आपण या आर्टिकल मध्ये स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी, उत्कृष्ट संघटक आणि शेतकऱ्यांचे नेते वसंतदादा पाटील यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Vasantdada Patil यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

वसंतदादा पाटील यांचे शिक्षण
वसंतराव बंडूजी “वसंतदादा” पाटील हे सांगली, महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी होते. ते पहिले आधुनिक मराठा जननेते आणि महाराष्ट्रीय राजकारणातील पहिले जननेते म्हणून ओळखले जात होते. वसंतदादांचे पूर्ण नाव वसंतराव बंडूजी पाटील होते. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 रोजी कोल्हापूर येथे झाला. सांगली जिल्ह्यातील पद्माळे हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने तो काळ फारसा अनुकूल नव्हता; त्यामुळे वसंतदादांचे शिक्षण सातवीपर्यंतच मराठी होऊ शकले.
Vasantdada Patil Information in Marathi
Vasantdada Patil यांना औपचारिक शिक्षणाचा फारसा लाभ मिळाला नसला तरी त्यावाचून त्यांचे विशेष काही अडले नाही; कारण त्यांचा मूळचा पिंडच खऱ्या कार्यकर्त्याचा होता. त्यांना प्रथमपासूनच सार्वजनिक कार्याची आवड होती. त्यातही विधायक कार्यक्रमांवर त्यांचा अधिक भर असे. राजकारणात उतरण्यापूर्वीही त्यांनी आपल्या पद्माळे या गावात अनेक लोकोपयोगी कामे केली होती. सामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता.
वसंतदादांनी ऐन तारुण्यातच स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात सांगली परिसरात काँग्रेसचा प्रचार करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले होते. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. सन १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षाही झाली होती.
वसंतदादा पाटील यांनी १९४२ मध्ये सातारा जिल्ह्यात सुरू झालेल्या भूमिगत आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. क्रांतिसिंह नाना पाटील आणि स्वामी रामानंद भारती यांच्यासोबत ग्रामीण भागात भूमिगत चळवळींचे जाळे निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी या आंदोलनाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला होता.
जो कोणी त्याला पकडेल त्याला ब्रिटीश सरकारने 10,000 रुपयांचे बक्षीस देऊ केले होते. मात्र, काही दिवसांतच त्याला पकडून सांगली कारागृहात ठेवण्यात आले; पण वसंतदादा पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दिवसभर कारागृह फोडून मोठ्या हिमतीने तुरुंगातून पलायन केले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पळून गेलेल्या कैद्यांचा पाठलाग सुरू केला.
या गोळीबारात वसंतदादांचे दोन सहकारी ठार झाले. दादांना पण पोलिसांनी गोळ्या लागून ते जखमी झाले; त्यामुळे ते पोलिसांच्या हाती परतले. या कृत्यासाठी त्याला तेरा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. मात्र, 1946 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वसंतदादांनी आपले लक्ष विधायक कार्याकडे वळविले. सामान्य शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा व्हावी आणि आर्थिक विकासाची फळे त्यांच्या पदरात पडावीत, अशी तळमळ त्यांना लागून राहिली होती. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधणे शक्य होईल, असे त्यांचे मत बनले; त्यामुळे त्यांनी सहकारी चळवळीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांमध्ये सहकाराची जाणीव निर्माण करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न चालविले.
सन १९५८ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांना संघटित करून सांगली येथे ‘ शेतकरी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. देशातील सर्वाधिक गाळपक्षमता असलेला हा साखर कारखाना होय. पुढील काळात वसंतदादांनी सहकारी संस्थांचे विशाल जाळेच निर्माण केले. त्यामध्ये सूत गिरण्या, तेल गिरण्या, पतसंस्था, बँका, गृहनिर्माण संस्था इत्यादी सहकारी संस्थांचा अंतर्भाव होतो.
वसंतदादा पाटील माहिती मराठी
वसंतदादा पाटील यांची स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय क्षेत्रातील कामगिरीही अशीच उल्लेखनीय आहे. संघटनकौशल्याबद्दल त्यांची विशेष ख्याती होती. काँग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांशीही त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. वसंतदादांनी आपल्या संघटनकौशल्याचा उपयोग महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत बनविण्यासाठी केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस व अध्यक्ष म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले होते. आपल्या अधिकारपदाच्या कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या सर्व विभागांत भक्कम मिळवून दिला. महाराष्ट्राला काँग्रेसचा बालेकिल्ला बनविण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. महाराष्ट्र राज्याच्या कायदेमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांवर त्यांची अनेक वेळा निवड झाली होती. सन १९८० मध्ये ते लोकसभेतही निवडून गेले होते. १९७२ मध्ये वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात वसंतदादा पाटबंधारे मंत्री म्हणून सहभागी झाले; पण पुढे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
त्यांनी काही काळ राजकारणापासून दूर राहून विधायक काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ते पक्षाच्या हितासाठी राजकारणाकडे वळले आणि त्याच वर्षी त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली; पण 1978 मध्ये त्यांचे मंत्रिमंडळ अल्पमतात आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. तथापि, 1982 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. त्यांनी काही काळ राजस्थानचे राज्यपाल आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणूनही काम केले होते.
वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, साखर निर्यात मंडळ, राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय गिरणी कामगार संघ, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि इतर अनेक संस्थांचे अध्यक्ष होते. त्यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ किताबाने सन्मानित केले होते. वसंतदादा पाटील यांचे 1 मार्च 1989 रोजी निधन झाले.
हे सुद्धा वाचा –