मेनू बंद

वचन म्हणजे काय | वचनाचे प्रकार | Vachan in Marathi Grammar

Vachan in Marathi Grammar: मराठी व्याकरणामध्ये “वचन विचार” हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात वचन म्हणजे काय आणि वचनाचे किती प्रकार आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया.

वचन म्हणजे काय | वचनाचे प्रकार | Vachan in Marathi Grammar

वचन म्हणजे काय

वचनविचार नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्या रूपांमध्ये बदल होण्यास कारणीभूत असणारा एक घटक आपण पाहिला. तो म्हणजे लिंग. ‘वचना’मुळेही त्यांच्या रूपात बदल होतो. आपण आता ‘वचन‘ या घटकाबद्दल विचार करणार आहोत. नामावरून जसे त्याचे लिंग समजते; तसे त्या नामाने निर्देशित केलेली वस्तू एक आहे की त्या वस्तू एकापेक्षा अधिक आहेत हेही कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे. त्याला वचन असे म्हणतात. ‘वचन‘ या शब्दाचा अर्थ बोलणे असा होतो.

वचनाचे किती प्रकार आहेत

आपण एका वस्तूबद्दल बोलू लागलो की ते एकवचन व अनेकांबद्दल बोलू लागलो की अनेक वचन. मराठीत वचने दोन मानतात:

एकवचन: नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एकवचन असते. जसे मुलगा, गाय, पाटी, पुस्तक, इमारत.

अनेकवचन: नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेकवचन असते. अनेकवचनाला ‘ बहुवचन ‘ असेही काही लोक म्हणतात.

संस्कृतात तीन वचने मानतात.

  • (१) एकवचन
  • (२) द्विवचन
  • (३) अनेकवचन

मराठीत द्विवचन नसल्यामुळे बहुवचनाऐवजी अनेकवचन हाच शब्द अधिक वापरला जातो. लिंगामुळे नामाच्या रूपात बदल होतो. तसाच वचनामुळेही नामाच्या रूपात बदल होतो.

हे सुद्धा वाचा –

Related Posts