मेनू बंद

व्यंकटेश माडगूळकर – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Vyankatesh Madgulkar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

व्यंकटेश माडगूळकर

व्यंकटेश माडगूळकर कोण होते

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय मराठी लेखक होते. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरच्या १५ ते २० वर्षांच्या कालावधीत ‘माणदेश’ नावाच्या दक्षिण महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाविषयीच्या वास्तववादी लेखनासाठी ते प्रसिद्ध झाले. त्यांचे चाहते, मित्र आणि कुटुंबीय त्यांना अनेकदा ‘तात्या’ म्हणत.

व्यंकटेश माडगूळकर हे मराठीतील एक प्रथितयश कथालेखक व कादंबरीकार होते. ग्रामीण लेखक म्हणून त्यांची विशेष प्रसिद्धी आहे. नाटक, लोकनाट्य, चित्रपट – कथा, ललित लेखन अशा प्रकारचे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे. व्यंकटेश माडगूळकर यांचे संपूर्ण नाव व्यंकटेश दिगंबर माडगूळकर असे आहे. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ या गावी ३ जुलै, १९२७ रोजी झाला. त्यांचे शिक्षण मांडगूळ, आटपाडी, कुंडल अशा वेगवेगळ्या गावी झाले. घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना फार शिक्षण घेता आले नाही.

Vyankatesh Madgulkar Information in Marathi

आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडून त्यांनी काही काळ शिक्षकी पेशा पत्करला . पुढे आकाशवाणीवर ‘ कार्यक्रम संयोजक म्हणून त्यांनी काम केले. काही दिवस पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी उमेदवारी केली होती. Vyankatesh Madgulkar यांचे ‘ माणदेशी माणसं ‘ हे पहिले पुस्तक १९४९ मध्ये प्रसिद्ध झाले. या पहिल्याच पुस्तकाने ते एकदम प्रकाशझोतात आले. माणदेशातील ग्रामीण माणसांचे अस्सल व जिवंत चित्रण त्यांनी या पुस्तकात केले होते. माडगूळकरांच्या या पहिल्या कलाकृतीने त्यांच्याविषयीच्या वाचकांच्या अपेक्षा उंचावल्या आणि माडगूळकरांनीही आपल्या त्यानंतरच्या लेखनाने त्यांच्या अपेक्षा पुन्या केल्या.

ग्रामीण कथालेखक म्हणून Vyankatesh Madgulkar यांनी मोठेच यश संपादन केले आहे. त्यांच्या कथांमधून ग्रामीण जीवनाचे खरेखुरे चित्र ते वाचकांपुढे उभे करतात . त्यांची भाषाशैली साधीच पण अतिशय परिणामकारक आहे. ग्रामीण माणसांचे भावविश्व साकार करण्याची हातोटी त्यांना साधली आहे; त्यामुळे त्यांच्या कथा वाचकांच्या मनाची चटकन पकड घेतात.

माडगूळकरांच्या कादंबऱ्याही अशाच लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे विषय व मांडणी यांत खूपच वेगळेपण जाणवते. ‘ बनगरवाडी ‘ या कादंबरीत त्यांनी दुष्काळी भागातील एका खेड्याचे चित्रण केले असून जीवनसंघर्षात तेथील जनजीवनाच्या होत असलेल्या वाताहतीची कहाणी निवेदन केली आहे.

‘ सत्तांतर ‘ ही त्यांची कादंबरीही अशीच अगदी वेगळ्या विषयावर- जंगलातील वानरटोळ्यांमध्ये होणारा सत्तासंघर्ष- लिहिली गेली आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी अनेक नाटके व लोकनाट्ये लिहिली आहेत. ललित लेखक म्हणूनही त्यांनी मान्यता मिळविली आहे. याशिवाय मराठीतील अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा यांचे लेखन त्यांनी केले आहे.

पुरस्कार व सन्मान

माडगूळकरांच्या बनगरवाडी, काळी आई अशा काही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या ‘ सत्तांतर ‘ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या अनेक पुस्तकांचे निरनिराळ्या भारतीय वं परकीय भाषांत अनुवाद झाले. आपल्या सर्व व्यापातून जंगलात, रानावनात भटकण्याचा , पक्षि – जीवन व वन्य प्राणि – जीवन यांचे निरीक्षण करण्याचा आणि वन्य जीवनाचा आनंद उपभोगण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे. सन १९८३ मध्ये आंबेजोगाई येथे भरलेल्या सत्तावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. व्यंकटेश माडगूळकर यांचा मृत्यू २७ ऑगस्ट, २००१ ला झाला.

व्यंकटेश माडगूळकर यांचे पुस्तक, ग्रंथ व साहित्य

कथासंग्रह

  • माणदेशी माणसं
  • गावाकडच्या गोष्टी
  • काळी आई
  • सीताराम एकनाथ
  • हस्ताचा पाऊस
  • जांभळाचे दिवस

कादंबरी

  • बनगरवाडी
  • वावटळ
  • करुणाष्टक
  • पुढचं पाऊल
  • कोवळे दिवस
  • सत्तांतर
  • उंबरठा

नाटक

  • तू वेडा कुंभार
  • सती
  • पती गेले काठेवाडी
  • बिकटवाट वहिवाट
  • बिन बियांचे झाड

ललित लेखसंग्रह

  • नागझिरा
  • रानमेवा
  • पांढऱ्यावर काळे
  • चित्र आणि चरित्रे

हे सुद्धा वाचा –

Related Posts