मेनू बंद

स्थलांतरित शेती म्हणजे काय?

स्थलांतरित शेती (Shifting agriculture) ही अत्यंत अप्रगत स्वरूपाची असते. ही शेती दुर्गम, डोंगराळ व वन प्रदेशांतील काही जमाती करतात. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा नागालँड, मिझोराम, मध्य प्रदेश, उडिसा, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांमधीलं काही भागांत स्थलांतरित शेती केली जाते. या आर्टिकल मध्ये आपण, स्थलांतरित शेती म्हणजे काय आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घेणार आहोत.

स्थलांतरित शेती म्हणजे काय

स्थलांतरित शेती (Shifting agriculture), ही एक शेती करण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये शेतकरी तात्पुरते एखाद्या भूखंडावर शेती करतो आणि जेव्हा जमीन नापीक बनते ती शेती करण्यायोग्य राहत नाही तेव्हा ते दुसर्‍या जागेवर जातात. या पद्धतीनुसार, झाडे तोडून आणि जाळून जंगलाचा काही भाग साफ केला जातो आणि त्या जमिनीत मिश्र पीक किंवा वेगवेगळी पिके घेऊन लागवड केली जाते. दोन-तीन वर्षांच्या लागवडीनंतर जमिनीचे उत्पादन कमी होते, म्हणून त्यानंतर ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेती करण्यात येते.

स्थलांतरित शेती ची वैशिष्ट्ये (Features of Shifting Agriculture)

1. जमीन नापीक झाल्यानंतर शेत जमिनीच्या शोधार्थ भटकणे हे या शेतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

2. जमिनीची निवड झाल्यानंतर ती साफ केली जाते. जमिनीवरच्या वनस्पती जाळल्या जातात. यामुळे जमिनीत पोटॅशचे प्रमाण वाढते व सेंद्रिय घटक द्रव्ये नाहीशी होतात.

3. तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, मिरची, तेलबिया इत्यादी पिके प्रामुख्याने घेतली जातात.

4. दर्जेदार बियाणे, पीक संरक्षण, आधुनिक अवजारे यांचा उपयोग केला जात नसल्याने उत्पादन कमी येते.

5. स्थलांतरित शेतीस वेगवेगळी स्थानिक नावे आहेत. उदाहरणार्थ, ईशान्य भारतातील राज्यांत झूम, केरळमध्ये कुमरी, मध्य प्रदेशात बेवर, उडिसामध्ये पोडू, डुंगर इत्यादी.

6. वृक्षतोड, मृदेची धूप, पूर, अल्प उत्पादन व अस्थायी जीवन अशा प्रकारच्या प्रमुख समस्या आहेत.

7. स्थलांतरित शेतीमुळे पर्यावरणाची अवनती होते, म्हणून या शेतीवर काही निर्बंध घातले जात आहेत.

हे सुद्धा वाचा-

Related Posts