मेनू बंद

PAN Card ची व्हॅलिडिटी किती वर्षाची असते, जाणून घ्या कधी होणार एक्सापायर

Validity of PAN Card: पॅन कार्ड हे एक डॉक्युमेंट आहे, जे आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाते. पॅन कार्डचा वापर हा आजच्या काळात आवश्यक कागदपत्रांपैकी एक बनला आहे. बदलत्या काळानुसार सध्याच्या सरकारी यंत्रणेने असे अनेक नियम आणि कायदे केले आहेत ज्यात पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्ही बँक व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी पॅन कार्ड असणे सर्वात महत्त्वाचे आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की PAN Card ची व्हॅलिडिटी किती वर्षाची असते, नसेल तर हे आर्टिकल पूर्ण वाचा.

PAN Card ची व्हॅलिडिटी किती वर्षाची असते, जाणून घ्या कधी होणार एक्सापायर

PAN Card साठी कोण अर्ज करू शकतो

कोणतीही व्यक्ती, अल्पवयीन, विद्यार्थी PAN Card साठी अर्ज करू शकतात. पॅन कार्ड केवळ व्यक्तींनाच जारी केले जात नाही, तर कंपन्या आणि भागीदारी कंपन्या देखील पॅन कार्ड मिळवू शकतात आणि अशा संस्थांकडे कर भरणाऱ्या पॅन क्रमांक असणे अनिवार्य होते.

पॅन कार्ड NSDL (National Securities Depository Limited) द्वारे जारी केले जाते. पॅन कार्डला कायदेशीर दस्तऐवज म्हटले जाते कारण ते तुमचे सर्व आर्थिक व्यवहार ट्रॅक करते. टॅक्स चोरी रोखण्यासाठी पॅन कार्डचा मुख्यतः वापर केला जातो.

PAN Card ची व्हॅलिडिटी किती वर्षाची असते

PAN Card ची व्हॅलिडिटी लाइफटाइम असते, म्हणजे पॅन कार्ड आयुष्यभर वैध असते आणि ते कधीही कालबाह्य होत नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतरच पॅन कार्ड रद्द केले जाऊ शकते किंवा मृत्यू प्रमाणपत्राच्या मदतीने केवायसी सर्व आवश्यक ठिकाणी अपडेट केले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच पॅन कार्डची मुदत संपते.

पॅन नंबरमध्ये त्या व्यक्तीची माहिती असते, ज्यांचे PAN Card आहे. कायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच पॅन कार्ड असू शकते. आयकराच्या नियमांनुसार, जर एखाद्याकडे एकापेक्षा जास्त पॅन असतील आणि तो वापरत असेल तर ते बेकायदेशीर आहे. यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 272B च्या तरतुदीनुसार, एकापेक्षा जास्त पॅनकार्ड ठेवल्यास 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन असल्यास, तुम्ही ते सरेंडर करू शकता. तुम्ही पॅन कार्ड ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीकडे सरेंडर करू शकता.

हे सुद्धा वाचा-

Related Posts