मेनू बंद

ज्वालामुखी म्हणजे काय? ज्वालामुखीचे प्रकार

What is a Volcano and Types of Volcanoes: पॅसिफिक महासागराचा किनाऱ्यालगतचा पट्टा जगामधील 80% ज्वालामुखी (Jwalamukhi) या क्षेत्रामध्ये आहेत. आशिया खंदाच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशातील क्युराइल बेटे, जपान, फिलिपिन्स, इंडोनेशिया तसेच न्यूझीलंड आणि उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या प्रदेशाचा समावेश होतो. जगामधील सर्वात उंच ज्वालामुखी कोटोपैक्सी (Cotopaxi) असून तो दक्षिण अमेरिकेत पर्वतात आहे. या आर्टिकल मध्ये आपण, ज्वालामुखी म्हणजे काय आणि ज्वालामुखीचे प्रकार काय आहेत, जाणून घेणार आहोत.

ज्वालामुखी म्हणजे काय? ज्वालामुखीचे प्रकार

ज्वालामुखी म्हणजे काय

ज्वालामुखी (Volcano) सामान्यतः एक गोल किंवा जवळजवळ गोलाकार छिद्र असून त्यातून पृथ्वीच्या अत्यंत तप्त, भूगर्भामधून तप्त वायू, पाणी, द्रव लाव्हारस आणि खडकांचे तुकडे बाहेर पडतात. खरं तर, ही पृथ्वीच्या वरच्या थरातील एक फाट आहे ज्याद्वारे आतले पदार्थ बाहेर पडतात. ज्वालामुखीद्वारे सोडलेल्या या पदार्थांच्या संचयामुळे तयार झालेल्या शंकूच्या आकाराच्या स्थलाकृतिला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.

ज्वालामुखी शंकू (Volcanic Cone)– “पृथ्वीच्या भूगर्भातील लाव्हारस व इतर पदार्थ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूपृष्ठावर आल्यावर ज्वालामुखीच्या नलिकेभोवती त्या पदार्थाचे निक्षेपण होऊन त्यास शंक्वाकृती आकार प्राप्त होतो, याला ‘ज्वालामुखी शंकू असे म्हणतात.”

ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ (Eruptions from volcanic eruptions)

1. बाष्प (Vapors): ज्वालामुखीच्या उद्रेकात सर्वांत प्रथम वायुरूप पदार्थ बाहेर पडतात. यामध्ये बाष्पाचे प्रमाण 60 ते 90% असते. बाष्पामुळे ज्वालामुखीच्या भोवती मेघ निर्माण होतात. उद्रेकानंतर भरपूर पर्जन्यवृष्टी होते.

2. वायू (Gases)– ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाष्पाव्यतिरिक्त CO2, SO2, HS, HCI इत्यादी वायू बाहेर पडतात. याशिवाय अल्प प्रमाणात अमोनिया, नत्र वायू, मिथेन वगैरे वायूही बाहेर पडतात.

3. लाव्हारस (Lavas)– “ज्वालामुखीच्या उन्नेकातून वायूबरोबर बाहेर पडणाऱ्या द्रव्य पदार्थास ‘लाव्हारस’ असे म्हणतात.”

लाव्हारसाचे प्रकार पुढीलप्रमाणे-

1. अॅसिड लाव्हा (Acid lava)– “ज्या लाव्हारसात सिलिकांचे प्रमाण 70% किंवा त्यापेक्षाही जास्त असते, त्यास ‘अॅसिड लाव्हा’ असे म्हणतात.” हा लाव्हारस अतिशय घट्ट, रंगाने पिवळसर आणि वजनाने हलका असतो, याचा उत्कलनबिंदू उच्च असतो.

2. बेसिक लाव्हा (Basic lava)– “ज्या लाव्हारसात सिलिकांचे प्रमाण 30 ते 40% असते, त्यास ‘बेसिक लाव्हा’ असे म्हणतात.” बेसिक लाव्हा काळसर असून तो जास्त प्रवाही असतो. बेसिक लाव्हामधून बाहेर पडणारे ज्वालामुखी शांत उद्रेकाचे असतात.

3. अग्निदलिक आणि खंडमय पदार्थ (Igneous material)– “ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर वायुरूप आणि द्रवरूप पदार्थानंतर राख, धूळ, खडक, खडकांचे तुकडे बाहेर पडतात. त्यांना पायरोक्लास्ट असे म्हणतात.” लाव्हारसाचा वेग एवढ्या मोठ्या प्रमाणात असतो की, तो लाव्हारस आकाशात बराच उंच जातो. त्याचे रूपांतर लहान-लहान खडक तुकड्यात होते व असे पदार्थ कित्येक मीटर उंचीपर्यंत अंतराळात उडतात.

ज्वालामुखीचे प्रकार (Types of Volcanoes)

ज्वालामुखीचे वर्गीकरण पुढील मुद्द्यांच्या आधारे केले जाते.

1. उद्रेकाचे स्वरूप (The Mode of Eruption)
(2) उद्रेकाचा कालखंड व त्यांच्या क्रियेचे स्वरूप. (Period of eruption and nature of their action)

1. उद्रेकाच्या स्वरूपानुसार (The Mode of Eruption)

उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे पुढील प्रकार पडतात.

(1) मध्यवर्ती केंद्रीय प्रकार (Central Type)

“जेव्हा ज्वालामुखी मध्यवर्ती नलिका किंवा एक नलिकाद्वारा लाव्हारस बाहेर पडतो, याला ‘मध्यवर्ती प्रकार असे म्हणतात.” अशा प्रकारचे ज्वालामुखी प्रक्षोभक आणि विध्वंसक असतात. उदा., इटलीमधील व्हेसुव्हिएस, जपानमधील फुजियामा

(i) ज्वालामुखी स्तंभ (Volcanic column)

ज्वालामुखीच्या अंतिम अवस्थेमध्ये या नलिकेत लाव्हारसाचे निक्षेपण होते आणि ती थंड होउन लाव्हा स्तंभाची निर्मिती होते, याला ‘ज्वालामुखी स्तंभ’ असे म्हणतात.”

(ii) क्रेटर/कुंद (Crater)

“ज्वालामुखी शंकूच्या शिरोभागात तयार होणाऱ्या गर्त किंवा विस्तृत खोलगट भागाला ‘क्रेटर’ असे महणतात. उदा., अलास्कामधील मृत ज्वालामुखी अनीअॅकचक या क्रेटरचा व्यास सुमारे 11 कि.मी. आहे.

(iii) परयाकार फ्रेटर/नीडाम कुंड (Paryakar Crater)

ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाल्यास क्रेटरमध्येच लहान-लहान शंकू तयार होतात. या भूरूपाला परयाकार क्रेटर’ असे म्हणतात. उदा., सुलिएस ज्वालामुखी, फिलिपिन्समधील माऊलाल

(iv) कॅलडेरा / महाकुंड (Caldera)

भूगर्भातील शिलारसाचा कोठीमधून जेव्हा भयंकर विस्फोट होतो तेव्हा ज्वालामुखीच्या शिरोभागाचा बराचसा भूभाग अंतराळात फेकला जातो आणि तेथे विस्तीर्ण काहिलीसारखा खोल खड्डा निर्माण होतो, याला ‘कैलडेरा’ ने म्हणतात. उदा., इंडोनेशियामधील क्राकाटोआ, वेस्ट इंडिजमधील पिली पर्वत, अलास्कामधील कॅटमई पर्वत.

(2) भेगी उद्रेकाचे ज्वालामुखी (Fissure Type of volcanoes)

अशा प्रकारचे उद्रेक प्रस्तरभंग, भ्रंश आणि मैगीमध्ये (Fractures, Faults and Fissured) आढळतात. याचे स्वरूप पुढीलप्रमाणे-

(i) लाव्हा शंकू (Lava cone)

ज्वालामुखीच्या नलिकेभोवती लाव्हारसाचे निक्षेपण होते व त्यास शंक्वाकृती आकार प्राप्त होतो, म्हणून त्याला ‘लाव्हा शंकू’ असे म्हणतात.” त्याचे दोन उपप्रकार पाडले जातात. अॅसिड लाव्हा शंकू अॅसिड लाव्हारस घट्ट असल्याने त्यापासून निर्माण होणारा अॅसिड लाव्हा शंकू जास्त उंचीचा व कमी विस्ताराचा असतो. या शंकूचा उतार तीव्र स्वरूपाचा असतो.

बेसिक लाव्हा शंकू लाव्हा पातळ असल्याने यापासून तयार होणाऱ्या बेसिक लाव्हा शंकूची उंची कमी असते आणि त्याचा विस्तार जास्त असतो. या शंकूचा उतार मंद स्वरूपाचा असतो.

(ii) राख किंवा सिंडर शंकू (Cinder cones)

“ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ज्यालामुखीय राख मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. ज्वालामुखीय राखेमध्ये धूळ, राख, खडकांचे लहान-मोठे तुकडे वगैरे पदार्थांचा समावेश होतो. हे पदार्थ ज्वालामुखीभोवती साचतात. यापासून तयार होणाऱ्या शंक्वाकृती मूरूपास राख व सिंडर शंकू’ म्हणतात.”

(iii) संमिश्र शंकू (Compound cones)

“एखाद्या उद्रेकाच्या वेळी फक्त लाव्हारसच बाहेर पडतो व त्याचे ज्वालामुखीभोवती निक्षेपण होते आणि काही काळ उद्रेक होण्याचा थांबतो. पुन्हा काही दिवसांनी ज्वालामुखी जागृत होऊन उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखीय राख बाहेर पडते, त्यामधून धूळ, खडक, खडकाचे तुकडे इत्यादी पदार्थ बाहेर पडतात आणि त्याचे निक्षेपण होते. अशा रीतीने आलटून-पालटून लाव्हारस आणि ज्वालामुखीय राखेचे पर जमा होऊन तयार होणाऱ्या ज्वालामुखीस संमिश्र शंकू’ असे म्हणतात.”

2. उद्रेकाचा कालखंड आणि त्यांच्या क्रियेच्या स्वरूपानुसार (According to the period of eruptions and their mode of action)

1) जागृत ज्वालामुखी (An active volcano)

“ज्वालामुखीमधून ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो तसेच त्यांचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो, त्यांना ‘जागृत ज्वालामुखी’ असे म्हणतात.” जगामध्ये सुमारे 500 जागृत ज्वालामुखी आहेत. उदा., भूमध्य समुद्रामधील सिसिली बेटामधील स्ट्रॉम्बोली हा जागृत ज्वालामुखी असून त्याला भूमध्य समुद्रामधील द्वीपगृह असे म्हटले जाते. कारण ते सातत्याने वायूंचे ज्वलन करतात आणि प्रकाशमान प्रदीप्त असतात.

2) निद्रिस्त ज्वालामुखी (Dormant volcano)

“ज्या ज्वालामुखीमधून एके काळी जागृत ज्वालामुखीप्रमाणे सतत उद्रेक होत असत; परंतु सध्या उद्रेक होणे थांबलेले आहे आणि पुन्हा अचानकपणे उद्रेक होण्याची शक्यता आहे अशा ज्वालामुखीस ‘निद्रिस्त’ किंवा ‘सुप्त ज्वालामुखी’ असे म्हणतात.”

उदा., इटलीमधील वसुवियस ज्वालामुखीचा उद्रेक इ.स. 79 मध्ये झाला. अधूनमधून उद्रेक होतात. अलीकडे 1944 साली ज्वालामुखीचा उद्रेक झाला, यापैकी सर्वांत भीषण उद्रेक 1906 सालातील होता, अलास्कामधील फॅटम पर्वत.

3) मृत ज्वालामुख (Extinct volcano)

“ज्या ज्वालामुखीमध्ये पूर्वी एके काळी उद्रेक होत असत, आता उद्रेक होत नाहीत, त्यास मृत ज्वालामुखी’ असे म्हणतात. उदा., जपानमधील फुनियामा पर्वत ज्वालामुखीचे जागतिक वितरण उष्ण कटिबंधीय प्रदेशात 30° उत्तर अक्षवृत्तापासून 30° दक्षिण अक्षवृत्तापर्यंत जगामधील सर्वांत जास्त ज्वालामुखी आढळतात. या पट्ट्यात सुमारे 235 ज्यालामुखी आहेत.

हे सुद्धा वाचा-

Related Posts