Nominee in Bank Account: बँकेत खाते उघडताना तुम्हाला दिलेल्या फॉर्ममध्ये नॉमिनीचे ऑप्शन आपणास दिसते. त्यामध्ये नॉमिनीचे नाव आणि त्याच्याशी संबंधित माहिती भरणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, बँक खात्यातील नॉमिनीचे महत्त्व अनेकांना माहीत नाही. म्हणूनच या लेखात आपण जाणून घेणार आहोत की Bank Account मध्ये नॉमिनी बनविणे का आवश्यक आहे आणि कोण नॉमिनी बनू शकतो.

Bank Account मध्ये नॉमिनी बनविणे का आवश्यक आहे
कोणत्याही Bank Account मध्ये नॉमिनीचे (Nominee) तपशील भरला जातो, जेणेकरून खातेधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या खात्यात जमा असलेली सर्व रक्कम नामनिर्देशित व्यक्तीच्या खात्यात हस्तांतरित करता येईल. जर एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यात नामनिर्देशन तपशील भरले गेले नाहीत आणि तो/तिचा मृत्यू झाला, तर त्याच्या/तिच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे काढण्यात अनेक अडचणी निर्माण होतात.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, भारतातील अनेक बँकांमध्ये दावा न केलेल्या कोट्यावधी ठेवी पडून आहेत. कारण या खात्यांमध्ये एकही बँक नॉमिनी नव्हता आणि नॉमिनेशनशिवाय पैसे काढणे खूप अवघड आहे. जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो, तेव्हा मृतकाच्या परिवाराला दुःखाला आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अश्या वेळेस जर मृतकाच्या खात्यात रक्कम असेल तर ती रक्कम नॉमिनीला सहज मिळेल, आणि त्या दुःखातून सावरण्यास त्यांना मदत होईल. पण जर नॉमिनी नसेल तर गोंधळ निर्माण होऊ शकतो.
पती/पत्नीचे किंवा कुटुंबातील सदस्याचे बँक नॉमिनी म्हणून नामनिर्देशित केल्याने हा गोंधळ दूर होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या बँक खात्याला Bank Nominee असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास, नामनिर्देशित खातेधारक आपोआप त्या बँक खात्याचा हक्कदार बनतो.
जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात कोणत्याही व्यक्तीचे नामनिर्देशन केले नसेल, तर उशीर न करता कोणत्याही व्यक्तीला नामनिर्देशित करा. तुमचे बँक खाते नॉमिनी बनवण्यासाठी तुम्ही नेट बँकिंग वापरू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या बँक शाखेत जाऊन एखाद्या व्यक्तीला तुमच्या बँक खात्यासाठी नॉमिनी बनवू शकता.
बँक खात्याचा Nominee कोण बनू शकतो
तुम्ही तुमचे पालक, मुले, पती-पत्नी किंवा भावंडांना तुमच्या बँक खात्यासाठी Nominee बनवू शकता. खातेधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला खात्यात जमा केलेले सर्व पैसे सहज मिळतात. तुम्ही तुमच्या बँक खात्यासाठी एखाद्या व्यक्तीला नामनिर्देशित न केल्यास, तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या बँक खात्यात जमा केलेली रक्कम तुमच्या कायदेशीर वारसांकडे जाईल, ज्यामध्ये तुमची मुले आणि जोडीदार यांचा समावेश आहे.
तथापि, ही प्रक्रिया बरीच लांब आणि गुंतागुंतीची आहे ज्यास बराच वेळ लागू शकतो. अशा वेळी नॉमिनी न बनविल्यास, तुमच्या या छोट्याशा चुकीमुळे, तुमच्या अनुपस्थितीत, तुमच्या कुटुंबाला गरजेच्या वेळी पैसे मिळणार नाही आणि त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
हे सुद्धा वाचा- Saving आणि Current Account म्हणजे काय, जाणून घ्या फायदे आणि फरक