आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक शिवराम महादेव परांजपे (१८६४-१९२९) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Shivram Mahadev Paranjape यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

शिवराम महादेव परांजपे हे महाराष्ट्रातील प्रख्यात मराठी लेखक, विद्वान, वक्ते, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक होते. 1898 ते 1908 या काळात त्यांनी आपल्या लोकप्रिय साप्ताहिक ‘काळ’ द्वारे ब्रिटिश राजवटीविरुद्ध महाराष्ट्रीय लोकांमध्ये अशांतता निर्माण केली.
शिवराम महादेव परांजपे मराठी माहिती
शिवरामपंत उर्फ शिवराम महादेव परांजपे हे एक प्रसिद्ध राष्ट्रवादी लेखक, निडर पत्रकार आणि प्रभावी वक्ते होते. शिवराम पंत यांचा जन्म २७ जून १८६४ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे झाला. त्यांचे शिक्षण महाड, रत्नागिरी आणि पुणे येथे झाले. 1884 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत त्यांना संस्कृत विषयासाठी ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळाली होती.
या शिष्यवृत्तीचे ते पहिले प्राप्तकर्ते होते. नंतर 1890 B.A. आणि M. 1892 मध्ये. M.A. ह्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काही काळ काम केले. यावेळेपासून त्यांनी व्याख्याने, पुराण, कीर्तन यांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य सुरू केले.
शिवरामपंत परांजपे यांनी १८९८ मध्ये ‘ काळ ‘ हे साप्ताहिक सुरू केले. २५ मार्च, १८९८ रोजी ‘ काळ’चा पहिला अंक प्रकाशित झाला. त्यांच्या ठायी असलेल्या जाज्वल्य राष्ट्राभिमानातूनच या साप्ताहिकाचा जन्म झाला. या पत्रानेच मराठी वाङ्मयक्षेत्रात त्यांचे नाव अजरामर केले. त्या काळात ‘ केसरी ‘ या पत्राच्या बरोबरीने ‘ काळ ‘ ने लोकप्रियता मिळविली होती.
शिवरामपंतांनी आपल्या या पत्राची जाहिरात धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निःपक्षपाताने व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे साप्ताहिक ‘ अशा शब्दांमध्ये केली होती. यावरून त्यांच्या लिखाणातील विषयांच्या विविधतेची कल्पना येते. अर्थात, त्यांतील मुख्य विषय राजकीयच होता; पण त्याला पूरक म्हणून इतर विषयांचीही त्यांनी दखल घेतली होती.
शिवराम महादेव परांजपे यांचे वृत्तपत्र
आपल्या ‘ काळ ‘ वृत्तपत्रतून शि. म. परांजपे यांनी तत्कालीन ब्रिटिश शासनावर कठोर प्रहार केले आणि येथील तरुणांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविले ; त्यामुळे सरकारने ‘ काळ ‘ मधील त्यांचे लेख जप्त केले. या लेखांवरून सरकारने सन १९०८ मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला . त्यामध्ये त्यांना एकोणीस महिन्यांची सक्तमजुरी शिक्षा झाली. शिवरामपंत तुरुंगातून सुटून येईपर्यंत ऑक्टोबर, १९०९ पर्यंत ‘ काळ ‘ पत्र सुरू होते ; पण पुढे मात्र ते सरकारच्या रोषाचा बळी ठरले.
सरकारने मागणी केलेल्या दहा हजार रुपयांच्या जात – मुचलक्याची पूर्तता करणे आर्थिक स्थितीमुळे अशक्य असल्याने शिवरामपंतांना नाइलाजाने काळ बंद करणे भाग पडले; तथापि, लोक मात्र त्यांना ‘ काळकर्ते ‘ म्हणून ओळखत राहिले. १२ ऑगस्ट, १९२० रोजी शिवरामपंतांनी ‘ स्वराज्य ‘ हे साप्ताहिक सुरू केले; परंतु ते ‘ काळ ‘ इतके लोकप्रिय ठरले नाही. महात्मा गांधींनी १९२० मध्ये असहकाराची चळवळ सुरू केल्यावर शि. म. परांजपे त्या चळवळीत सहभागी झाले. १ मे, १९२२ रोजी त्यांनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
Shivram Mahadev Paranjape Information in Marathi
Shivram Mahadev Paranjape यांनी मराठी साहित्यक्षेत्राची केलेली सेवा लक्षात घेऊन १९२९ या वर्षाच्या पूर्वार्धात बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. ‘ काळ ‘ पत्रातील आपल्या लेखनाद्वारे शिवरामपंतांनी निर्भेळ राजकीय स्वातंत्र्या – विषयी प्रेम व गुलामगिरीचा द्वेष या भावना हरतन्हांनी व हरप्रकारे चेतवीत ठेवल्या वाचकांना देशाभिमानी बनविणे किंवा त्यांच्या देशाभिमानाला फुंकर घालणे आणि त्यांच्यापुढे शुद्ध स्वातंत्र्यकल्पना मांडणे, हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यांचे राजकारण म्हणजे निर्भेळ आणि संपूर्ण ध्येयवादी स्वातंत्र्याचा काव्यमय व कल्पनारम्य उद्घोष होय.
Shivram Mahadev Paranjape यांच्या लिखाणात देशाभिमान, पांडित्य, रसिकता इत्यादींचे मनोज्ञ मिश्रण होते. साहजिकच वाचकांच्या मनावर त्याची जबरदस्त मोहिनी पडत असे. ‘ वक्रोक्ती ‘ व ‘ व्याजोक्ती ‘ यांचा वापर हे शिवरामपंतांच्या वक्तृत्वाप्रमाणेच त्यांच्या लेखनाचेही प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. मराठी साहित्यात वक्रोक्तीचा विपुल प्रमाणावर वापर प्रथम शिवरामपंतांनीच केला. त्यांची वक्रोक्ती ही जशी स्वभावसहज होती. तशी ती तत्कालीन जाचक पद्धतीने त्यांच्यावर लादलेली होती; त्यामुळे त्यांच्या लिखाणातून ती ठायी ठायी व्यक्त होत असे.
इंग्रज सरकारने राजकीय स्वरूपाच्या लिखाणावर जाचक निर्बंध घातल्याने राजकीय विषयावर सडेतोड लिहिणे धोक्याचे झाले होते. अशा वेळी शि. म. परांजपे यांनी वक्रोक्तीचा अवलंब करीत सरकारवरील आपले शरसंधान चालूच ठेवले. उपरोध व उपहास यांनी भरलेल्या त्यांच्या लेखनाने वाचकवर्गावर त्यांना अपेक्षित असलेला परिणाम निश्चितच साधला गेला. त्याचबरोबर शिवरामपंतांची शैली मराठी साहित्याचे अजरामर लेणे बनून राहिली. शिवराम महादेव परांजपे यांचा मृत्यू २७ सप्टेंबर, १९२९ ला झाला.
शिवराम महादेव परांजपे यांचे साहित्य व लेखन
परांजपे यांनी एक हजाराहून अधिक राजकीय आणि सामाजिक निबंध आणि समीक्षा लिहिली; लघुकथा; कादंबऱ्या; आणि नाटके. १९२९ मध्ये बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यांच्या कार्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे.
- मराठ्यांच्या लढायांचा इतिहास
- तर्कभाषा
- तर्क – संग्रहदीपिका
- रामदेवराम
- मानाजीराव
- पहिला पांडव
- अर्थसंग्रह
- रामायणाविषयी काही विचार
- गोविंदाची गोष्ट विद्याचल
- अहल्याजार काव्य
- कालिदासाने न लिहिलेले नाटक
हे सुद्धा वाचा –