मेनू बंद

वि. स. खांडेकर – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक वि. स. खांडेकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला VS Khandekar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

वि. स. खांडेकर - VS Khandekar Information in Marathi

विष्णू सखाराम खांडेकर हे महाराष्ट्रातील एक मराठी लेखक होते. प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे ते पहिले मराठी लेखक होते. विष्णू सखाराम खांडेकर हे महाराष्ट्रातील एक मराठी लेखक होते. खांडेकरांची लेखन कारकीर्द 1919 ची पहिली रचना श्रीमत् कालीपुराणम् प्रकाशित झाल्या पासून तर 1974 ची ययाती कादंबरी च्या प्रकाशापर्यन्त चालली.

वि. स. खांडेकर

थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर होते. त्याने कादंबरी; कविता, लघुकथा, लघुनिबंध, चित्रपट कथा, नाटके असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळले आहेत. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी सांगली येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे झाले. 1913 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

इंटर झाल्यानंतर खेड्यात जाऊन नि वृत्तीने शिक्षणकार्य करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ते कोकणातील शिरोडे या गावी गेले आणि तेथील इंग्रजी शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. पुढे ते त्याच शाळेचे मुख्याध्यापक बनले. शिरोड्याला असतानाच त्यांनी आपल्या लेखनकार्याला सुरुवात केली. शिरोड्याच्या शाळेत सतरा – अठरा वर्षे नोकरी केल्यानंतर १९३८ मध्ये खांडेकर चित्रपट व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूरला वास्तव्यासाठी आले. पुढे कोल्हापुरातच ते कायमचे स्थायिक झाले.

VS Khandekar Information in Marathi

VS Khandekar यांनी आपल्या साहित्यसेवेचा प्रारंभ कथालेखनापासून केला. त्यांनी अनेक लघुकथा व रूपककथा लिहिल्या आहेत . त्यांच्या लघुकथा अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या असून त्यांना मोठेच वाड्मयीन मूल्य लाभले आहे; पण खांडेकरांना अमाप लोकप्रियता मिळाली ती कादंबरीकार म्हणूनच. १९३० मध्ये ‘ हृदयाची हाक ‘ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यापाठोपाठ एकापेक्षा एक सरस अशा सुमारे पंधरा कादंबऱ्या त्यांनी मराठी रसिकांना सादर केल्या. वाचकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला.

खांडेकरांच्या अनेक कादंबऱ्यांची निरनिराळ्या भारतीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. स्वैर कल्पनाविलास, उपमा – उत्प्रेक्षा इत्यादी अलंकारांचे प्राचुर्य, कोटीबाज भाषा, माधुर्य, मानवतावादी भूमिका ही त्यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. अलंकारिक लेखनाबद्दल त्यांची विशेष ख्याती आहे. त्यांची अलंकारिक भाषा लक्षात घेता त्यांच्या कादंबऱ्यांतील निरनिराळ्या पात्रांच्या मुखांमधून स्वतः खांडेकरच बोलतात असे वाटते. खांडेकरांनी लिहिलेले लघुनिबंधही बरेच लोकप्रिय झाले आहेत.

मराठी लघुनिबंधांचा जनक कोण, असा एक वाद साहित्याच्या क्षेत्रात असून त्या संदर्भात ना. सी. फडके यांच्या जोडीने वि. स. खांडेकर यांचेही नाव घेतले जाते. यावरून त्या बाबतीतील त्यांचा अधिकार स्पष्ट होतो. खांडेकरांनी छाया, ज्वाला, देवता, अमृत, माझं बाळ इत्याद अकरा चित्रपटांच्या कथा लिहिल्या असून त्यांपैकी बहुतेक चित्रपट त्या काळी खूपच गाजले होते. याशिवाय समीक्षक म्हणूनही त्यांची ख्याती होती. अशा रीतीने वि. स . खांडेकर यांनी विविध अंगांनी मातृभाषेची सेवा केली आहे आणि त्यायोगे त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

खांडेकर हे जीवनवादी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. ‘ जीवनासाठी कला ‘ हा साहित्यातील पक्ष त्यांनी उचलून धरला होता. त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांतून सर्वसामान्यांच्या सुखदुःखांना त्यांनी वाचा फोडली आहे. त्यातून त्यांच्या ध्येयवादी वृत्तीचे दर्शन आपणास घडते. मानवी जीवनाविषयी अपार प्रेम आणि मानवतावादी दृष्टिकोन या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातही उमटले आहे.

वि. स. खांडेकर यांना अनेक मानसन्मान लाभले होते. ते साहित्य अकादमीचे फेलो होते. इ. स. १९४१ मध्ये सोलापूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांच्या ‘ ययाती ‘ या कादंबरीला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता.

भारत सरकारने १९६८ मध्ये ‘ पद्मभूषण ‘ सन्मान देऊन त्यांचा गौरव केला होता . भारतीय ज्ञानपीठातर्फे त्यांना त्यांच्या ‘ ययाती ‘ या साहित्यकृतीबद्दल १९७४ च्या ज्ञानपीठ पारितोषिकाने अलंकृत करण्यात आले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी . लिट . ही सन्मानदर्शक पदवी प्रदान केली होती. वि. स. खांडेकर यांचे २ सप्टेंबर, १९७६ रोजी मिरज (सांगली) येथे निधन झाले.

वि स खांडेकर कादंबरी

  1. हृदयाची हाक
  2. कांचनमृग
  3. हिरवा चाफा
  4. दोन मने
  5. क्रौंचवध
  6. अश्रू, रिकामा देव्हारा
  7. उल्का
  8. सुखाचा शोध
  9. पहिले प्रेम
  10. दोन ध्रुव
  11. पांढरे ढग
  12. ययाती
  13. अमृतवेल

वि स खांडेकर कथासंग्रह

  1. कालची स्वप्ने
  2. नवा प्रातःकाल
  3. ऊनपाऊस
  4. दत्तक आणि इतर गोष्टी
  5. प्रसाद, जीवनकला
  6. स्त्री – पुरुष, पाषाणपूजा
  7. चांदण्यात
  8. वायुलहरी
  9. सायंकाळ
  10. मझधार
  11. झिमझिम
  12. कल्पलता

हे सुद्धा वाचा –

Related Posts