आपण या आर्टिकल मध्ये भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील महान कलाकार व प्रतिभावंत दिग्दर्शक व्ही. शांताराम (१९०९ -१९९०) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला V. Shantaram यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट निर्माते, चित्रपट निर्माते आणि अभिनेते होते जे हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जातात. व्ही. शांताराम यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात कोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत नोकरी केली. 1921 मध्ये सुरेखा हरण या मूक चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केले.
अण्णासाहेब या नावाने ओळखल्या जाणार्या शांताराम यांची जवळपास सात दशके चित्रपट निर्माते म्हणून प्रसिद्ध कारकीर्द होती. सामाजिक बदलाचे साधन म्हणून चित्रपट माध्यमाची प्रभावीता लक्षात आणून देणारे ते सुरुवातीच्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते आणि एकीकडे मानवतावादाचा पुरस्कार करण्यासाठी आणि दुसरीकडे धर्मांधता आणि अन्याय उघड करण्यासाठी त्यांचा यशस्वीपणे वापर केला.
व्ही. शांताराम – संपूर्ण माहिती
व्ही. शांताराम यांचा जन्म १८ नोव्हेंबर, १९०१ ला झाला. त्यांचे नाव शांताराम राजाराम वनकुद्रे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ते एक महान कलाकार व प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. भारतीय चित्रपट बाल्यावस्थेत असतानाच माध्यमांच्या विविध अंगांचा सर्जनशीलतेने विकास साधण्याचे श्रेय व्ही. शांताराम यांना जाते. V. Shantaram यांनी भारतीय चित्रपटांस दिशा देण्याचे जे भरीव कार्य केले त्यामुळेच ‘ चित्रपती ‘ किंवा ‘ चित्रपटमहर्षी ‘ म्हणून त्यांचा गौरव केला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीची त्यांनी विविध नात्यांनी मोठीच सेवा केली आहे.
व्ही. शांताराम यांनी फत्तेलाल व दामले यांच्या सहकार्याने १९२९ मध्ये ‘ प्रभात ‘ कंपनीची स्थापना करून चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. प्रभात कंपनीने भारतीय चित्रपटसृष्टीत खऱ्या अर्थाने इतिहास घडविला. ही कंपनी नावारूपाला आणण्यात व्ही . शांताराम यांचा सिंहाचा वाटा आहे. या कंपनीच्या वैभवाच्या काळात प्रभात व व्ही. शांताराम हे समीकरणच होऊन बसले होते. ‘ अयोध्येचा राजा ‘ हा प्रभात कंपनीचा पहिला बोलपट. मराठी भाषेतीलही तो पहिलाच बोलपट होता.
त्यानंतरच्या काळात ‘ प्रभात’ ने सिंहगड, माणूस, संत तुकाराम, कुंकू, धर्मात्सा, शेजारी यांसारखे एकाहून एक सरस चित्रपट निर्माण केले. हे सर्वच चित्रपट कमालीचे लोकप्रिय झाले. भारतीय चित्रपटसृष्टी ज्या काळात पौराणिक, साहसप्रधान व प्रणयप्रधान चित्रपटांच्या निर्मितीतच अडकून पडली होती.
V. Shantaram यांचे मराठी व हिन्दी चित्रपट
पुढे व्ही. शांताराम यांनी प्रभात कंपनी सोडली आणि सन १९४२ मध्ये ‘ राजकमल ‘ या नावाने स्वतःची वेगळी चित्रपटसंस्था काढली. नंतरच्या काळातही त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट निर्माण करण्याची ‘ प्रभात ‘ ची परंपरा कायम राखली. त्यांच्या हिंदी चित्रपटांपैकी ‘ डॉ. कोटणीस की अमर कहानी ‘ आणि ‘ दो आँखे बारह हाथ ‘ या चित्रपटांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले होते.
‘ दो आँखे बारह हाथ ‘ या चित्रपटाला राष्ट्रपती पारितोषिकही मिळाले होते. याखेरीज ‘ नवरंग ‘ , ‘ बूंद जो बन गये मोती ‘ , ‘ गीत गाया पत्थरोंने ‘ यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी निर्माण केले होते. ‘ पिंजरा ‘ व ‘ चानी ‘ हे त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात निर्मिलेले चित्रपटही रसिकांच्या काळजाचा ठाव घेतात.
कलात्मक चित्रपटनिर्मिती हे व्ही. शांताराम यांचे खास वैशिष्ट्य समजले जाते. विषयांचे वेगळेपण हेदेखील त्यांच्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्ट्य होय. शेजारी (जातीय सलोख्याचा प्रश्न), डॉ . कोटणीस की अमर कहानी, ‘दो आँखे बारह हाथ’ हे त्यांचे चित्रपट या गोष्टीचा प्रत्यय आणून देतात. नव्या कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना प्रकाशात आणण्याबद्दलही व्ही . शांतारामांची ख्याती होती. त्यांनी आपल्या चित्रपटांद्वारे अनेक नवे कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीला मिळवून दिले.
व्ही. शांताराम यांनी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली होती. वरील सर्व क्षेत्रात त्यांनी लक्षणीय यश संपादन केले होते. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सेवेबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ किताब देऊन सन्मानित केले. त्यांच्या या सेवेबद्दल त्यांना 1985 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. ‘शांताराम’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. व्ही.शांताराम यांचे 28 ऑक्टोबर 1990 रोजी निधन झाले.
हे सुद्धा वाचा –