हवामानशास्त्रात, Cyclones किंवा आवर्त किंवा चक्रीवादळ हे एक बंद वर्तुळ आहे ज्याचा द्रव पृथ्वीच्या त्याच दिशेने फिरतो. यामध्ये, हवा साधारणपणे सर्पिल आकारात, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने फिरते. या आर्टिकल आपण, आवर्त म्हणजे काय आणि आवर्ताचे प्रकार काय आहेत, जाणून घेणार आहोत.

आवर्त म्हणजे काय
“काही स्थानिक कारणांमुळे एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागी / केंद्रभागी कमी दाबाचे केंद्र निर्माण होते आणि त्याच्या सभोवती हवेचा जास्त दाब होत जातो. यामुळे वारे चक्राकार गतीने कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने आकर्षिले जातात, त्यास आवर्त (Cyclones) असे म्हणतात.”
आवर्ताचे प्रकार (Types of Cyclone)
आवर्ताचे त्याच्या निर्मितीस्थानानुसार दोन प्रकार पडतात-
(I) उष्ण कटिबंधीय आवर्त (Tropical Cyclone)
(II) समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त (Temperate Cyclones)
(I) उष्ण कटिबंधीय आवर्त (Tropical Cyclone)
विषुववृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे 30° अक्षवृत्ताच्या प्रदेशात उष्ण कटिबंधीय आवर्ती आढळतात. आवर्तास विभिन्न नावांनी ओळखले जाते. त्यास पश्चिम पॅसिफिकमध्ये ‘टायफून’ (Typhoon), अटलांटिकमध्ये ‘हरिकेन’ (Hurricane), पूर्व पॅसिफिकमध्ये ‘बिग विंड’ (Big Wind) व ‘टिआफांग (Tiaphong), फिलिपाईन्समध्ये ‘बागुइजो’ (Baguio) आणि ऑस्ट्रेलियात ‘बिली-विलिस’ (Wily-willes) असेही म्हटले जाते. भारतात आवर्त मुख्यत्वेकरून ‘चक्रीय वादळ’ या नावाने प्रसिद्ध आहे.
उष्ण कटिबंधीय आवर्ताचे प्रदेश (Tropical Cyclone Regions)
1. उत्तर अटलांटिक महासागर क्षेत्र अटलांटिक महासागरात 30° उत्तर अक्षवृत्तापर्यंत आवर्त असतात. त्याचे पुढीलप्रमाणे उपविभाग आहेत :
- मेक्सिकोचे आखात
- वेस्ट इंडीज बेट समूह
- कॅरिबियन समुद्र
2. उत्तर पॅसिफिक महासागर क्षेत्र मेक्सिको व मध्य अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर हरिकेन्स वादळे
3. चीन समुद्र क्षेत्र फिलिपाईन्स, व्हिएतनाम, दक्षिण चीन व दक्षिण जपानच्या आसपासचा सागरी प्रदेश.
4. दक्षिण पॅसिफिक महासागर क्षेत्र : ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य व वायव्य महासागरी प्रदेश, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीपासून सोसायटी बेट निश्चिअन आणि हवाई बेटे.
5. दक्षिण हिंदी महासागर क्षेत्र : आफ्रिका खंडाच्या पूर्वस हिंदी महासागरात असलेल्या मालागसे (मादागास्कर), रियुनियन व मॉरिशस बेटे
6. बंगालचा उपसागर क्षेत्र बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रापेक्षा बरीच जास्त चक्रीवादळे निर्माण होतात, जुलै, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत जास्त वादळे निर्माण होतात.
7. अरबी समुद्र क्षेत्र अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या वादळांची संख्या मर्यादित आहे.
(II) समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त (Temperate Cyclones)
समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात सुमारे 30° ते 50° अक्षवृत्तादरम्यान आवर्ताची निर्मिती होते. या प्रदेशातील प्रतिव्यापारी बान्यांच्या किंवा पश्चिमी वाऱ्याच्या टापूत आवर्ताचे मुख्य क्षेत्र आहे. आवर्तास ‘मध्य कटिबंधीय आवर्त (Mid-Latitude Cyclones), उष्ण कटिबंधीय अतिरिक्त आवर्त (Extra Tropical Cyclone) तसेच वायुगत (Depressions) या नावानेही ओळखले जाते.
समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताचे प्रदेश (Regions of Temperate Tropical Cyclone)
आवर्ताचे प्रदेश पुढीलप्रमाणे आहेत-
(1) दक्षिण गोलार्धातील आवर्ताचे प्रदेश
अंटार्क्टिका क्षेत्रात 50° दक्षिण ते 60° दक्षिण अक्षवृत्त दरम्यान आवर्ताची निर्मिती होते. अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका व नैर्ऋत्य ऑस्ट्रेलियामधून आवर्त प्रवास करतात.
(2) उत्तर गोलार्धातील आवतांचे प्रदेश
(अ) उत्तर पॅसिफिक महासागर हिवाळ्यात उत्तर पॅसिफिक महासागरात अल्यूशियन बेट समूहालगत आवर्ताची निर्मिती होते. नंतर ते पूर्वेकडे जातात व उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत ओलांडतात. 60° उत्तर अक्षवृत्तालगत कडा व संयुक्त संस्थानाच्या सरहद भागातून प्रवास करतात.
(ब) उत्तर अटलांटिक महासागर इंग्लंड, नाव, स्वाहन या देशांमध्ये पाऊस पडतो.
(क) भूमध्य समुद्र दक्षिण युरोप, तुर्कस्तान, इराक, पाकिस्तान या देशांमध्ये पर्जन्य पढ़ते. याचा फायदा उत्तर भारतात गंगेच्या मैदानासही होतो. पंजाबच्या गव्हास हा पाऊस लाभदायक असतो.
(ड ) चीन समुद्र : चीनचा मध्य भाग, उत्तर भाग तसेच जपानवर आवतांचे आगमन होते.
हे सुद्धा वाचा-