वाचा

Related Posts