आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Shripad Krushna Kolhatkar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर मराठी माहिती
मराठीतील ज्येष्ठ विनोदी लेखक, नाटककार व वाङ्मय समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर असे होते. त्यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा येथे २९ जून, १८७१ रोजी झाला. त्यांच्या काळातील सामाजिक रितीरिवाजानुसार, कोल्हटकर यांच्या कुटुंबाने ते १४ वर्षांचे असताना त्यांचे लग्न लावून दिले. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले आणि १८९१ मध्ये बॅचलर पदवी मिळवण्यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८९७ मध्ये कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी अकोला आणि नंतर जळगाव जामोद येथे वकिली सुरू केली.
तेव्हाच्या काळातील सामाजिक परिस्थिति नुसार कोल्हटकर यांच्या कुटुंबाने त्यांचे वय 14 वर्षांचे असताना त्यांचे लग्न लावून दिले. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले आणि 1891 मध्ये त्यांनी बॅचलर पदवी मिळविण्यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश केला. 1897 मध्ये कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अकोला आणि नंतर जळगाव जामोद येथे कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली.
त्यांचे शिक्षण अकोला, पुणे आणि मुंबई येथे झाले. त्यांनी 1891 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून B. A. परीक्षा पास पास केली. पुढे 1897 मध्ये ते L.L.B. झाले. नंतर त्यांनी अकोला आणि खामगाव येथे वकिली केली.
कोल्हटकरांनी वाङ्मयाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत विपुल प्रमाणात लिखाण केले आहे. त्यामध्ये नाटक, विनोदी लेख, टीका, कथा, कविता, कादंबरी, निबंध, आत्मवृत्त, स्फुटलेखन इत्यादींचा समावेश होतो. कोल्हटकरांनी १८९३ मध्ये ‘ विविध ज्ञानविस्तार ‘ या मासिकात ‘ संगीत विक्रम – शशिकला ‘ या नाटकावर टीकालेख लिहून आपल्या वाङ्मयसेवेचा प्रारंभ केला. त्यानंतर विविध वाङ्मयप्रकारांत त्यांनी सातत्याने लेखन केले. मराठी वाङ्मयात अशा प्रकारची भर घालतानाच कोल्हटकरांनी वैभव आणि सौंदर्य ही दोन्ही वृद्धिंगत केली.
Shripad Krushna Kolhatkar Information in Marathi
Shripad Krushna Kolhatkar हे विनोदी लेखक म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्यातील विनोदी लेखनाची परंपरा त्यांच्यापासूनच सुरू होते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. साक्षीदार हा त्यांचा पहिला विनोदी लेख १९०२ मध्ये विविध ज्ञानविस्तार मध्ये प्रसिद्ध झाला. सुदाम्याचे पोहे अर्थात, १८ धान्यांचे कडबोळे ‘ हा त्यांचा विनोदी लेखांचा संग्रह विशेष प्रसिद्ध आहे . त्यातील काही पात्रे मराठी साहित्यात अजरामर झाली आहेत. कोल्हटकरांचा विनोद निर्मळ, निरोगी, सुसंस्कृत व अभिरुचिसंपन्न आहे.
समाजजीवनातील विविध व्यवहारांचे उपरोध व उपहास यांच्या साहाय्याने त्यांनी परिणामकारक चित्रण केले आहे. तसेच काही वेळा अतिशयोक्तीचा आधार घेत मानवी जीवनातील विसंगतींवर त्यांनी अचूक बोट ठेवले आहे . कोल्हटकरांचे विनोदी लेखन महाराष्ट्रात त्यांची शिष्यपरंपरा निर्माण करण्याइतपत प्रभावी व दर्जेदार होते. महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ विनोदी लेखक राम गणेश गडकरी हे कोल्हटकरांना गुरुस्थानी मानत असत आणि गडकन्यांना गुरू मानणारे तर अनेकजण होते.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे नाटककार व कवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक नाटके लिहिली होती. त्यांच्या नाटकांना रंगभूमीवर फार मोठे यश मिळाले असे म्हणता येत नसले तरी कथानक, संवाद इत्यादी बाबतींत मराठी नाटकांमध्ये त्यांनी नावीन्य आणले हे निश्चित. कोल्हटकरांच्या नाटकांतून त्यांची कल्पकता व कलात्मक सौंदर्यदृष्टी या गुणांचाही आपणास प्रत्यय येतो.
त्यांनी लिहिलेल्या कवितांची संख्या फार मोठी नाही; परंतु त्यांतील काही कविता वाङ्मयीन गुणांच्या दृष्टीने निश्चितच सरस होत्या, ‘ बहु असोत सुंदर संपन्न की महा ‘ हे आपणा सर्वांच्या परिचयाचे ‘ महाराष्ट्र गीत ‘ त्यांनीच लिहिले आहे.
नाटक
- श्रमसाफल्य
- गुप्तमंजूषा
- जन्मरहस्य
- परिवर्तन
- वधूपरीक्षा
- प्रेमशोधन
- मतिविकार
- मायाविवाह
- मूकनायक
- वीरतनय
- शिवपावित्र्य
- सहचारिणी
कादंबरी
- श्यामसुंदर
- सुदाम्याचे पोहे
- अठरा धान्यांचे कडबोळे
- ज्योतिषगणित
हे सुद्धा वाचा –