मेनू बंद

शाश्वत शेती म्हणजे काय?

शाश्वत शेती (Sustainable Agriculture) ही वनस्पती आणि प्राण्यांच्या उत्पादनाची एकात्मिक कृषी प्रणाली आहे, जी पर्यावरणीय तत्त्वे लक्षात घेऊन केली जाते. या आर्टिकल मध्ये आपण, शाश्वत शेती म्हणजे काय आणि Shashwat Sheti ची मुख्य उद्दिष्ट्ये व घटक कोणती आहेत, जाणून घेणार आहोत.

शाश्वत शेती म्हणजे काय?

शाश्वत शेती म्हणजे काय

संसाधनांचे संरक्षण व संधारण करून जी शेती केली जाते त्या शेतीस शाश्वत शेती (Sustainable Agriculture) म्हणतात. केरळ, तामिळनाडू व महाराष्ट्रामध्ये काही भागांत शाश्वत शेती केली जाते. शाश्वत शेतीला सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरणीय शेती असेही म्हणतात. शाश्वत शेतीमध्ये पर्यावरण संतुलनाला खूप महत्त्व आहे. म्हणून त्याला पर्यावरणीय शेती म्हणतात.

शाश्वत शेती पोषक व्यवस्थापनासाठी मुख्य स्त्रोत म्हणून सेंद्रिय पदार्थांचा वापर करते. जगप्रसिद्ध कृषी तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी वसंतराव नाईक यांनी शाश्वत शेतीचा मूळ मंत्र देत शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचा संदेश दिला.

शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्ट्ये (Main Objectives of Sustainable Agriculture)

  1. पर्यावरणाचे संतुलन राखणे.
  2. सामाजिक-आर्थिक समता साध्य करणे.
  3. आर्थिक लाभ मिळवणे.

शाश्वत शेती चे घटक (Elements of Sustainable Agriculture)

1. सूक्ष्म जलसिंचन (Micro irrigation): शेतीसाठी आवश्यक तितक्याच पाण्याचा वापर करणे सूक्ष्मजलसिंचनामुळे साध्य झाले. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सूक्ष्मजलसिंचनाच्या पद्धती आहेत. फळबागा, फूलशेती, वनशेती यांसाठी सूक्ष्मजलसिंचन यशस्वी ठरले आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रसार झाला आहे.

2. जैवतंत्रज्ञान (Biotechnology): पिकांची वाढ, गुणवत्तापूर्ण उत्पादन, रोग व किडींवरील नियंत्रण साध्य करण्यासाठी विविध सजीवांचा वापर करण्याचे तंत्र म्हणजे जैवतंत्रज्ञान होय. जैवतंत्रज्ञानाचा वापर अलीकडच्या काळात प्रगत शेतकरी शेतीत करीत आहेत.

3. पॉलीहाऊस (Polyhouse): काही मौलिक पिकांच्या उत्पादनासाठी पॉलिथिन कापडापासून निवारा तयार करतात, त्यास पॉलीहाऊस म्हणतात. हे कापडी निवारे अर्धगोलाकार, चौकोनी आणि लांबट असतात. त्यांच्यात तापमान, आर्द्रता, वायुजीवन नियंत्रित करणारी उपकरणे बसवितात. यामुळे प्रखर उष्णता, तीव्र सूर्यप्रकाश, वादळी वारे, गारा, थंडीची लाट यांपासून पिकांचे संरक्षण होते. फूलशेती, रोपवाटिका यांकरिता पॉलीहाऊसचा वापर होतो.

4. आधुनिक अवजारे व यंत्रे (Modern tools and machines): शेतकामातील कार्यक्षमता वाढण्यासाठी पारंपरिक अवजारे व यंत्रे यांत सुयोग्य असे बदल झाले आहेत. ट्रॅक्टर, पेरणीयंत्रे, मळणीयंत्रे, फवारणी उपकरणे यांचा वापर वाढला आहे.

5. साठवणूक व प्रक्रिया तंत्र (Storage and processing techniques): काही कृषी उत्पादने हंगामी व नाशवंत असतात. त्यांची योग्य व शास्त्रीय पद्धतीने साठवणूक केल्यास ती उत्पादने बाराही महिने उपलब्ध होऊ शकतात. धान्य साठविण्यासाठी गोदामे, दूध, फळे, मांस अशा नाशवंत मालासाठी शीतगृहे व शीतपेट्यांचा वापर महत्त्वाचा आहे.

शाश्वत शेतीचे फायदे (Benefits of sustainable farming)

  1. यामुळे जमिनीची सुपीकता तर राहतेच पण त्याचबरोबर ती वाढते.
  2. रसायनांच्या अतिवापरामुळे होणाऱ्या प्रदूषणात घट.
  3. जमिनीत फायदेशीर सूक्ष्मजीवांची पुरेशी संख्या राखते.
  4. भूगर्भातील पाण्याची पातळी राखणे.
  5. नैसर्गिक संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करण्यावर भर.
  6. पोषक तत्वांचा समतोल आणि दीर्घकाळ उपयोग होतो.

हे सुद्धा वाचा-

Related Posts