मेनू बंद

रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (१८७६-१९६६) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Wrangler Raghunath Purushottam Paranjape यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे - Wrangler Raghunath Purushottam Paranjape

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे केंब्रिज विद्यापीठात वरिष्ठ रँग्लरची प्रतिष्ठित पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय होते आणि ते विद्यापीठ प्रशासक आणि भारतीय राजदूत बनले.

रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

रँग्लर परांजपे उर्फ रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे ‘ रँग्लर परांजपे ‘ या नावानेच विशेष परिचित आहेत. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी, १८७६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुर्डी, अंजर्ला व दापोली या ठिकाणी झाले; तर पुढील शिक्षण पुणे व मुंबई या ठिकाणी झाले. त्यांच्या वडिलांची सांपत्तिक स्थिती विशेष चांगली नव्हती; म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना मुंबईस आणले; त्यामुळे उच्च शिक्षण घेणे त्यांना शक्य झाले.

मुंबई विद्यापीठाची बी. एस्सी. परीक्षा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सन १८९६ मध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले . तेथे केंब्रिज विद्यापीठात ‘ मॅथेमॅटिकल ट्रायपास ‘ या परीक्षेत ते सर्वप्रथम आले आणि त्यांनी ‘ सिनियर रँग्लर ‘ हा बहुमान मिळविला. ‘ ऍलर ‘ ही पदवी मिळविणारे ते पहिलेच भारतीय होत.

Wrangler Paranjape Information in Marathi

त्यानंतर त्यांनी काही काळ फ्रान्समधील ‘ पॅरिस विद्यापीठ ‘ आणि जर्मनीमधील ‘ गटिंग्टन विद्यापीठ ‘ या ठिकाणीही अध्ययन केले. १९०२ मध्ये ते भारतात परत आले. त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता पाहून भारत सरकारने सनदी से त्यांना उच्च अधिकाराची जागा देऊ केली होती; परंतु ग्लर परांजपे यांना सरकारी नोकरीपेक्षा मातृभूमीच्या सेवेत अधिक रस होता. त्यांच्यावर राष्ट्रवादी विचारांचे संस्कार झाले होते. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता.

इंग्लंडमधील वास्तव्यात ते दादाभाई नौरोजी यांसारख्या देशभक्तांच्या सहवासात आले होते; त्यामुळे सरकारातील उच्च अधिकारपदाचा मोह त्यांना झाला नाही. तथापि, मातृभूमीच्या सेवेसाठी राजकारणात उतरण्यापेक्षा शिक्षणक्षेत्रात कार्य करणेच त्यांनी पसंत केले. म्हणून पुण्याच्या ‘ डेक्कन एज्युकेशन सोसायटी ‘ या शिक्षणसंस्थेत दरमहा पंच्याहत्तर रुपये वेतनावर आजीव सेवक म्हणून काम करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले. त्या संस्थेच्या फर्गसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या सेवेचा प्रारंभ केला.

पुढे फर्गसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. रँग्लर परांजपे बुद्धिप्रामाण्यवादी व इहवादी होते. त्यांचा ईश्वर, धार्मिक कर्मकांड, पुनर्जन्म, परलोक इत्यादी) गोष्टींवर किंवा कल्पनांवर अजिबात विश्वास नव्हता. आपल्या या विचारांशी ते शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. गॅलर परांजपे यांनी राजकीय व सामाजिक चळवळींतही भाग घेतला होता. राजकीय क्षेत्रात ते नेमस्त राजकारणाचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या जहाल राजकारणाला त्यांचा विरोध होता.

सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते म्हणूनही ते परिचित आहेत. त्यांच्या बुद्धिवादी दृष्टिकोनामुळे भारतीय समाजातील अनिष्ट चालीरीती रूढी व धार्मिक कर्मकांड या गोष्टींना त्यांनी नेहमीच विरोध केला होता. रँग्लर परांजपे यांनी अनेक महत्त्वाची व सन्मानाची पदे भूषविली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. सन १९२१ मध्ये मुंबई इलाख्याचे शिक्षणमंत्री व अबकारी खात्याचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

आचार्य अत्रे यांनी “बुद्धीमत्तेत मेरू पर्वताएवढा उंच, बुद्धीमध्ये महासागराइतका खोल, कर्मात सूर्यासारखा तेजस्वी आणि निसर्गात पौर्णिमेइतका शीतल, व्यक्तीच्या जीवनातील दवबिंदूंसारखा निर्दोष” असे वर्णन केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतमंत्र्यांच्या इंडिया कौन्सिलचे सभासद म्हणूनही त्यांनी काम केले होते.

लखनौ विद्यापीठ व पुणे विद्यापीठ या विद्यापीठांच्या कुलगुरुपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. 1944 मध्ये त्यांची ऑस्ट्रेलियातील भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना ब्रिटिश सरकारने ‘नाइटहूड’ आणि ‘कैसर-ए-हिंद’ किताबाने सन्मानित केले होते. रँग्लर परांजपे यांचे ६ मे १९६६ रोजी निधन झाले.

हे सुद्धा वाचा –

Related Posts