मेनू बंद

शेतीची उत्पादकता म्हणजे काय?

शेतीची उत्पादकता किंवा कृषी उत्पादकता (Agricultural productivity) म्हणजे विशिष्ट क्षेत्रातील प्रति हेक्टर उत्पादन. शेतीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी, पीक अंतर आणि जमिनीतील पोषक घटकांचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे.

शेतीची उत्पादकता म्हणजे काय?

कृषी उत्पादकतेमध्ये माती, हवामान, कृषी तंत्रज्ञान, भांडवल आणि खते यांना विशेष महत्त्व आहे. काही भागात जास्त खतांचा वापर करूनही इष्टतम उत्पादन मिळत नाही. येथे माती परीक्षण करणे आवश्यक आहे जेणेकरुन जमिनीत आवश्यक तेवढ्याच प्रमाणात सिंचन आणि खतांचा वापर करता येईल.

शेतातील एका उत्पादनापासून शेतकऱ्याच्या कुटुंबाला जीवनावश्यक असंख्य वस्तूंचा पुरवठा होतो. वाढत्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी, अन्नधान्य किमती कमी करणे व उत्पादन वाढीसाठी उत्पादनक्षमतेत शाश्वत वाढ होणे गरजेचे आहे.

शेती उद्योगास आवश्यक असलेल्या एखाद्या घटकाचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो. एखादे विशिष्ट प्रकारचे उत्पन्न मिळवण्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक, कच्चा माल आणि साधनेसुद्धा उत्पादनक्षमतेवर परिणाम करतात. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर व सतत पिके घेणे यामुळे मातीची उत्पादनक्षमता कमी होते. क्षारता वाढल्याने खारफुटीची समस्या निर्माण होते.

शेती उत्पादकतेतील -हासाचे परिणाम (Factors Affecting Agricultural Productivity)

1. शेती उत्पादनातील घट (Decline in Agricultural Productivity) – शेतीची उत्पादकता कमी झाली की, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नही कमी होते. शेती उत्पादकतेतील -हासामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होतो. अन्नधान्य आयात करावे लागते. देशाला अन्नासारख्या मूलभूत गरजेसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते.

2. लागवडीयोग्य सुपीक जमिनीच्या प्रमाणात घट (Loss of cultivable fertile land)– अतिरेकी सिंचनामुळे व अविवेकी रासायनिक खतांच्या वापरामुळे ऊस लागवडीखाली असलेल्या हजारो हेक्टर जमिनीचा कस कमी झाला, महापुरांमुळे जमिनीमधील सुपीक माती वाहून जाते व त्यामुळे शेतीयोग्य जमीन कमी होते.

3. शेतीतील पिकांच्या विविधतेचा -हास (Loss of crop diversity in agriculture) – सध्या बऱ्याच भागात पारंपरिक पिके घेतली जात नाहीत. पारंपरिक पिकांचा ल्हास म्हणजे कृषी परिसंस्थांची विविध प्रकारे जैविक वस्तुमान निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते. जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींची लागवड केल्याने काही वर्षे उत्पन्नात वाढ होते, पण काही वर्षांनी जमिनीच्या दर्जात आणि जनुकीय स्रोतांमध्ये घट होऊन उत्पादकता कमी होते.

हे सुद्धा वाचा-

Related Posts