आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक शंकर पाटील यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Shankar Patil यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

शंकर पाटील कोण होते
शंकर बाबाजी पाटील हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मराठी लेखक होते. मराठीतील ग्रामीण कथालेखक म्हणून शंकर पाटील सर्वांना परिचित आहेत. त्यांचे संपूर्ण नाव शंकर बाबाजी पाटील असे होते. पाटलांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली या गावी ८ ऑगस्ट, १९२६ रोजी झाला. शंकर पाटील यांचे शिक्षण तारदाळ, गडहिंग्लज व कोल्हापूर या गावी झाले. त्यांनी बी.ए., बी.टी. पर्यंत शिक्षण घेतले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर पाटलांनी रयत शिक्षण संस्थेत काही वर्षे शिक्षकाची नोकरी केली. पुढे १९५७ मध्ये त्यांची आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नियुक्ती झाली. शंकर पाटील हे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली होती. ‘ वळीव ‘ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९५८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सरस अशा कथा लिहून वाचकांचे लक्ष आपल्याकडे आकृष्ट करून घेतले. १९६० पासून त्यांच्या कथालेखनाला विशेष बहर आला. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले.
Shankar Patil Information in Marathi
प्रयोगशीलता हे Shankar Patil यांच्या लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाई. कथालेखनात सतत नवनवे प्रयोग करून त्यात नावीन्य आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ग्रामीण समाजाचे हुबेहूब चित्रण मोठ्या बहारीने आणि काहीशा विनोदी ढंगाने करण्यात पाटलांचा हातखंडा होता. ग्रामीण माणसाचा मूळचा साधासरळ स्वभाव, पण परिस्थितीने त्याच्यात आणलेला बेरकीपणा, राजकारणामुळे ग्रामीण जीवनात होऊ लागलेले परिवर्तन या सर्वांचे त्यांनी अतिशय आकर्षक शैलीत वर्णन केले.
ग्रामीण जीवनाचा आणि तेथील माणसांचा अचूक वेध घेण्याची क्षमता त्यांच्या लेखणीत होती. शंकर पाटलांनी वगनाट्य, चित्रपटकथा, कादंबरी इत्यादी वाङ्मयप्रकारही प्रभावीपणे हाताळले. त्यांनी गल्ली ते दिल्ली, कथा अकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापूरची ही वगनाट्ये लिहिली. याशिवाय मराठीतील अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा व संवादही त्यांनी लिहिले.
Shankar Patil यांच्या कथा व संवाद असलेले काही महत्त्वाचे चित्रपटह्न एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, पिंजरा, डोंगरची मैना, गणगौळण, पाहुणी, भोळी भाबडी, चोरीचा मामला इत्यादी. शंकर पाटील यांच्या काही कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही लाभले. त्यांच्या अनेक कथांची निरनिराळ्या भारतीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने मराठी विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. सन १९८५ मध्ये नांदेड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शंकर पाटील यांचा मृत्यू ३० जुलै, १९९४ ला झाला.
शंकर पाटील यांचे पुस्तक, ग्रंथ व साहित्य
कथासंग्रह
- वळीव
- भेटीगाठी
- आभाळ
- धिंड
- ऊन
- वावरी शेंग
- खुळ्याची चावडी
- पाहुणी
- फक्कड गोष्टी
- खेळखंडोबा
- ताजमहालमध्ये सरपंच
- इत्यादी
कादंबरी
- टारफुला
हे सुद्धा वाचा –