मेनू बंद

श्रीधर व्यंकटेश केतकर – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर (१८८४-१९३७) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Shridhar Venkatesh Ketkar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर - Shridhar Venkatesh Ketkar

श्रीधर व्यंकटेश केतकर हे महाराष्ट्र, भारतातील समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि कादंबरीकार होते. मराठी भाषेतील पहिला विश्वकोश असलेल्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे मुख्य संपादक म्हणून ते ओळखले जातात. भारतातील त्यांची पहिली नियुक्ती कलकत्ता विद्यापीठात अर्थशास्त्र, प्रशासन विज्ञान आणि सार्वत्रिक न्यायशास्त्राचे प्राध्यापक म्हणून झाली. १९१६ ते १९२८ पर्यंत केतकरांचे विश्वकोशातील कार्य त्यांच्याकडे होते. ते केवळ प्रवर्तक आणि संपादकच नव्हते तर संपूर्ण प्रकल्पाचे लेखापाल आणि महाव्यवस्थापकही होते.

ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर

विश्वकोशकार केतकर हे साहित्यिक तसेच समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होते. त्यांचे पूर्ण नाव श्रीधर व्यंकटेश केतकर होते; पण त्यांनी मराठी विश्वकोश निर्मितीच्या आयुष्यात केलेल्या अनोख्या कार्यातून ते ‘विश्वकोशकार केतकर’ म्हणून ओळखले जातात. डॉ. केतकर यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी मध्य प्रदेशातील रायपूर गावात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले.

त्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून Ph.D. ही पदवी संपादित केली. Ph.D.साठी केतकरांनी ‘भारतातील जातींचा इतिहास’ (The History of Castes in India) हा प्रबंध सादर केला होता. या प्रबंधात त्यांनी मनुस्मृतीची कालगणना आणि त्या काळातील जातिव्यवस्थेचे स्वरूप याबाबत काही महत्त्वाचे निष्कर्ष मांडले होते.

अमेरिकेतून ते पुढे इंग्लंडला आले. इंग्लंडमधील वास्तव्यातच त्यांचा जर्मन ज्यू युवती मिस् इडिथ कोहेन यांच्याशी परिचय झाला. त्याची परिणती त्या दोघांच्या विवाहात होऊन १४ मे, १९२० रोजी मिस कोहेन ह्या शीलवतीबाई केतकर बनल्या. शीलवतीबाई आपल्या पतीच्या जीवनाशी व कार्याशी पूर्णपणे एकरूप झाल्या होत्या. मराठी ज्ञानकोश निर्मितीच्या कार्यात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला होता.

डॉ. केतकरांनी समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर संशोधनपर असे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. या संदर्भात अॅन एसे ऑन हिंदुइझम: इट्स फॉर्मेशन अँड फ्यूचर; ॲन एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स; हिंदू लॉ अँड दी मेथड्स अँड दी प्रिन्सिपल्स ऑफ दी हिस्टॉरिकल स्टडी देअरऑफ; व्हिक्टोरिअस इंडिया इत्यादी ग्रंथांचा उल्लेख करावा लागेल.

आपल्या समाजशास्त्रीय संशोधनात त्यांनी काही महत्त्वाचे पण वादग्रस्त विचार व्यक्त केले आहेत. भारतात अनेक मानववंशाच्या शेकडो टोळ्या आपापली वैशिष्ट्ये सांभाळून कित्येक वर्षे परस्परांच्या शेजारी राहिल्या आणि त्यातून येथील जातिबद्ध समाज तयार झाला, असे त्यांचे मत होते. डॉ. केतकर सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. मात्र या प्रश्नाचा अधिक मूलगामी दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे, असे त्यांना वाटत होते.

Shridhar Venkatesh Ketkar Information in Marathi

Shridhar Venkatesh Ketkar हे साहित्यिक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. सन १९२७ मध्ये त्यांनी ‘ गावसासू ‘ ही पहिली कादंबरी लिहिली. त्यानंतर त्यांच्या ‘ ब्राह्मणकन्या ‘ , ‘ गोंडवनातील प्रियंवदा ‘ , ‘ विचक्षणा ‘ , ‘ आशावादी ‘ , ‘ भटक्या ‘ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून समाजाचे विविधांगी चित्रण केले . त्याबरोबरच त्यांनी स्त्री सत्ता पराभव ‘ हे नाटकही लिहिले. भिन्नधर्मीय पति – पत्नीची संतती, कलावंतिणीच्या विवाहाचा प्रश्न, आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न, विवाहपूर्व अनुनय असे अनेक सामाजिक विषय त्यांनी हाताळले.

आपल्या कादंबऱ्यांतून त्यांनी सामाजिकदृष्ट्या क्रांतिकारक विचार मांडले; पण त्यांत कलात्मकतेचा अभाव आढळतो, अशी टीका केली जाते. त्यामध्ये काही तथ्यही आहे. ललित वगैरे साहित्याच्या अंगांचा त्यांनी फारसा विधिनिषेध बाळगला नाही. रचनासौंदर्याकडे लक्ष दिले नाही; परंतु आपल्या साहित्यकृतींतून त्यांनी आपल्या प्रचंड वैचारिक सामर्थ्याचा प्रत्यय आणून दिला.

डॉ. केतकरांनी अन्य विषयांवरही माहितीपूर्ण व उद्बोधक लिखाण केले आहे. महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण, निःशस्त्रांचे राजकारण, ज्ञानकोश मंडळाचा इतिहास इत्यादी अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर जमा आहेत. याशिवाय ‘ पुणे समाचार ‘ हे दैनिक व ‘ विद्यासेवक ‘ हे मासिकही त्यांनी चालविले होते.

डॉ. केतकरांना प्रसिद्धी मिळवून देणारे काम म्हणजे त्यांचे ‘महाराष्ट्रीय विश्वकोश’ संपादन. विश्वकोशाचे हे खंड त्यांनी जवळजवळ केवळ संपादित केले. हे काम खरंच खूप मोठं होतं. केतकरांना हे कार्य त्यांच्या हयातीत पूर्ण करता येईल का, अशी शंका तत्कालीन अनेक अभ्यासकांना होती; पण केतकरांनी ते यशस्वीपणे पूर्ण करून मराठीच्या ज्ञानात मोलाची भर घातली.

सन १९१६ मध्ये त्यांनी नागपूर येथे ‘ ज्ञानकोश मंडळा’ची स्थापना केली. सन १९२६ मध्ये शारदोपासन संमेलनाचे अध्यक्ष, तर पुढे १९३१ मध्ये साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा मृत्यू १० एप्रिल, १९३७ ला झाला.

हे सुद्धा वाचा –

Related Posts