मेनू बंद

भरती ओहोटी म्हणजे काय? कारणे, प्रकार व परिणाम

भरती ओहोटी (Tides), पृथ्वीच्या बहुतेक भागांत दिवसाकाठी दोन वेळा येते. ही गोष्ट समुद्रकिनारी राहणारे लोक नेहमी पाहतात. सरासरी 12 तास 25 मिनिटांनी एका भरतीनंतर दुसरी भरती येते. ओहोटीच्या बाबतीतही असेच घडते. चोवीस तासांनी पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण झाली तरी त्या ठिकाणी पुन्हा त्याच वेळेला भरती येत नाही; तर 48 ते 52 मिनिटे उशिरा भरती येते. पौर्णिमा आणि अमावस्येच्या रात्री समुद्राला सर्वाधिक भरती असते. या आर्टिकल मध्ये आपण, भरती ओहोटी म्हणजे काय आणि भरती-ओहोटी निर्मितीची कारणे, प्रकार व परिणाम जाणून घेणार आहोत.

भरती ओहोटी म्हणजे काय? कारणे, प्रकार व परिणाम

भरती ओहोटी म्हणजे काय

“भरती-ओहोटी म्हणजे चंद्र व सूर्य यांच्या आकर्षणामुळे समुद्राच्या पाण्याची खालून वर व वरून खाली होणारी हालचाल होय.” तसेच, चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणांमांमुळे पृथ्वीवरील महासागरासाऱख्या मोठ्या जलसंचयांतील पाण्याच्या पातळीत आवर्ती चढउतार होतात, यांस भरती-ओहोटी असे म्हणतात. 

भरतीच्या किंवा पाणी वाढण्याच्या अंतिम मर्यादिस समा असे म्हणतात. समा ही अवस्था सुमारे बारा ते तेरा मिनिटे टिकते. तर, ओहोटीच्या किंवा पाणी जोसरण्याच्या अंतिम मर्यादिस ‘निखार’ असे म्हणतात.

समाला पोहोचल्यानंतर निखारापर्यंत पाण्याची पातळी हळूहळू कमी होत जाते. समुद्राच्या उंच पातळीपासून खालच्या पातळीपर्यंतच्या हालचालीला ‘ओहोटी’ म्हणतात. निखाराच्या वेळेपासून समुद्राचे पाणी हळूहळू वाढू लागते, समुद्राच्या पाण्याच्या खालच्या पातळीपासून उच्च पातळीपर्यंतच्या हालचालीला ‘ओहोटी’ म्हणतात. अमावस्येला रात्री आणि दुपारी 12 वाजता भरतीची उच्च पातळी असते. भरतीची वेळ आणि प्रमाण ऋतूनुसार कमी-जास्त असते.

भरती-ओहोटी निर्मितीची कारणे (Causes of Tide Formation)

1. पृथ्वी व चंद्राचे आकर्षण (Attraction of the Earth and the Moon)

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावर होतो. पृथ्वी ही चंद्राच्या जवळ आहे. चंद्राच्या समोर असणाऱ्या पृथ्वीच्या बाजूवर चंद्राचे आकर्षण विरुद्ध बाजूच्या मानाने जास्त असते. घनकवच असणाऱ्या भूकवचापेक्षा चंद्राच्या समोर असणाऱ्या सागराचे पाणी आकर्षिले जाते आणि सागराला भरती येते.

2. पृथ्वी व सूर्याचे आकर्षण (Attraction of Earth and Sun)

पृथ्वी व सूर्यामधील अंतर जास्त असल्याने सूर्याची आकर्षण शक्ती कमी आहे. चंद्र व सूर्य यांची भरती निर्माण करण्याची शक्ती 11:5 अशा गुणोत्तराची आहे.

3. चंद्राची आकर्षण शक्ती सापेक्ष स्थिती (Moon’s gravitational force relative position)

अंतराचा विचार करता, चंद्राच्या समोर पृथ्वीची जी बाजू असते त्या ठिकाणी भरतीची शक्ती सर्वांत जास्त असते. एका वेळी दोन ठिकाणी भरती व दोन ठिकाणी ओहोटी असते. जेव्हा एखादे ठिकाण चंद्राच्या समोर येते तेथा सन्मुख भरती निर्माण होते; परंतु बारा तासाने त्या ठिकणी परोक्ष भरती निर्माण होते.

भरती ओहोटी चे प्रकार (Types of Tides)

1) उधनाची भरती-ओहोटी

अमावस्या व पौर्णिमेस सूर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत असतात. वामावस्येला चंद्र पुतीत असतो व पौर्णिमला तो प्रतियुतीत असतो. अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त आकर्षणामुळे त्याच ठिकाणी नेहमीच्या भरतीपेक्षा मोठी भरती जोोटी येते; याला उद्यानाची भरती-ओहोटी असे म्हणतात.

(2) भांगाची भरती-ओहोटी

शुद्ध व वद्य अष्टमी या दोन दिवशी चंद्र व सूर्य यांच्यामध्ये 90° चा कोन असतो; त्यामुळे चंद्र सूर्य यांचे आकर्षण एक दुसन्यास पूरक न होता परस्परविरोधी असते. त्यामुळे भरती-ओहोटीचे प्रमाण इतर दिवसांपेक्षा कमी असते. अशा लहान भरती-ओहोटीस ‘भांगाची भरती-ओहोटी’ असे म्हणतात.

भरती ओहोटी चे परिणाम (Effects of Tides)

भरती ओहोटी चे फायदे (Benefits of Tides)

(1) नद्यांच्या मुखाशी व बंदरात भरतीच्या वेळी पाण्याची उंची वाढते; त्यामुळे मोठी जहाजे बंदरात जाऊ शकतात व व्यापारास मदत होते.
(2) जलविद्युत निर्माण करता येते.
(3) बंदरे ने भरून येत नाहीत.
(4) मासेमारीच्या धंद्याला प्रोत्साहन मिळते.
(5) भरतीमुळे नद्यांच्या पापात खारे पाणी येते; त्यामुळे पंड प्रदेशातील नद्या लवकर गोठत नाहीत.
(6) भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार करता येते.

भरती ओहोटीचे तोटे ( Side Effects of Tides)

(1) काही वेळेस जहाजे व बोटींना पोहोचत)भरतीमुळे नदीमुळ गाळ साठून सागराची खोली कमी होते; त्यामुळे हा वाहतुकीस निर्माण होतो.
(3) भरती-ओहोटीचे प्रमाण जास्त असल्यास नवीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश अस्तित्वात येऊ शकत नाही.
(4) मोठ्या प्रमाणावर भरती-ओहोटी आली तर किनारा जलमय होऊन मोठ्या प्रमाणात प्राणहानी व संभवते.

हे सुद्धा वाचा-

Related Posts