मेनू बंद

आर्थिक वृद्धी म्हणजे काय । आर्थिक वृद्धीची वैशिष्ट्ये

जगातील बहुसंख्य देश विकसनशील आहेत. काही मोजके देश मात्र या अवस्थेतून गेलेले असून आज तेथे होणारा स्वयंपूर्ण व स्वप्रेरित विकास हा ‘आर्थिक वृध्दी’ (Economic growth) या नावाने ओळखला जातो. अमेरिका, जपान, कॅनडा, इंग्लंड, काही पश्चिम युरोपियन देश यांचा समावेश विकसित देश या गटात केला जातो. या लेखात आपण आर्थिक वृद्धी म्हणजे कायआर्थिक वृद्धीची वैशिष्ट्ये काय आहेत, हे समजवून घेणार आहोत.

आर्थिक वृध्दि म्हणजे काय

आर्थिक वृद्धी म्हणजे काय

आर्थिक वृद्धी (Economic growth) म्हणजे दरडोई किंवा प्रति श्रमिक उत्पादनात होणारी स्वप्रेरित वाढ होय, जिच्यासोबत सामान्यतः लोकसंख्येतील वाढ आणि प्रचंड रचनात्मक बदल अनुभवास येतात. देशातील लोकांना विविध वस्तूंचा वाढत्या प्रमाणात पुरवठा करण्याच्या (अर्थव्यवस्थेच्या) क्षमतेमधील दीर्घकालीन वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी (Economic growth) होय. विकसित होत जाणारे तंत्रज्ञान आणि त्यासाठी आवश्यक असे संख्यात्मक व तांत्रिक समायोजन यांचा आधार या वाढत्या क्षमतेला असतो.

या व्याख्येवरून स्पष्ट होते की, वृद्धीचे मुख्य लक्षण म्हणजे वस्तूंच्या पुरवठ्यात होत जाणारी स्वप्रेरित वाढ. ती साध्य होण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास होणे आवश्यक आहे ही गोष्ट विकसित देशात आधीच घडलेली असते. अर्थात नवीन तंत्रज्ञानाचा वापर तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा देशात निरनिराळे संख्यात्मक आणि तांत्रिक बदल शक्य होतील. म्हणून असे बदल घडवून नवीन तंत्रज्ञान लागू करणे व त्याआधारे वस्तूंच्या पुरवठ्यात स्वप्रेरित वाढ करणे हे वृद्धीचे प्रमुख लक्षण आहे.

आर्थिक वृद्धीची वैशिष्ट्ये

1. लोकसंख्या व दरडोई उत्पादनाच्या वाढीचा उच्च दर

वृद्धीच्या काळात लोकसंख्येच्या वाढीचा वेग बराच जास्त दिसून येतो . पण त्याचवेळी (प्रगतीमुळे) उत्पादन इतके वाढत असते की, त्यांच्या दरडोई वाढीचा वेगही जास्त असतो . काही प्रगत देशात मात्र उत्पादनवाढ वेगाने होत असताना लोकसंख्येच्या वाढीचा वेग कमी होता.

उदा. रशिया, इंग्लंड, स्वीडन, इटाली वगैरे. अमेरिका व कॅनडामधील हे दोन्ही दर जास्त दिसून येत होते. सरासरीने विचार करता विकसित देशांमध्ये लोकसंख्येची वाढ एक प्रतिशत वेगाने, दरडोई उत्पादनाची वाढ दोन प्रतिशत वेगाने तर एकूण उत्पादनाची वाढ तीन टक्के वेगाने झालेली दिसते.

या देशांमध्ये लोकसंख्येच्या वाढीचा दशवार्षिक सरासरी दर 6% ते 24% या दरम्यान आढळतो तर दरडोई उत्पादनातील वाढीचा वेग 16% ते 44% या दरम्यान आढळतो. म्हणून लोकसंख्या आणि दरडोई उत्पादन यांची वेगाने वाढ होणे हा वृद्धीचा सूचक मानता येईल.

2. उत्पादकतेत वाढ

बहुतेक विकसित देशात उत्पादकता वेगाने वाढलेली दिसते. कारण प्रगतीच्या काळात विविध अंदाजांच्या दर्जात सुधारणा घडून येते. ऐतिहासिक अनुभवावरून असे दिसते की, वृद्धीच्या काळात विकसित देशांमध्ये लोकसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे श्रमाचा पुरवठाही वाढतो. थोड्या देशांचा अपवाद वगळता, या देशांमध्ये श्रमशक्तीचे एकूण लोकसंख्येशी असणारे प्रमाण वाढताना दिसते. कमी श्रम करावे लागूनही उत्पादनात वाढ होणे ही गोष्ट उत्पादकतेतील सुधारणेची व वृद्धीची सूचक नव्हे.

3. रचनात्मक परिवर्तन

औद्योगिकरणामुळे एकूण उत्पादनातील शेतीचे महत्त्व कमी होत जाते हे वृद्धीचे महत्त्वाचे लक्षण आहे. ऑस्ट्रेलियाचा अपवाद वगळता इतर सर्व विकसित देशांच्या एकूण उत्पादनात शेती क्षेत्राचा हिस्सा घटलेला असतो .

साधारण एक शतकाच्या काळात ही घट इंग्लंडमध्ये 22% वरून 5%, अमेरिकेत 49 % वरून 9%, जपानमध्ये 63% पासून 14% पर्यंत झालेली दिसते. अर्थात उपभोग क्षेत्राचा हिस्सा तेवढाच वाढला. याचवेळी शेतीत गुंतलेल्या श्रमिकांचे प्रमाणही वेगाने कमी होते तर उद्योग व सेवांमध्ये ते वाढते.

4. शहरीकरण

वाढते शहरीकरण हा औद्योगिकरणाचा अपरिहार्य परिणाम आहे. वृद्धीच्या काळात उद्योगांचे महत्त्व सातत्याने वाढते व शेतीचे कमी होते. त्यामुळे पूर्वी लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्यामुळे ग्रामीण भागात राहत असे, ती उद्योगातील रोजगारासाठी शहरांमध्ये स्थलांतरित होते.

किंबहुना असे स्थलांतरण झाल्याशिवाय औद्योगिकरणासाठी श्रमशक्ती उपलब्ध होऊ शकत नाही. याचा एक परिणाम म्हणजे वृद्धीच्या काळात शहरीकरण वेगाने होते. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. पण शहरीकरणामुळे जन्मदरात घट, छोट्या कुटुंबाचे महत्त्व पटणे, वृद्धीला पोषक वातावरण इत्यादी फायदेही होतात.

5. प्रभाव क्षेत्रातील वाढ

वृद्धीचा हा निर्देशांक नसला तरी एक वैशिष्ट्य आहे की , विकसित देशांचा प्रभाव इतर देशांमध्ये वाढत जातो. आज विविध देश तांत्रिक ज्ञानाच्या देवाण घेवाणीसाठी परस्परांवर अवलंबून असतात व त्यातून प्रभाव क्षेत्राची वाढ होताना दिसते.

6. श्रम, वस्तु व भांडवलाचे स्थलांतर

या तीन घटकांचे स्थलांतरण विकसित देशांमधून इतरत्र वेगाने होतांना दिसते . प्रगत देशातील तंत्रकुशल श्रमिक, आधुनिक वस्तू आणि भांडवल इतर कमी विकसित देशांकडे जाते. 1956 ते 1961 या काळात दरवर्षी 67 दशलक्ष डॉलर्स अमेरिकेतून बाहेर पडत होते.

हे सुद्धा वाचा-

Related Posts