मेनू बंद

मृदा म्हणजे काय? मृदेची मूलद्रव्ये, निर्मिती व प्रकार

मृदा विज्ञान (Pedology) ही भौतिक भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे, ज्यामध्ये मृदेची (Soil) निर्मिती, तिची वैशिष्ट्ये आणि पृष्ठभागावरील वितरणाचा वैज्ञानिक अभ्यास केला जातो. पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावरील कणांनाच मृदा म्हणतात. मृदेला माती ही म्हणतात. या आर्टिकल मध्ये आपण, मृदा म्हणजे काय (Mruda Mhanje Kay) आणि मृदेची मूलद्रव्ये, निर्मिती व प्रकार काय आहेत, जाणून घेणार आहोत.

मृदा म्हणजे काय

जनक खडकावरील निरंतर प्रकियांच्या विकासाच्या किंवा उत्क्रांतीच्या परिपाकास मृदा (Soil) म्हणतात. मृदेतील सेंद्रिय पदार्थांमध्ये पोषक तत्वे असतात, जी वनस्पतींच्या वाढीमध्ये आणि उत्पन्नात महत्त्वाची भूमिका बजावतात, पाणी टिकवून ठेवतात आणि प्रवाह कमी करतात आणि धूप रोखतात. मृदेतील सेंद्रिय कार्बन हा स्थलीय परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहे आणि परिसंस्थेची लवचिकता आणि उत्पादकता यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

मृदेची मूलद्रव्ये (Soil elements)

(1) असेंद्रिय द्रव्ये (Inorganic substances)

खडकाच्या विघटनामुळे सिलिका हा घटक मोठ्या प्रमाणात मृदेत मिसळतो. ऑक्सिजन, अल्युमिनिअम, लोह वगैरे मूलद्रव्ये मोठया प्रमाणात असतात. त्यांचा इतर द्रव्यांशी संयोग होतो. नायट्रोजन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस, गंधक तसेच तांबे यांसारखी मूलद्रव्येही मृदेत असतात.

(2) सेंद्रिय द्रव्ये (Organic matter)

जीव-जीवाणू किंवा सेंद्रिय द्रव्यांच्या सान्निध्यात मृदेची निर्मिती होते. पर्यायाने मृदेच्या निर्मितीत या सेंद्रिय द्रव्यांचा फार मोठा वाटा आहे. वनस्पती आणि प्राण्यापासून सेंद्रिय द्रव्ये उपलब्ध होतात.

मृदेची निर्मिती (Formation of Soil)

मृदेची निर्मिती पुढील घटकांवर अवलंबून असते-

(अ) जनक खडक (Parent rocks) : एखाद्या प्रदेशात मूळ स्वरूपातील खडकांचे अपघटन आणि अपक्षय होऊन खडकांचे तुकडे त्या प्रदेशावर पसरतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात मृदेच्या विविध प्रकारची निर्मिती होऊ शकते.

(ब) हवामान (Climate): आर्द्र प्रदेशातील मृदेमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असून लिचिगची क्रिया जास्त होते व चुनखडीचे प्रमाण कमी असते. कोरड्या प्रदेशात लिचिंगची क्रिया अल्प प्रमाणात असून मृदेमध्ये चुनखडी किंवा विद्राव्य क्षार जास्त असतात. आलटून-पालटून पर्जन्य आणि अवर्षण पडत असल्यास मृदेचा रंग आणि तिच्यामधील घटक यांचे स्वरूप बदलत जाते.

(क) वनस्पती व प्राणी (Plants and Animals): सूक्ष्म जीव जीवाणू, वनस्पती आणि प्राण्यांची कुजण्याची क्रिया होऊन त्यापासून ह्यूमस तयार होते. काही सूक्ष्म जीव-जीवाणू, हवेतील नायट्रोजन मृदेमध्ये शोषून घेऊ शकतात, हे सूक्ष्म जीवाणू मृत पावल्यावर मृदेचे सेंद्रिय पदार्थही वाढविण्यास मदत करतात.

(ड) प्राकृतिक रचना (Natural structure)

(1) सर्वसाधारण उंच-सखल प्रदेश आणि उत्तम प्रकारच्या जलप्रणाली असणाऱ्या प्रदेशात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो. अशा प्रकारच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या मृदेला ‘परिपक्व मृदा’ असे म्हणतात.

(2) पर्वतमय व तीव्र उताराच्या प्रदेशात पावसाचे बरेचसे पाणी प्रदेशातील तीव्र उतारामुळे वेगाने वाहत जाते. त्यामुळे मृदेच्या खालच्या भागातील अविकसित मृदा उपडी पडते व निकृष्ट प्रतीची मृदा तयार होते.

(3) पाण्याचा निचरा अत्यंत साधारण असणाऱ्या प्रदेशात किंवा दलदलीच्या प्रदेशात परिपक्व मृदेची निर्मिती होऊ शकत नाही.

(इ) काळ (Time): काही ठिकाणी पर्यावरणाच्या संतुलनामुळे मृदेची पूर्णावस्था तुलनात्मकदृष्ट्या कमी काळात होईल, तेथील मृदा काही शतकांमध्येच तयार होऊ शकेल, तर इतर काही ठिकाणी हजारो वर्षांचा कालावधीदेखील अपुरा असेल.

मृदेचे प्रकार

(अ) विभागीय मृदा विभागीय मृदेमध्ये आम्लयुक्त मृदा आणि अल्कलीयुक्त मृदा असे प्रकार पडतात.

(I) आम्लयुक्त मृदा

(1) जांभा मृदा (Jambhi Mruda in Marathi): उष्ण कटिबंधीय प्रदेशात आर्द्र हवामानात पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होऊन मृदेच्या खालच्या घरात अनेक सेंद्रिय द्रव्ये व असेंद्रिय द्रव्ये पाण्याच्या प्रवाहाबरोबर झिरपत जातात. यामुळे मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. कोकणात रत्नागिरी, सह्याद्री घाटमाथ्यावर, कोल्हापूर जिल्लागत सांभा मृदा आढळते.

(2) पॉझॉल किंवा राखाडी मृदा (Pozol or gray soil): उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो; परंतु दीर्घकालीन हिवाळा ऋतू असल्याने सेंद्रिय द्रव्याची कुजण्याची प्रक्रिया होते, यापासून तयार होणारा ह्यूमस आम्लयुक्त असतो. मध्य कटिबंधीय प्रदेशात आढळणान्या या मृदेची निर्मिती अधिक उबदार हवामानात व भरपूर पाऊस असणाऱ्या प्रदेशात होते. सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते व देखील कमतरता असते. उष्ण कटिबंधीय प्रदेशात जास्त तापमान, दमट हवामान यामुळे अपक्षय जलद गतीने होते. मृदेत सेंद्रिय द्रव्याचे जास्त प्रमाण असून तिला तांबूस तपकिरी रंग प्राप्त होतो.

(3) प्रेअरी मृदा (Prairie soil): या मृदेत कॅल्शिअमचे प्रमाण साधारण तर सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने मृदेस काळा रंग प्राप्त होतो. मूळ प्रदेश गवताळ असून गणाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

(4) तपकिरी मृदा (Brown soil) : आशिया खंडात उत्तर चीन व जपान, युरोप खंडात पश्चिम युरोप, रशियन प्रसव संयुक्त संस्थानच्या ईशान्य भागात ही मृदा आढळते. मृदेमध्ये जीव-जीवाणूंचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे मृदा सुपीक बनण्यास मदत होते

(5) टुंड्रा मृदा (Tundra Soils) : ध्रुवीय प्रदेशाच्या सभोवती रशियन प्रजासत्ताक व कनाच्या उत्तर भागात टुंड्रा मृदा आढळते. मृदा 9 ते 10 महिने बर्फाच्छादित असते. ही मृदा नापीक असते.

(II) अल्कली मृदा (Alkali soil)

(1) चर्नोझेम किंवा काळी मृदा (Kali Mruda in Marathi): रशियाचा दक्षिण भाग, रुमानिया, हंगेरी तसेच कॅनडा व संयुक्त संस्थानात चर्नोझेम मृदा (Chernozem or black soil) आढळते. गवताची तंतुमय मुळे कुजल्यामुळे देस काळा रंग प्राप्त होती. मूदेत ओलावा टिकून राहतो. जगातील सुपीक भूदेत याचा समावेश केला जातो.

उष्ण कटिबंधीय प्रदेशात याला ‘काळी मृदा’ म्हणतात. महाराष्ट्रातील गोदावरी, भीमा व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील मृदा आढळते. लाव्हारसापासून तयार झालेल्या खडकावर अपक्षयाची क्रिया होऊन ही सुपीक मृदा तयार झालेली आहे.

(2) चेस्टनट मृदा (Chestnut Soil) : रशियाच्या स्टेपी प्रदेशातील पश्चिमेस रुमानिया व हंगेरीपर्यंत, संयुक्त संस्थानाच्या उंचवट्याच्या प्रदेशात, दक्षिण आफ्रिकेत व्हेल्ड व दक्षिण अमेरिकेत पंपासच्या प्रदेशात ही मृदा आढळते. गवताळ प्रदेशातून तयार झालेल्या या मृदेचा रंग तपकिरी असतो. पाणीपुरवठा झाल्यास या मृदेत चांगली पिके येऊ शकतात.

(3) भुऱ्या रंगाची मृदा (Brown soil) : चेस्टनट मृदेच्या पूर्वेस व दक्षिणेस ही मृदा आढळते. यामध्ये ह्यूमसचे प्रमाण कमी असते. पाणी उपलब्ध झाल्यास पिके येऊ शकतात.

हे सुद्धा वाचा-

Related Posts