मेनू बंद

सिंधुताई सपकाळ – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक सिंधुताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Sindhutai Sapkal यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांची संपूर्ण माहिती

सिंधुताई सपकाळ या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या ज्या विशेषतः महाराष्ट्रातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सिंधुताई सपकाळ माहिती मराठी

सिंधुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे १४ नोव्हेंबर, १९४७ रोजी झाला. सिंधुताईंना लहानपणी ‘ चिंधी ‘ या टोपणनावाने ओळखले जाई. अत्यंत गरिबीत जन्मलेल्या सिंधुताईंचे शिक्षण कसेबसे इयत्ता चौथीपर्यंत झाले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्या पतीने त्याग केला. आपल्या मुलीसह सिंधुताई घराबाहेर पडल्या.

स्वतःवर ओढवलेल्या या प्रसंगामुळे त्या खचल्या नाहीत, तर या प्रसंगाने त्यांना जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. स्वतःच्या दुःखात त्यांना जगातील दुःखे दिसली. समाजातील गरीब, अनाथ बालकांच्या वेदना त्यांना जाणवल्या आणि अनाथ बालकांच्या संगोपनाच्या कार्यास त्यांनी स्वतःस वाहून घेतले. अनाथ मुलांचे संगोपन करताना आपल्या मुलीत व त्यांच्यात आपल्याकडून भेदभाव केला जाऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलीला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडे सोपविले.

Sindhutai Sapkal Information in Marathi

Sindhutai Sapkal यांनी अनाथांसाठी स्वत:ला वाहून घेतले. परिणामी, तिला प्रेमाने “माई”, म्हणजे “आई” म्हटले जाते. तिने 1,500 हून अधिक अनाथ मुलांचे पालनपोषण केले आहे. त्यांना आज अतिशय मोठा परिवार आहे. त्यांनी दत्तक घेतलेली अनेक मुले सुशिक्षित वकील आणि डॉक्टर आहेत. त्यांची काही दत्तक मुले – तिच्या जैविक मुलीसह – स्वतःचे स्वतंत्र अनाथालय चालवत आहेत.

त्यांच्या समर्पण आणि कार्यासाठी तिला 900 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परंतु, त्यांनी अनाथ मुलांसाठी घर बनवण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी पुरस्काराची ती रक्कम वापरली. व्यक्तिशः, सपकाळ समाज आणि तरुणांसाठी एक प्रेरक व्यक्ति आहेत. आजपर्यंत त्यांनी शेकडो अनाथ मुलांचे लालन – पालन व संगोपन केले. त्यांनी संगोपन केलेली मुले आज विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. त्यांपैकी काहींनी (त्यात त्यांच्या स्वत: च्या मुलीचाही समावेश आहे) अनाथ मुलांच्या संगोपनाच्या कार्यास स्वतःस वाहून घेतले आहे.

सिंधुताईंना 24 डिसेंबर रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘अनाथांची माय’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये 4 जानेवारी 2022 ला रात्री 8.10 वाजता निधन झाले. त्या ७4 वर्षांच्या होत्या.

सिंधुताई सपकाळ अनाथ आश्रम

सिंधुताईंनी अनाथांच्या संगोपनाचे आपले कार्य गतिमान करण्यासाठी-

  1. सन्मती बालनिकेतन, हडपसर (पुणे)
  2. ममता बालसदन, कुंभारवळण (सासवड)
  3. माईचा आश्रम, चिखलदरा (अमरावती)
  4. गंगाधर बाबा छात्रालय, (गुहा, महाराष्ट्र)

या संस्थांची स्थापना केली आहे. अनाथांच्या या मायेला सन २०१० मध्ये अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे. माईंना आतापर्यंत २७५ च्या आसपास पुरस्कार मिळाले असून त्यांच्या जीवनावर ‘ मी सिंधुताई सपकाळ ‘ हा चित्रपटही काढला गेला आहे. लंडनमधील चोपन्नाव्या चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची निवडही झाली होती.

हे सुद्धा वाचा –

Related Posts