आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक शिवाजी सावंत यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Shivaji Sawant यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

शिवाजी सावंत कोण होते
शिवाजी सावंत हे मराठी भाषेतील भारतीय कादंबरीकार होते. ‘मृत्युंजय’ ही प्रसिद्ध मराठी कादंबरी लिहिल्याबद्दल त्यांना ‘मृत्युंजयकार’ म्हणून ओळखले जाते. 1994 मध्ये मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले मराठी लेखक होते. या मराठमोळ्या तरीही आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील अजरा येथे ३१ मार्च, १९४० रोजी झाला.
‘ययाती’ कर्ते वि. स. खांडेकर आणि ‘ स्वामी ‘ कार रणजित देसाई यांच्या लेखनशैलीशी असलेली नाळ तुटू न देणारा, परंतु तरीही स्वतःची वेगळी अशी शैली निर्माण करणारा, आपल्या लेखणीचं वेगळं अस्तित्व जपणारा आणि या वेगळ्या लेखणीतून आगळा साहित्याविष्कार घडविणारा कोल्हापूरच्या मातीत वाढलेल्या ह्या साहित्यिकाने शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर, जेमतेम कॉलेजचा उंबरठा ओलांडलेला.
Shivaji Sawant Information in Marathi
Shivaji Sawant यांच शिक्षण जीवनाच्या अनुभवातून आणि त्याहीपेक्षा स्वतःच्याच अंतर्मनात खोल प्रवेश करून इतरांच्या अंतर्मनाचा वेध घेण्याच्या त्यांना लाभलेल्या कलेतून झाला. अंतर्मनात उठलेल्या संज्ञातरंगातूनच त्यांनी ‘ मृत्युंजय ‘ (१९६७) या कादंबरीतून आजवर उपेक्षिल्या गेलेल्या कौतेय कर्णाच्या अंतर्मनाचा वेध घेतला. त्याच्या भाव – भावनांना शब्दरूप दिले. आपल्या अंतःप्रेरित लेखणीनेच त्यांनी संभाजी राजांच्या अस्वस्थ मनोवस्थेचाही वेध घेतला.
राजांच्या अनामिक जखमेवर आपल्या शब्दांनी त्यांनी फुंकर घातली. त्यातूनच ‘ छावा ‘ (१९७९) या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीचा जन्म झाला. इतिहासरूपाने उपेक्षिलेल्या ‘ कर्ण ‘ आणि ‘ संभाजी ‘ यांसारख्या व्यक्तिरेखांना न्याय देणाऱ्या सावंतांनी सर्वांनी ज्याला ललामभूत मानले त्या श्रीकृष्णाचेही वस्तुनिष्ठ चित्रण ‘ युगंधर ‘ (२०००) या कादंबरीतून केले आहे.
‘लढत’ (१९८६) आणि ‘ संघर्ष ‘ (१९९५) या दोन चरित्रग्रंथांतून Shivaji Sawant यांनी जीवनाच्या दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळ्या प्रकारचा जीवनसंघर्ष करणाऱ्या परस्परांहून अगदी भिन्न अशा ‘ विठ्ठलराव विखे पाटील ‘ व ‘ भाई मनोहर कोतवाल ‘ या लढाऊ व्यक्तिमत्त्वांची स्फूर्तिदायी जीवनगाथा वाचकांपुढे उलगडली आहे . त्यांचा जीवनसंघर्ष वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा केला आहे.
भाषेवर असामान्य प्रभुत्व असणारा हा साहित्यिक ‘ श्रुतिदेवी सरस्वतीची मूर्ती ‘ हे मानचिन्ह असलेल्या भारतीय ज्ञानपीठाकडून दिल्या जाणाऱ्या ‘मूर्तिदेवी पुरस्कारा’चा सन १९९४ चा मानकरी ठरला आहे. मूर्तिदेवी पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच मराठी साहित्यिक होत. सन २००३ च्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा केवळ काही दिवसांचाच प्रश्न उरलेला असतानाच अचानक १८ सप्टेंबर, २००२ रोजी त्यांचे निधन झाले.
हे सुद्धा वाचा –