आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक श्रीपाद महादेव माटे यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Shripad Mahadev Mate यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

श्रीपाद महादेव माटे
श्रीपाद महादेव माटे हे महाराष्ट्रातील एक मराठी लेखक आणि समाजसुधारक होते. माटे हे व्यवसायाने इंग्रजी आणि मराठी साहित्याचे शिक्षक होते. वयाच्या चौर्याचाळीसाव्या वर्षी तुलनेने उशिराने त्यांनी लेखन सुरू केले असले तरी, त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांनी विविध सामाजिक, वैज्ञानिक, चरित्रात्मक आणि ऐतिहासिक विषयांवर उत्कृष्ट आणि विपुल लेखन केले. श्रीपाद महादेव माटे हे एक प्रसिद्ध मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.
त्यांचा जन्म 2 सप्टेंबर 1886 रोजी विदर्भातील शिरपूर गावात झाला. त्यांचे शिक्षण सातारा व पुणे येथे झाले. M. A. पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर माटे यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली. पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणूनही काम केले. अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. समाजातील उपेक्षित घटकांबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा वाटत होता व तो त्यांच्या ललित लेखनातून व्यक्त झाला आहे. ते विज्ञाननिष्ठेबद्दलही प्रसिद्ध होते.
आकर्षक मांडणी, मार्मिक शब्दकळा व आंतरिक जिव्हाळा ही माटे यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये समजली जातात. मानवी जीवनाविषयी अपार प्रेम व करुणा यांमुळे त्यांचे लेखन हृदयस्पर्शी झाले आहे. येथील समाजातील उपेक्षित जमातींमधील व्यक्तींचे आपल्या कथांमधून त्यांनी प्रत्ययकारी चित्रण केले आहे.
Shripad Mahadev Mate Information in Marathi
Shripad Mahadev Mate यांनी केसरी – प्रबोध , महाराष्ट्र सांवत्सरिक आणि विज्ञानबोध या ग्रंथांचे संपादन केले होते . रोहिणी मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केले होते . ललित लेखनाबरोबर विचारप्रर्वतक लेखनही त्यांनी केले होते. आपल्या विपुल लेखनाद्वारे त्यांनी मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण भर घातली आहे. १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. मृत्यू – २५ डिसेंबर, १९५७ .
साहित्य – ग्रंथ लेखन
- अस्पृश्यांचा प्रश्न
- रसवंती जन्मकथा
- संत पंत व तंत
- परशुराम चरित्र
- गीतातत्त्वविमर्श
- रामदासांचे प्रपंच – विज्ञान
- साहित्यधारा
- विचारशलाका
- विचारमंथन
- भावनांचे पाझर
- उपेक्षितांचे अंतरंग
- माणुसकीचा गहिवर
- अनामिका
- आजकालचे विद्यार्थी
हे सुद्धा वाचा –