मेनू बंद

7 खोट्या गोष्टी, ज्या आपल्या Boyfriend सोबत प्रत्येक मुलगी बोलते

प्रत्येक नात्यात रुसवा-फुगवा हा चालतोच, मग यापासून Girlfriend-Boyfriend चं नात कसं दूर राहू शकत. खरंतर या नात्याचा पाया म्हणजे विश्वास. याच कारणामुळे या नात्यात जास्त भांडण होण स्वाभाविक. या नात्यातील प्रेम जितके सौम्य दिसते तितकेच भांडण देखील जास्त होताना दिसतात.

मुली त्यांच्या बॉयफ्रेंडला काय-काय खोटं बोलतात

किंबहुना प्रत्येक नात्याच वेगळ अस्तित्व आणि महत्त्व असतं. प्रत्येक नात्यात जीवनाची मोहकता टिकवून ठेवण्यासाठी अनेक वेळा मुलीही आपल्या बॉयफ्रेंडशी खोटं बोलतात. म्हणूनच या लेखात आपण, मुली त्यांच्या बॉयफ्रेंडला काय-काय खोटं बोलतात, अश्या 7 मजेशीर गोष्टी जाणून घेणार आहोत.

मुली त्यांच्या बॉयफ्रेंडला काय-काय खोटं बोलतात

1. तुझी फॅमिली खूप छान आहे

एखादी मुलगी रिलेशनशिपमध्ये आल्यावर हा प्रश्न नक्की विचारते की तुम्ही तुमच्या कुटुंबाची ओळख कधी करणार आहात. जर तिच्या Boyfriend ने तिची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली आणि मग विचारले की, माझी फॅमिली कशी आहे, तर उत्तर मिळते, ‘तुझी फॅमिली खूप छान आहे’ . आणि नेहमी जेव्हा तुम्ही तुमच्या घरगुती गोष्टी तिला सांगता, तेव्हा नेहमी तुम्हाला एकचण सांगणार, ‘तुझी फॅमिली खूप छान आहे’. खरंतर ती फक्त तुमच्या आनंदासाठी हे सांगते.

2. पास्ट अफेअर

कोणतीही मुलगी तिच्या प्रियकरासोबत तिच्या भूतकाळातील पास्ट अफेअर कधीच शेअर करत नाही. जेव्हा ती एखाद्या मुलाला भेटते तेव्हा ती त्याला सांगते की तो तिचे पहिले प्रेम आहे. अनेक मुली त्यांच्या जोडीदारांना त्यांच्या भूतकाळातील संबंध किंवा वाईट अनुभव सांगत नाहीत. किती मुलींना वाटतं की त्यांचा भूतकाळ ऐकून त्यांचा प्रियकर त्यांना आवडणार नाही. या भीतीमुळे अनेकदा मुली आपला भूतकाळ लपवतात.

3. मला फरक पडत नाही पडत

प्रत्येक मुलगी भांडणानंतर ही ओळ नक्की म्हणते. विशेषतः जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्याबद्दल काही सांगता. मुलगी अनेकदा भांडण झाल्यावर ‘मला फरक पडत नाही पडत’ असे म्हणते, परंतु असे नाही की ती भांडणे आणि तुमच्यापासून दूर जाऊन तीला फरक पडत नाही. कदाचित ती हे यासाठी म्हणते की तीला स्वतःला मजबूत दाखवायचे असते.

4. मला माहीत नाही

तुमच्या लक्षात आले असेल की अनेकदा मुली आपल्या मनातील गोष्टी मोकळेपणाने मांडत नाही. ती तिचा राग तिच्या शब्दांपेक्षा शांततेतून व्यक्त करते. अशा परिस्थितीत, जेव्हा तिला तिच्या प्रियकराला टाळायचे असते किंवा त्याच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळायचे असते तेव्हा ती ‘मला माहित नाही’ असे म्हणते.

5. हा ड्रेस मला वाईट वाटतो

अनेकदा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड सोबत शॉपिंगला जाता तेव्हा ती तुम्हाला ही लाइन नक्कीच म्हणते. जेव्हा केव्हा तुम्ही तिला वेगवेगळ्या ड्रेस बद्दल तिला सांगता तेव्हा ती म्हणते, ‘हा ड्रेस मला वाईट वाटतो’. खरंतर या प्रश्नाच्या उत्तरात तिला नेहमीच स्वतःची स्तुती ऐकायला आवडते. तिने जे काही परिधान केले आहे ते तिच्यासाठी योग्य आहे हे तिला अनेकदा ऐकायचे असते.

6. मला तू आवडतो पण प्रेमाचा विचार केला नाही

जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला प्रपोज करता तेव्हा ती एकच लाइन म्हणते, ‘मला तू आवडतो पण प्रेमाचा मी विचार केला नाही’. पण तिच्या मनात फक्त एवढीच इच्छा असते की तुम्ही तिला सांगा की तुमचं तिच्यावर कीती प्रेम आहे, म्हणजेच ‘I Love You’. कारण अनेकदा मुली जेव्हा एखाद्याला आवडू लागतात तेव्हा त्या त्यांच्यासमोर असे दाखवतात की त्यांनी त्याबद्दल कधीही विचार केला नाही.

7. मला जळण होत नाही

जेव्हा Boyfriend दुसर्‍या मुलीशी बोलतो तेव्हा त्याचा प्रेयसीला हेवा वाटू शकतो, परंतु जेव्हा तो विचारतो तेव्हा ती म्हणते की ‘माझी का जळण होईल’, किंवा ‘मला जळण होत नाही, मी फ्री स्वभावाची आहे’. पण खरंतर तेव्हा तीला खूप जळण होत असते. अश्या वेळी जळण होण म्हणजे स्वाभाविक आहे, पण याला पण टाळायची स्ट्रॅटजी मुलीकडे आहे.

हे सुद्धा वाचा-

Related Posts