मेनू बंद

पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात

पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे ज्याला इंग्रजीत ‘Earth’ म्हणतात. सूर्यापासून अंतराच्या बाबतीत हा तिसरा ग्रह आहे. हा एकमेव ग्रह आहे ज्यावर जीवन आढळते. या लेखात आपण पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात हे जाणून घेणार आहोत.

पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात

पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा दोन तृतीयांश, म्हणजे सुमारे 71%, पाण्याने झाकलेला आहे, तर 29% जमीनीने व्यापलेला आहे. पृथ्वीच्या वातावरणामुळे, अवकाशातून जमीन धूसर दिसते, तर प्रामुख्याने पाण्याचे प्रमाण जास्त असल्या कारणाने पृथ्वी अवकाशातून निळी दिसते, आणि म्हणूनच पृथ्वीला निळा ग्रह म्हणतात. आपली पृथ्वीचा पृष्ठभाग वेगवेगळ्या प्लेट्सने बनलेला आहे, तसेच पृथ्वीच्या दोन ध्रुवावर बर्फाचा जाड थर आहे. पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्यामध्ये पाणी आणि जीवन आहे.

रेडिओमेट्रिक डेटिंग अंदाज आणि इतर पुराव्यांनुसार, पृथ्वीची उत्पत्ती 4.54 अब्ज वर्षांपूर्वी होती. पृथ्वीच्या इतिहासाच्या पहिल्या अब्ज वर्षांच्या आत, जीव महासागरांमध्ये विकसित झाले आणि पृथ्वीच्या वातावरणावर आणि पृष्ठभागावर परिणाम करू लागले. यामुळे एनारोबिक आणि नंतर एरोबिक जीवांचा प्रसार झाला.

काही भूगर्भीय पुरावे असे सूचित करतात की जीवन 4.1 अब्ज वर्षांपूर्वी सुरू झाले असावे. पृथ्वीवरील जीवनाच्या विकासादरम्यान जैवविविधता मोठ्या प्रमाणात विकसित झाली. हजारो प्रजाती नामशेष झाल्या आणि हजारो नवीन प्रजाती जन्माला आल्या. या क्रमाने, पृथ्वीवर राहणाऱ्या 99% पेक्षा जास्त प्रजाती नामशेष झाल्या आहेत.

सूर्यापासून चांगले अंतर, जीवनासाठी अनुकूल हवामान आणि तापमान यामुळे जीवांची विविधता वाढली. पृथ्वीचे वातावरण अनेक थरांनी बनलेले आहे. तसेच येथील वातावरणात नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण सर्वाधिक आहे. ओझोन हा वातावरणातील वायूचा एक थर आहे जो सूर्याकडून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांना रोखतो.

पृथ्वीवरील घनदाट वातावरणामुळे या सूर्यप्रकाशाची काही मात्रा परावर्तित होते, त्यामुळे त्याचे तापमान नियंत्रणात राहतेव जीवसृष्टी सुरक्षित राहते. जर एखादी उल्का पृथ्वीच्या वातावरणात शिरली तर ती एकतर जळून जाते किंवा हवेच्या घर्षणामुळे त्याचे छोटे तुकडे होतात. तुम्ही चंद्रावर खूप डाग किंवा खड्डे उघड्या डोळ्यांनी पाहता, ते चंद्रावर उल्का पडल्या करणानेच निर्माण झालेले आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे चंद्राला वातावरण नसणे होय.

हे सुद्धा वाचा-

Related Posts